दैनंदिन गरजेच्या काही गोष्टींच्या किमती महिन्याच्या 1 तारखेला बदलत असतात. या किंमती वाढतात किंवा कमी होतात. ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्य लोकांच्या खिशावर होतो. मे महिना संपायला फक्त 3 ते 4 दिवस बाकी आहेत. लवकरच जून महिना सुरू होणार असून जूनच्या 1 तारखेपासून तीन गोष्टींमध्ये बदल होणार आहेत. यामध्ये CNG-PNG च्या किमती, LPG गॅस सिलेंडरचे दर आणि इलेक्ट्रिक टू व्हीलरच्या किमतीचा समावेश करण्यात आला आहे.
CNG -PNG चे दर
घरघुती गॅस सिलेंडरप्रमाणे CNG-PNG च्या किंमती सतत बदलत असतात. महिन्याच्या पहिल्या तारखेला CNG-PNG च्या किंमतीत बदल जातात. दिल्ली आणि मुंबई सारख्या मोठया शहरांमध्ये पेट्रोलियम कंपन्यांकडून त्याच्या किंमतीमध्ये बदल केले जातात. एप्रिल महिन्यात दिल्ली आणि मुंबई शहरात CNG -PNG च्या दरात घसरण झालेली पाहायला मिळाली. मात्र मे महिन्यात याच्या दरात फारसा फरक पाहायला मिळाला नाही. अशा परिस्थितीमध्ये आता जून महिन्यात CNG -PNG च्या दरात नेमके किती बदल होत आहेत, आणि त्याचा कसा परिणाम होईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
LPG गॅस सिलेंडरचे दर
सरकारी गॅस कंपन्यांकडून महिन्याच्या पहिल्या तारखेला LPG गॅस सिलेंडरचे दर निश्चित केले जातात. सरकारी गॅस कंपन्यांकडून एप्रिल आणि मे महिन्यात सलग 19 किलो वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये घट करण्यात आली होती. मात्र घरघुती वापराच्या 14 किलो वजनाच्या गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला पाहायला मिळाला नाही. मार्च महिन्यात सरकारकडून सिलेंडरच्या किंमतीत 50 रुपयांची कपात करण्यात आली होती. त्यामुळे जूनच्या 1 तारखेला गॅस सिलेंडरच्या दरात बदल केले जाऊ शकतात.
इलेक्ट्रिक टू व्हीलरच्या किंमती
जर तुम्हीही इलेक्ट्रिक टू व्हीलर (Electric Two Wheeler) घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला त्याची खरेदी महाग पडू शकते. सरकारकडून इलेक्ट्रिक टू व्हीलरच्या खरेदीवर सबसिडी देण्यात येते. मुळात इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवर मिळणारी सबसिडी कमी करण्यात आली आहे. ही सबसिडी सुरुवातीला 15,000 रुपये प्रति kWh इतकी होती. ज्याच्यात कपात करून 10,000 रुपये प्रति kWh इतकी करण्यात आली आहे. ज्याच्यामुळे जून महिन्यात इलेक्ट्रिक टू व्हीलर खरेदी करणे 25 ते 30 हजार रुपयांची महाग होऊ शकते.
Source: moneycontrol.com