Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Forbes world’s billionaires list : उद्योगपती मुकेश अंबानी श्रीमंतांच्या यादीत नवव्या स्थानावर

Mukesh Ambani richest person in asia

Image Source : www.ritambanerjee.com

World’s billionaires list : फोर्ब्सची अब्जाधीशांची ताजी यादी जाहीर झाली आहे. या यादीमध्ये मुकेश अंबानी यांनी नववं स्थान पटकावलं आहे. यासोबतच जागतिक अब्जाधीशांच्या यादीत अमेरिका व चीनच्या पाठोपाठ भारताने तिसरे स्थान मिळवले आहे.

Mukesh Ambani Ranked 9 in Forbes magazine list : जगातील सुप्रसिद्ध फोर्ब्स मासिकने 37 वा अब्जाधीशांची यादी मंगळवारी जाहीर केली. भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांनी पुन्हा एकदा फोर्ब्स यादीत नववे स्थान पटकावले आहे. तर आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा बहुमान मिळवला आहे.  83. 4 बिलीयन डॉलर नेट वर्थ सह मुकेश अंबानी हे जागतिक क्रमवारीमध्ये नवव्या स्थानावर आहेत. गेल्यावर्षी 90.7 बिलीयन डॉलर नेट वर्थ सह दहाव्या स्थानावर होते. यावर्षी मुकेश अंबानी यांनी मायक्रोसॉफ्टचे स्टिव्ह बॉलमर, गूगलचे लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन, फेसबुकचे मार्क झुकेरबर्ग, डेल टेक्नॉलॉजिचे मायकल डेल यांना मागे टाकत नवव्या स्थानावर पोहोचले आहेत.

गौतम अदानी थेट 24 स्थानावर

सप्टेंबर 2022 मध्ये 156 बिलीयन डॉलरच्या नेट वर्थसह दुसऱ्या स्थानावर असलेल्या गौतम अदानी यांना हिंडेनबर्ग अहवालाचा चांगलाच फटका बसल्याचे पाहायला मिळते. जानेवारी 2023 मध्ये दुसऱ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर आल्यानंतर आता थेट 47.2 बिलीयन नेटवर्थसह ते 24 स्थानावर गेले आहेत.  मात्र, श्रीमंत भारतीयांच्या क्रमवारीत हे ते पहिल्या स्थानाऐवजी दुसरे स्थान मिळाले आहे.

हिंडनबर्ग अहवालानंतर बाजारपेठेत अदानी समुहाच्या शेअरवर मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळाल्या. या सर्व कारणास्तव जागतिक व भारताच्या श्रीमंत व्यक्तिंच्या क्रमवारीतील स्थानावर ही नकारात्मक परिणाम झाला आहे.

बर्नार्ड अर्नॉल्ड पहिल्या स्थानावर

फ्रान्स येथील लुई व्हिटॉन, ख्रिश्चन डायर अॅन्ड टिफीनी कंपनीचे मालक बर्नार्ड अर्नॉल्ड यांनी पहिल्यांदाच फोर्ब्सच्या यादीत पहिले स्थान मिळवले आहे. त्यांची नेटवर्थव्हॅल्यू 211 बिलीयन डॉलर आहे. एलॉन मस्क व जेफ बेझॉझ हे अनुक्रमे 180 बिलीयन डॉलर व 114 बिलीयन डॉलर  नेट वर्थ व्हॅल्यूसह दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहेत. तरी गेल्यावर्षीच्या तुलनेत त्यांच्या नेट वर्थ व्हॅल्यू कमी झाल्याचे  फोर्ब्सने आपल्या अहवालाच म्हटले आहे.

फोर्ब्सच्या यादीत 169 भारतीयांचा समावेश

फोर्ब्सच्या यादीत स्थान मिळवणाऱ्या भारतीय उद्योगपतींच्या संख्येत वाढ झाली आहे. गेल्या वर्षी या यादीमध्ये 166 भारतीयांनी स्थान मिळवले होते. मात्र यंदा 169 भारतीयांनी आपल्या संपत्तीमध्ये वाढ करत या प्रतिष्ठित यादीत आपले स्थान निर्माण केले आहे. 
गेल्यावर्षी फोर्ब्स यादीमध्ये 2,668 जणांचा समावेश होता. मात्र, ही संख्या कमी झाली असून 2,640 जणांचाच या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे जगाच्या एकुण संपत्तीचा ग्राफ ही 12.7 ट्रिलियन डॉलरवरून 12.2 ट्रिलियन डॉलरवर आला आहे. आर्थिक मंदीचे सावट,बुडीत बँका, वाढते व्याजदर, यांचा फटका बसल्याचे दिसत आहे.