भारतीय रेल्वे आपल्या प्रवाशांना प्रवासादरम्यान अनेक अधिकार (Rights) प्रदान करते. यात मोफत खाण्यापासून (Free food) ते मोफत बेड (Free bed) आणि साहित्यापर्यंतच्या अनेक अधिकारांचा समावेश आहे. भारतीय रेल्वेच्या फर्स्ट क्लास, एसी 2-टियर आणि एसी 3-टियरसह भारतीय ट्रेनच्या सर्व एसी वर्गांना एक ब्लँकेट, एक उशी, दोन बेडशीट आणि फेस टॉवेलसह विनामूल्य बेडरोल दिलं जातं. हा बेडरोल न मिळाल्यास तक्रार करण्याचीही व्यवस्था आहे. तर गरीबरथ एक्स्प्रेसमध्ये (Garib rath express) बेडरोल घेण्यासाठी तुम्हाला 25 रुपये मोजावे लागतात.
Table of contents [Show]
वैद्यकीय सुविधा
रेल्वेनं प्रवास करत असताना तुम्ही आजारी पडलात किंवा आरोग्यासंबंधी काही समस्या निर्माण झाल्यास तुम्ही फ्रंटलाइन स्टाफ, तिकीट कलेक्टर, ट्रेन सुपरिटेंडंट आदींकडून वैद्यकीय मदत मागू शकता. त्यानंतर तुम्हाला आरोग्याशी संबंधित सुविधा उपलब्ध होऊ शकतील.
मोफत अन्न
समजा तुम्ही राजधानी, दुरंतो आणि शताब्दी अशा प्रिमियम गाड्यांमधून प्रवास करत असाल आणि स्टेशनपासून ट्रेनला 2 तासांपेक्षा जास्त वेळ लागणार असेल, तर तुम्ही ट्रेनमध्ये मोफत जेवणाच्या सुविधेचा लाभ घेऊ शकता. याशिवाय जर ट्रेनला खूप उशीर झाला तरी तुम्ही मोफत जेवणाचा लाभ घेऊ शकता.
महिनाभर ठेवता येईल लगेज
भारतीय रेल्वे स्थानकांवर क्लॉकरूम आणि लॉकर रूम उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तुम्ही तुमचं सामान या लॉकर रूम आणि क्लॉकरूममध्ये जास्तीत जास्त एक महिनाभर ठेवू शकता. यासाठी मात्र तुम्हाला त्याचं काही शुल्क भरावं लागेल.
तक्रार करण्याची सोय
तुम्ही भारतीय रेल्वे स्थानकांवर अनेक ऑनलाइन आणि ऑफलाइन पर्यायांद्वारे सहजपणे तक्रार नोंदवू शकता. तुम्हाला अकाउंट एजन्सी, पार्सल ऑफिस, गुड्स वेअरहाऊस, टाउन बुकिंग ऑफिस, रिझर्व्हेशन ऑफिस याठिकाणी एक नोटबुक मिळेल. यामध्ये तुम्ही तुमच्या समस्या लिहू शकता. याशिवाय https://pgportal.gov.in/ या वेबसाइटवरही तक्रार नोंदवता येईल. ज्यामध्ये 9717630982 आणि 011-23386203 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधता येईल. त्याचबरोबर 139 क्रमांकावर तक्रार नोंदवता येवू शकते.