Food Truck Policy of BMC : येत्या काही दिवसांमध्ये 50 फुड ट्रक 24 x 7 मुंबईकरांच्या सेवेमध्ये दाखल होणार आहेत. मुंबई महानगरपालिकेची बहुप्रतिक्षेत असलेली फुड ट्रक पॉलिसी अखेर मंजूर झाली आहे. या पॉलिसीसाठी निविदा प्रक्रिया काढण्याचे निर्देश अखेर पालिकेच्या केंद्रीय खरेदी विभागाला देण्यात आले आहेत. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी 2021 सालीच या धोरणाला मंजुरी दिली होती. मात्र, काही कारणास्तव या धोरणार पुढील कार्यवाही न होता तसेच बारगळत पडले होते.
फुड ट्रक व्यवसाय
गेल्या काही वर्षात फुड इंडस्ट्रीमध्ये फुड ट्रक ही संकल्पना जास्त रूढ होत आहे. व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवली खर्चाचा विचार केला असता. फुड ट्रक तयार करणे, मनुष्यबळ, विक्रिसाठी ठेवले जाणारे पदार्थ, व्यवसायाचे ठिकाण या सर्वांच्या दृष्टिकोनातून पाहता फुड ट्रक हा परवडण्याजोगा व्यवसाय आहे.
अलीकडे आपल्याला ठिकठिकाणी अशा अन्नपदार्थाच्या गाड्या पाहायला मिळतात. कोरोना महामारीच्या काळानंतर तर फुड ट्रक व्यवसाय हा ट्रेंड विशेषरीत्या पाहायला मिळत आहे. या व्यवसायाच्या मार्गाने तयार होणारा स्वयं-रोजगार पाहता हे सर्व स्ट्रिमलाईनमध्ये शिस्तबद्धरीत्या करणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रशासनाकडून जर अशा प्रकारचे फुड ट्रक पॉलिसी सुरू करून योग्य नियमावली केली तर आगामी काळात या क्षेत्रात ही चांगली वाढ होताना पाहायला मिळेल.
मुंबई महानगरपालिकेची फुड ट्रक पॉलिसी
रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी मुंबई महानगर पालिकेकडून हे धोरण राबवण्यात येणार आहे. या धोरणा अंतर्गत आर्थिकदृष्ट्या वंचित घटकातील व्यक्ति, दिव्यांग बांधव, महिलासाठी कार्य करणारे गट आणि बचत गट यासाठी 50 टक्के जागा राखिव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
#MiddayNews |
— Mid Day (@mid_day) April 4, 2023
Mumbai: Coming soon, meals on wheels#Mumbai #Meals #wheels #MumbaiNews https://t.co/tHtMClTNcX
फुड ट्रकची नियमावली
मुंबईतल्या सर्व सात विभागामध्ये या फुड ट्रकनां व्यवसायासाठी परवानगी दिली जाणार आहे. मात्र, त्यासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत.
- फुड ट्रक हे निश्चित केलेल्या जागेवरच असणार आहे. त्यांना व्यवसायासाठी ठिकाण बदलता येणार नाही.
- मुंबईमध्ये ज्याठिकाणी नोकरदार वर्गाची वर्दळ असेल अशा ठिकाणांसह रूग्णालय, उद्याने अशा वर्दळीच्या ठिकाणी परवानगी दिली जाणार आहे.
- ज्याठिकाणी रेस्टॉरंट वा हॉटेल आहेत अशा ठिकाणाच्या 200 किमीच्या अंतरात या फुड ट्रकनां परवानगी नसेल.
- दोन फुड ट्रकमध्ये 15 किमीचे अंतर असणे बंधनकारक आहे.
- या फुड ट्रक वर कोणत्याही प्रकारचा कच्चा भाजीपाला, फळे विकण्यास मनाई आहे.
- तसेच सुरक्षितता म्हणून या फुड ट्रकवर कोणत्याही प्रकारचे अन्नपदार्थ शिजवण्यासही मनाई आहे.
- फुड ट्रकसाठी मुंबई महानगरपालिकेकडून परवानगी मिळाल्यावर आरोग्य, ट्रॅफिक व अग्निशमक विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र असणे बंधणकारक आहे.