लग्नाचे नियोजन करणे हा एक मोठा टास्क असतो. त्यातही जर लग्नाच्या जेवणाचा मेन्यू ठरवणं, केटरर्स ठरवणं हे सगळे जर नियोजन करायचे असेल तर विचारूच नका. कमी खर्चात उत्तम गुणवत्तेचे जेवण मिळवणे सध्याच्या महागाईच्या जमान्यात थोडे कठीण होऊन बसले आहे. असे असले तरी, काळजीपूर्वक जर याचे नियोजन केले तर नक्कीच तुम्ही फायद्यात ठरू शकाल.
असं म्हणतात की, लग्नविधीसाठी तुम्ही कितीही खर्च करा, ते लोकांच्या लक्षात राहणार नाही. परंतु तुमच्या लग्नात जेवणाच्या बाबतीत कुठलीही कसर राहिली असेल तर वर्षानुवर्षे लोकांच्या ते लक्षात राहतं. त्यामुळे आपल्यापैकी अनेकजण लग्नातील जेवणाकडे विशेष लक्ष ठेऊन असतात.
Table of contents [Show]
ग्रामीण भागात प्रचलित असलेली ही एक कॉमन म्हण आहे. लग्नाच्या वरातीत नवरा नवरीला नेण्यासाठी येतो तर वऱ्हाडी मंडळी जेवणासाठीच येत असतात. त्यामुळे लग्नातील खाद्यपदार्थ लोकांच्या किती आवडीचे विषय आहेत हे तुमच्या लक्षात आलं असेल.बजेट-अनुकूल लग्नातील मेन्यूचे नियोजन करण्यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टींचा विचार करायला हवा याबद्दल आपण जाणून घेऊयात.
जेवणाचं नियोजन करताना आपल्या बजेटचा आगोदर विचार व्हायला हवा. किती लोक लग्नासाठी अपेक्षित आहेत त्यानुसार जेवणाचे नियोजन होणे गरजेचे आहे.
स्थानिक आणि हंगामी पदार्थ
तुमच्या लग्नाच्या ठिकाणावर देखील जेवणाचा मेन्यू ठरतो, हे कायम लक्षात ठेवा. ग्रामीण भागात किंवा शहरी भागात वेगवेगळ्या पालेभाज्या, फळे, पेय आदी वस्तू उपलब्ध असतात. स्थानिक भागात उपलब्ध असलेल्या साहित्याचा विचार करूनच मेन्यू ठरवा.
उदाहरणार्थ, जर कोकणातल्या लग्नात तुम्ही जर जिलेबी-फाफडा हा मेन्यू ठरवत असाल तर तो महागातच पडेल, कारण कोकणात अये पदार्थ बनवणारे हलवाई भेटणे मुश्कील होईल आणि पदार्थांचा खर्च देखील वाढेल. त्यामुळे हंगामी भाज्यांचा वापर करून बनवणाऱ्या डिशेससाठी तुमच्या केटररशी चर्चा करा, हे तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल.
मर्यादित मेन्यू ठेवा
असंख्य खाद्यपदार्थ ठेवण्याचा मोह आवरला पाहिजे. चायनीज, थाई, पाणीपुरी इत्यादी स्टार्टर ठेवण्याची जणू काही स्पर्धाच लागली आहे. यामुळे जेवणाचा खर्च तर वाढतोच परंतु त्यासोबत अन्नाची नासाडी देखील होते. बहुसंख्य लोकांना अजूनही भरमसाठ अन्न ताटात घेऊन ते फेकून देण्याची सवय आहे. त्यामुळे खूप सारे खाद्यपदार्थ ठेवण्याचा तुम्ही जर निर्णय घेत आल तर तो तुम्हाला महाग आणि केटरर्सला फायदेशीर ठरू शकतो.
शाकाहारी पर्याय अधिक स्वत
आपल्याकडे आहार स्वातंत्र्य आहे. आपापल्या खाद्यसंस्कृतीनुसार लग्नकार्यात शाकाहारी, मांसाहारी किंवा मिश्रहारी खाद्यपदार्थ ठेवले जातात. परंतु बजेटचा जर विचार केला तर लग्नात शाकाहारी जेवणाचा पर्याय स्वीकारणे ही एक किफायतशीर निर्णय ठरू शकतो. कारण मांस आणि सीफूड तुलनेने अधिक महाग असतात.
तुम्ही तुमच्या परिसरातील, पारंपारिक शाकाहारी पदार्थ एक्सप्लोर करू शकतात जे एक चांगली चव आणि भारतीय पाककृतीचे दर्शन घडवू शकेल.
गुणवत्तेला प्राधान्य द्या
अगदी किफायतशीर बजेटमध्ये, गुणवत्तापूर्ण जेवणाची तुम्ही सोय करू शकता. त्यासाठी तुमच्या परिसरातीलच प्रतिष्ठित आणि अनुभवी केटरर निवडा जो तुमच्या बजेटनुसार उत्कृष्ट पाककृती बनवू शकेल.जेवणाच्या सादरीकरणाला देखील आजकाल महत्व दिले जाते. त्याची देखील व्यवस्था मित्र-मंडळींच्या सहकार्याने आपल्याला करता येऊ शकते. बुफे पद्धतीने जेवणाची सोय केल्यास, लोकांना त्यांच्या इच्छेनुसार जेवण घेता येईल आणि अन्नाची नासाडी देखील होणार नाही.
हे लक्षात असू द्या की खर्च नियंत्रणात ठेवून तुम्ही एक लग्नसोहळ्यात संस्मरणीय पाककृतीचा आस्वाद घेऊ शकता. याबाबत नियोजन करत असताना खाण्याच्या गुणवत्तेला आणि सादरीकरणाला प्राधान्य दिले पाहिजे हे लक्षात ठेवा.