ऑनलाईन खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी फ्लिपकार्टने (Flipkart) एक धमाकेदार सेल घोषित केला आहे. नव्या वर्षाचा फ्लिपकार्टचा हा सेल ग्राहकांची भरघोस बचत करणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. येत्या 6 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या या ‘बिग बचत धमाल सेल’ (Big Bachat Dhamal Sale) मध्ये काय असणार आहे, हे जाणून घेऊयात.
6 जानेवारी ते 8 जानेवारी 2023 पर्यंत, केवळ 2 दिवसांसाठी हा सेल सुरू राहील. ई-कॉमर्स व्यवसायांत फ्लिपकार्टने आपला जम बसवला आहे. या आधी ‘बिग बिलियन डेज’ सेलला देखील ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता, त्याच धर्तीवर हा सेल असणार आहे. बिग बचत धमाल सेलसाठी, फ्लिपकार्टने स्मार्टफोन, घर, सजावट, फॅशन, किचन, इलेक्ट्रॉनिक्स आदी श्रेणी निवडल्या आहेत. परंतु अजूनही ब्रँड आणि किमती जाहीर केलेल्या नाहीत.
परंतु, फ्लिपकार्टने त्यांच्या वेबसाइटवर काही आकर्षक मुद्द्यांचा उल्लेख केला आहे:
1) धमाल डील (Dhamal Deal) : ग्राहकांना 6 जानेवारी ते 8 जानेवारी दरम्यान सकाळी 12 AM, 8 AM आणि संध्याकाळी 4 वाजता मोठ्या बचतीच्या डील मिळतील.
2) लूट बाजार (Loot Bazar) : सकाळी 10 ते रात्री 10 दरम्यान विक्री कालावधीत, ग्राहकांना सर्वात कमी किमतीत डील्स मिळतील.
3) कॉम्बो डील (Combo Deal) : 12 AM, 8 AM आणि संध्याकाळी 4 वाजता ग्राहकांना अविश्वसनीय कॉम्बो डील मिळू शकतात.
जास्त खरेदी म्हणजे जास्त बचत असे फ्लिपकार्टने म्हटले आहे.
स्मार्ट फोन डील्सवर फ्लिपकार्टने अद्याप सवलतींची घोषणा केलेली नाही. वेबसाइटनुसार, ते लवकरच Realme 8S 5G, Poco M3 Pro, iPhones इत्यादी सर्वाधिक मागणी असलेल्या स्मार्टफोनच्या किमती जाहीर करणार आहेत. इलेक्ट्रॉनिक्स बिग बचत धमालमध्ये, ग्राहकांना सर्वाधिक विकले जाणारे लॅपटॉप 40% पर्यंतच्या सवलतीवर खरेदी करता येणार आहेत. टीव्ही आणि इतर इलेक्ट्रोनिक उपकरणे फक्त रु. 7,499/- पासून मिळणार आहेत. रेफ्रिजरेटर खरेदीवर 55% पर्यंत सूट आणि वॉशिंग मशीन 60% पर्यंत सूट देखील दिली जाणार आहे.