Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

IDFC First Bank Services: IDFC First Bank कडून तब्बल 25 सेवा मिळणार मोफत, जाणून घ्या डिटेल्स

IDFC First Bank Services

Image Source : http://www.twitter.com/

IDFC First Bank Services: IDFC फर्स्ट बँकेने त्यांच्या वेबसाइटवर झीरो फी बँकिंग सेवा सुरू केली आहे. तुम्ही या सर्व सेवांचा लाभ फक्त ऑनलाइन घेऊ शकता.

IDFC First Bank Services: IDFC First Bank ने  25 सामान्यतः वापरल्या जाणार्‍या बँकिंग सेवांवरील चार्ज  माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकिंग सेवांमध्ये रोख ठेव आणि पैसे काढणे, थर्ड पार्टी कॅश ट्रान्झॅक्शन, डिमांड ड्राफ्ट, IMPS, NEFT, RTGS, चेक बुक, SMS अलर्ट, व्याज प्रमाणपत्र, ATM व्यवहारासाठी अपुरी शिल्लक, आंतरराष्ट्रीय ATM वापर इत्यादींचा समावेश आहे.  बँकेची ही सुविधा 18  डिसेंबरपासून लागू झाली आहे. आपल्या स्थापना दिनानिमित्त, बँकेने ग्राहकांशी संबंधित अनेक सेवांवरील चार्ज  रद्द करण्याची घोषणा केली आहे. बँकेकडून पुरविण्यात येणाऱ्या अनेक बँकिंग सेवा आता ग्राहकांना मोफत उपलब्ध होणार आहेत.

मोफत सेवांचा लाभ घेण्यासाठी महत्वाच्या अटी (Important conditions for availing free services) 

आयडीएफसी फर्स्ट बँकेद्वारे पुरवल्या जाणाऱ्या या सेवा ग्राहकांनी काही अटींचे पालन केल्यावरच मोफत उपलब्ध होतील. ही सुविधा फक्त त्या ग्राहकांसाठी मोफत उपलब्ध असेल जे त्यांच्या खात्यात 10,000 रुपये आणि 25,000 रुपये मासिक सरासरी शिल्लक ठेवतात. बँकेचे म्हणणे आहे की, त्यांच्या या उपक्रमाचा फायदा अशा लोकांना होईल ज्यांची आर्थिक समज कमी आहे आणि त्यांना चार्जेस  समजत नाही.

या 25 सेवा मोफत उपलब्ध असतील (These 25 services will be available for free)

बँकेने 25 सर्वाधिक वापरल्या जाणार्‍या बँकिंग सेवांवरील चार्ज रद्द केले आहे. बचत खाते असलेल्यांना याचा लाभ मिळणार आहे. या ग्राहकांना बँकेच्या शाखेत रोख ठेव किंवा पैसे काढणे, थर्ड पार्टी ट्रान्झॅक्शन, डिमांड ड्राफ्ट, IMPS, NEFT, RTGS या सुविधांसाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.  चेकबुक, एसएमएस अलर्ट, व्याज प्रमाणपत्र, एटीएम व्यवहारांसाठी अपुरी शिल्लक आणि आंतरराष्ट्रीय एटीएम वापरणे यासारख्या सेवांना शुल्कातून सूट दिली जाईल.

मोफत सेवा पुढीलप्रमाणे 

सेवा services  

IMPS चार्ज 

आंतरराष्ट्रीय एटीएम/पीओएस व्यवहार चार्ज 

पेड चेकच्या कॉपीसाठी चार्ज 


बैलेंस सर्टिफिकेट

NEFT चार्ज 

एटीएममधील प्रति व्यवहार अपुऱ्या शिल्लक रकमेसाठी चार्ज 

दरमहा कॅश ट्रान्झॅक्शन संख्या 

इंट्रस्ट सर्टिफिकेट 

RTGS चार्ज 

स्टैंडिंग इंस्ट्रक्शन चार्ज 

कॅश ट्रान्झॅक्शन

अकाउंट क्लोज करणे

चेक बुक चार्ज 

मॅनेजर्स चेक/डिमांड ड्राफ्ट रद्द करणे

थर्ड पार्टी कॅश ट्रान्झॅक्शन

ईसीएस रिटर्न चार्ज 

एसएमएस अलर्ट चार्ज

फोटो Validationचार्ज 

बँकेच्या ठिकाणी डिमांड ड्राफ्ट/पीओ (इश्यू चार्जेस)

पेमेंट चार्ज  

डुप्लिकेट स्टेटमेंटचा मुद्दा

signature Validationचार्ज 

पासबुक चार्ज 

Address confirmation चार्ज