Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Forbes Real Time Billionaires List - जगातल्या दहा श्रीमंतांमध्ये असलेल्या 'या' महिला उद्योजक कोण?

Francois Bettencourt Meyers

Image Source : www.yourtechstory.com

Forbes Billionaires real time List - फोर्ब्सच्या रियल टाइम श्रीमंताच्या यादीमध्ये क्वचितच टॉप 10 मध्ये महिला व्यवसायिकांना स्थान मिळतं. मात्र यावेळी फ्रान्समधल्या एक गर्भश्रीमंत उद्योजिका या यादीत नवव्या स्थानावर होत्या. पाहूया कोण आहेत या फ्रेंच महिला उद्योजक, त्यांच्या व्यवसाय आणि त्यांच्या संपत्तीचे मूल्य.

Women Entrepreneur in Forbes Real time billionaires list : फोर्ब्स मासिकाच्या रियल टाइम श्रीमंताच्या यादीमध्ये आज (5 एप्रिल) टॉप 10 मध्ये फ्रान्समधल्या एका महिला उद्योजिकेचा समावेश होता. या महिला उद्योजकाचे नाव आहे फ्रँकोइस बेटनकोर्ट मेयर्स. फोर्ब्सच्या रियल टाइम श्रीमंताच्या पहिल्या 10  मध्ये क्वचितच महिलांचे नाव दिसून येते. हा दुर्मिळ योग आज मात्र साधुन आला. सकाळी 9 च्या सुमारास या यादीमध्ये फ्रँकोइस बेटनकोर्ट मेयर्स या नवव्या स्थानावर होत्या. तर टॉप 25 मध्ये अमेरिकेतील महिला उद्योजक अॅलीस वॉलटन आणि ज्यूलिया कोच यांचा समावेश होता.

कोण आहेत फ्रँकोइस बेटनकोर्ट मेयर्स

फ्रँकोइस बेटनकोर्ट मेयर्स या एक फ्रेंच उद्योजक आहेत. आज त्यांच्या संपत्तीचे मूल्य 89.6 बिलीयन डॉलर इतके आहे. तसेच त्यांच्याकडे लॉरियल कंपनीचे 33 टक्के शेअर्स आहेत.  लॉरिएल या जगप्रसिद्ध सौंदर्य प्रसाधणं तसंच शांपू ब्रँडचे संस्थापक यूजीन श्युलर ( Eugene Schueller)  यांच्या त्या नात आहेत. 1997 पासून त्या लॉरियलच्या चेअरवूमन म्हणून कामकाज पाहत आहेत. 2017 साली  फ्रँकोइस यांच्या आईचे निधन झाल्यावर फ्रँकोइस यांच्याकडे वारसाहक्क आला.

आपल्या उद्योगाचा पसारा सांभाळण्याबरोबरच फ्रँकोइस बेटनकोर्ट मेयर्स यांची वेगळी ओळख आहे ती म्हणजे एक लेखिका, आणि पियानोवादक म्हणून. विज्ञान आणि कला क्षेत्रातील प्रगतीसाठी फ्रँकोइस या सामाजिक संस्था चालवत आहेत. दरम्यान, लॉरियल आणि बेटनकोर्ट कुटुंबियांनी एप्रिल 2019 साली आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या नॉट्री डॅम कॅथिड्रलच्या दुरूस्तीसाठी 226 कोटी डॉलर निधी दान करण्याचा निर्णय घेतला आहे.  

रियल टाइम लिस्ट

फोर्ब्स या जगतविख्यात मासिकाकडून अर्थजगातील विविध निष्कर्षावर आधारित माहिती प्रसिद्ध केली जाते. जगातील श्रीमंताची यादी, ठरावीक देशातील श्रीमंताची यादी, पॉवरफुल महिला, टॉप 10 महिला उद्योजक, टॉप 10 सेलिब्रेटिज अशा विविध क्षेत्रातल्या व्यक्तिमत्वाचे संपत्ती मूल्यांनुसार क्रम ठरवला जातो. यापैकीच एक भाग असतो तो म्हणजे रियल टाइम बिलीयर्नसची लिस्ट.

रियल टाइम अब्जाधीशांची यादी ही नावाप्रमाणेच प्रत्येक क्षणी अपडेट होत असते. म्हणजे एखाद्या उद्योगपतीकडे असलेले शेअर त्यादिवशी शेअर बाजारात वर-खाली झाले तर त्या व्यक्तीच्या संपत्तीतही चढ उतार होत असतो. असा सूक्ष्म दर मिनिटाला होणारा बदलही ही यादी गृहित धरते.  यामध्ये त्याक्षणाला उद्योजकांचे संपत्तीचे जे मूल्य असते त्या नुसार हा क्रम ठरवला जातो. ब्लूमबर्ग तसंच फोर्ब्स यांच्याही नियमित आठवडा तसंच महिन्याच्या यादीबरोबरच रिअरटाईम इन्डेक्सही काढला जातो.