Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Fractional Investment: रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीचा नवा फंडा; फ्रॅक्शनल ओनरशीपला मिळतेय पसंती

fractional ownership in real estate

पारंपरिक पद्धतीने रिअल इस्टेट गुंतवणूक करण्यासाठी जास्त पैसे लागतात. पुणे, मुंबई सारख्या शहरात मोक्याच्या ठिकाणी फ्लॅट घेण्यासाठी 70-80 लाखांपेक्षा जास्त रक्कम लागते. मात्र, फ्रॅक्शनल इनव्हेस्टमेंट करण्यासाठी एवढे पैसे असण्याची गरज नाही. गुंतवणुकीचा हा नवा फंडा फेमस होतोय. नक्की काय आहे याबद्दल जाणून घ्या.

रिअल इस्टेट क्षेत्रातील गुंतवणूक म्हणजे फ्लॅट, जमिनीचा तुकडा किंवा गजबजलेल्या बाजारपेठेतील एखादा गाळा खरेदी करणं एवढंच राहीलं नाही. थेट गुंतवणूक न करताही रिअल इस्टेट प्रोजेक्टसमध्ये गुंतवणूक करता येते. अशा गुंतवणुकीस फ्रॅक्शनल ओनरशिप इनव्हेस्टमेंट असे म्हणतात. मागील काही वर्षात अशा प्रकारची गुंतवणूक दीड हजार कोटींवरून 4 हजार कोटींवर पोहचली आहे. 

रिअल इस्टेट क्षेत्रातील फ्रॅक्शनल इनव्हेस्टमेंट वाढत आहे. असे TruBoard Partners या रिअल इस्टेट क्षेत्रातील कंपनीने केलेल्या अभ्यासातून समोर आले आहे. 

रिअल इस्टेटमध्ये गुंतवणुकीचा नवा मार्ग

मोठे मॉल, गृहप्रकल्प, आयटी पार्क, कमर्शिअल कॉप्लेक्स, थिएटर अशा प्रॉपर्टी व्यवस्थापित करणाऱ्या कंपन्यांमध्ये सर्वसामान्य नागरिकांना गुंतवणूक करता येते. जसे म्युच्युअल फंड एसआयपीद्वारे मोठ्या कंपन्यांच्या शेअरमधील काही भाग NAV च्या रुपाने मिळतो. (What is fractional ownership) तसे फॅक्शनल इनव्हेस्टमेंटद्वारे कोट्यवधींच्या रिअल इस्टेट प्रकल्पामध्ये काही रक्कम गुंतवता येते. यातून चांगला परतावाही मिळतो. अधिक माहितीसाठी या लिंकवर क्लिक करा.

कमी पैशांतही करता येईल गुंतवणूक

पारंपरिक पद्धतीने रिअल इस्टेट गुंतवणूक करण्यासाठी खूप जास्त पैशांची आवश्यकता लागते. पुणे, मुंबई सारख्या शहरात मोक्याच्या ठिकाणी फ्लॅट घेण्यासाठी 70-80 लाखांपेक्षा जास्त रक्कम लागते. मात्र, फ्रॅक्शनल इनव्हेस्टमेंट करण्यासाठी एवढे पैसे असण्याची गरज नाही. 10 लाख रुपयांपासून पुढे रक्कम गुंतवता येईल. 

तसेच घर खरेदी केल्यावर प्रॉपर्टी टॅक्स, दुरूस्ती, मेनटेन्स तसेच घर विकायचे झाल्यास योग्य गिऱ्हाईक मिळेल की नाही याची चिंत नाही. तुम्हाला पाहिजे तेव्हा ही फ्रॅक्शनल इनव्हेस्टमेंट तुम्ही काढून घेऊ शकता. सुरुवातीच्या काळात गुंतवणुकदारांचा अशा गुंतवणुकीवर विश्वास बसत नव्हता. मात्र, आता  नागरिकांची यास पसंती मिळत आहे. 

सध्या भारतात फ्रॅक्शनल इनव्हेस्टमेंट ही संकल्पना बाल्यावस्थेत असली तरी येत्या काळात चांगलीच वेग घेण्याची शक्यता आहे. 2019 साली फ्रॅक्शनल इनव्हेस्टमेंट कंपन्यांचा AUM (Asset under mgmt) 1500 कोटी रुपये होता. त्यात वाढ होऊन आता 4 हजार कोटी रुपयांवर पोहचली आहे. 

फ्रॅक्शनल इनव्हेस्टमेंट कंपन्या कोणत्या?

भारतामध्ये रिअल इस्टेट प्रकल्पांमध्ये फॅक्शनल इनव्हेस्टमेंट सुविधा देणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. Strataprop, Hbits, Myre Capital Propshare, Yield Asset, Assetmonk Strataprop, आणि PropReturns या काही आघाडीच्या कंपन्या आहेत. या कंपन्यांद्वारे गुंतवणूक करता येईल. 

किती परतावा मिळू शकतो?

या गुंतवणुकीतून वार्षिक 8 ते 10% परतावा मिळू शकतो. तसेच गुंतवणूक केलेल्या प्रॉपर्टीच्या किंमती प्रत्येक वर्षांनी वाढत असल्याने गुंतवणुकीचे मूल्यही वाढते. तुम्ही कधीही या योजनेतून बाहेर पडून पैसे माघारी घेऊ शकता.