Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Retirement Planning: निवृत्तीचे नियोजन नेमक्या कोणत्या वयापासून करायला हवे?

Early Retirement Planning

Retirement Planning: मित्रांनो, कोणत्याही गोष्टीचे नियोजन केले की, ती गोष्ट आपण 50 टक्के अगोदरच पूर्ण करतो. त्यानंतर उरलेले 50 टक्के हे आपल्याला त्याची अंमलबजावणी करण्यासाठी द्यावे लागतात. त्यामुळे उतारवयातील जगणे सुखकर करण्यासाठी लवकरात लवकर रिटायरमेंट प्लॅनिंग करणे नक्कीच गरजेचे आहे. ते का आणि कसे हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊ.

Retirement Planning: रिटायरमेंट प्लॅनिंग नेमक्या कोणत्या वयापासून सुरू करायला हवे. अगदी वयाच्या पंचविसाव्या वर्षापासून निवृत्तीचे नियोजन करणे योग्य आणि गरजेचे आहे का? याची माहिती आज आपण घेणार आहोत.

वयाच्या पंचविसाव्या वर्षात रिटायरमेंटचे प्लॅनिंग करणे व्यवहार्य आहे का? असा प्रश्न अनेकांना पडतो. कारण या वयात नुकतीच नवीन नोकरी लागलेली असते. त्या नोकरीचा आनंद घेत नाही. तोच रिटायरमेंटचे प्लॅनिंग करणे पचत नाही. तसे रिटायरमेंटचे नियोजन हे वय 35 किंवा 40 च्या घरात आले की, सर्वसाधारणपणे सर्वांना सुचते आणि त्यावेळी याचा ही बोध होतो की, हे प्लॅनिंग अजून 10 वर्षापूर्वी सुरू केले असते, तर उतारवयात अजून फायदा झाला असता. पण त्यासाठी वय आणि वेळ थांबत नाही.

मित्रांनो, कोणत्याही गोष्टीचे नियोजन केले की, ती गोष्ट आपण 50 टक्के अगोदरच पूर्ण करतो. त्यानंतर उरलेले 50 टक्के हे आपल्याला त्याची अंमलबजावणी करण्यासाठी द्यावे लागतात. त्यामुळे उतारवयातील जगणे सुखकर करण्यासाठी लवकरात लवकर रिटायरमेंट प्लॅनिंग करणे नक्कीच गरजेचे आहे. ते का आणि कसे हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊ.

कमी वयात मोठं टार्गेट सेट करा

रिटायरमेंटच्या दृष्टीने तुम्ही जर वयाच्या पंचविशीत मोठं ध्येय ठरवत असाल. तर ते पूर्ण करण्यासाठी तुम्हाला भरपूर वेळ मिळू शकतो. तसेच त्याचे योग्यरीत्या प्लॅनिंग करण्यासाठीदेखील तुम्हाला पुरेसा वेळ मिळतो. त्यामुळे तुम्हाला जर तुमचे रिटायरमेंट निवांतपणे घालवायचे असेल किंवा तुम्हाला तुमच्या मनासारखा व्यवसाय करायचा असेल किंवा वयाच्या 60 नंतर जगाची सफर करायची असेल, तर तुम्हाला कमी वयात त्याचे प्लॅनिंग करणे गरजेचे आहे.

बचतीची सवय

नोकरी लागल्यानंतर सर्वप्रथम बचतीचे सवय स्वत:ला लावून घेणे आवश्यक आहे. कारण जितक्या लवकर बचत सुरू करून ती योग्य ठिकाणी गुंतवली तर त्याचे अनेक लाभ मिळतात. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे लहान वयात केलेल्या गुंतवणुकीवर चक्रवाढ पद्धतीने व्याज मिळाल्याने उतारवयात त्यातून मिळणारा परतावा आश्चर्यकारक ठरतो.

जे उमेदीच्या काळात बचत आणि गुंतवणुकीला तितकेचे प्राधान्य देत नाहीत. त्यांना उतारवयात अनेक प्रकारच्या आर्थिक समस्यांना सामोरे जाऊ लागू शकते. उदाहरणार्थ, राम आणि शाम हे दोन मित्र 25व्या वर्षी एकत्र नोकरीला लागतात. त्यातील राम पहिल्या महिन्यापासून नियमितपणे किमान 5000 रुपयांची रिटायरमेंटसाठी बचत करू लागला आणि शामने मात्र वयाच्या पस्तीशीपासून 5000 रुपयांची बचत सुरू केली. यामध्ये अर्थातच रामची बचत शामच्या बचतीपेक्षा जास्त झाली. कारण त्याने 10 वर्षे अगोदरपासून सुरूवात केली होती.यातून लवकर बचत सुरू करण्याचा फायदा दिसून येतो.

चांगल्या आर्थिक सवयी लावा

निवृत्तीच्या नियोजना विचार वयाच्या पंचविशित करत असाल, तर त्याची पूर्तता करण्यासाठी स्वत:ला चांगल्या आर्थिक सवयी लावून घेणे गरजेचे आहे. जसे पैसे खर्च करताना त्याचे मूल्य आणि लाभ किती? तसेच कशामुळे जास्तीत जास्त पैशांची बचत होऊ शकते, अशा सवयी स्वत:ला लावून घेणे. या बेसिक सवयींच्या मदतीने तुम्ही भविष्यात अनेक गोष्टी प्राप्त करू शकता.

अनपेक्षित खर्चाला सामोरे जाण्याची तयारी

अनपेक्षितपणे येणारे खर्च याला सामोरे जाण्याची तयारी असणे खूप गरजेचे आहे. कारण अनेकवेळा वर्षानुवर्षे बचत आणि गुंतवणूक करून जमा केलेला पैसा अचानकपणे खर्च होतो. त्यामुळे पुन्हा एकदा नव्याने बचत आणि गुंतवणुकीचा श्रीगणेशा करावा लागतो. अशी स्थिती टाळण्यासाठी लवकरात लवकर आपत्कालीन निधी उभारण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. जेणेकरून अनपेक्षितपणे येणारे खर्च हे त्या निधीतून खर्च केले जाऊ शकतात.

अशाप्रकारे वेगवेगळ्या माध्यमातून रिटायरमेंटचे प्लॅनिंग करता येऊ शकते आणि अर्थातच त्याचा फायदा त्याचप्रमाणे मिळू शकतो. पण याचे नियोजनच उशिरा केले तर बचत, गुंतवणूक अशा सर्वच गोष्टींना उशिर होतो. त्यामुळे ऐन निवृत्तीच्या काळात अनेक प्रकारच्या खर्चांना सामोरे जावे लागते.