Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Basmati Rice: बासमती तांदळाच्या नावाखाली होणारी फसवणूक रोखण्यासाठी FSSAI ची नियमावली

Basmati Rice

बाजारामध्ये बासमती तांदळाच्या नावाखाली हलक्या प्रतीच्या तांदळाची विक्री होते. हा प्रकार रोखण्यासाठी Food Safety and Standards Authority ने नियमावली आणली आहे. यामुळे खरा बासमती तांदूळ कोणता हे ओळखण्याचे नियम तयार केले आहेत.

बाजारामध्ये बासमती तांदळाच्या नावाखाली हलक्या प्रतीच्या तांदळाची विक्री होते. हा प्रकार रोखण्यासाठी Food Safety and Standards Authority ने नियमावली आणली आहे. यामुळे खरा बासमती तांदूळ कोणता हे ओळखण्याचे नियम तयार केले आहेत. व्यापारातील फसवणूक आणि तांदळातील भेसळ रोखण्यासाठी FSSAI ने पाऊल उचलले आहे. तांदळाला नैसर्गिक सुगंध असला पाहिजे, कृत्रिम सुगंध, पॉलिशिंग एजंट आणि कृत्रिम रंग लावलेला असेल तर हा तांदूळ भेसळ समजला जाईल. अनेक कंपन्या सध्या अशा भेसळयुक्त तांदूळ बासमतीच्या नावाखाली विक्री करत आहेत.  

यावर्षी ऑगस्टपासून नवीन नियम लागू होणार आहेत. देशामध्ये बासमती तांदळासाठी प्रथमच असे नियम आणल्याचे FSSAI ने म्हटले आहे. बासमती तांदळामध्ये ब्राऊन बासमती राईस, parboiled brown basmati rice आणि milled parboiled बासमती राइसचा समावेश होतो. 

या नियमावलीबाबत एक पत्रक जारी करण्यात आले आहे. यानुसार बासमती तांदळाला नैसर्गिक सुगंध, पॉलिशींग आणि कृत्रिम रंग लावलेला नसावा असे म्हटले आहे. तांदळाची गुणवत्ता आणि प्रजाती ओळखण्यासाठीही अनेक नियम लागू केले आहेत. कोणत्या बासमती तांदळाची लांबी किती आहे हे सुद्धा नियमावलीत दिले आहे. तांदळामध्ये असलेले आर्द्रतेचे प्रमाण, युरीक अॅसिडचे प्रमाण किती असावे याबाबत नियम आखले आहेत.