Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

iPhone13च्या खरेदीवर Flipkart देत आहे बंपर डिस्काउंट, फक्त 25,900 रुपयांमध्ये खरेदी करू शकता स्मार्टफोन!

iPhone13

Image Source : www.moneycontrol.com

iPhone13 वर असलेल्या सर्व उपलब्ध ऑफर आणि बँक सवलतींसह, खरेदीदार फ्लिपकार्टवरून Apple iPhone 13 फक्त 25,900 रुपयांमध्ये खरेदी करू शकतात.

Appleचा iPhone 13 हे एक अतिशय प्रसिद्ध आणि सर्वाधिक विकले जाणारे मॉडेल आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे हा फोन कमी किंमतीत iPhone 14 सारखे अनेक फीचर्स देतो. फ्लिपकार्टने 7,901 रुपयांच्या सवलतीनंतर आयफोन 13ला 61,999 रुपयांना लिस्ट केले आहे. याशिवाय, तुम्ही Flipkart Axis Bank कार्ड वापरून खरेदीवर 5 टक्के कॅशबॅक मिळवू शकता, ज्यामुळे या स्मार्टफोनची  किंमत 58,900 रुपयांपर्यंत कमी होते. 

यासोबतच ग्राहक त्यांचा  जुना स्मार्टफोन एक्स्चेंज 33,000 रुपयांपर्यंत ट्रेड-इन सूट मिळवू शकतात. Bank Offer 2000 Off On HDFC Bank Debit Card EMI Transactions आणि Bank Offer 2000 Off On HDFC Bank Credit Card Transaction या सर्व उपलब्ध ऑफर आणि बँक सवलतींसह, खरेदीदार फ्लिपकार्टवरून Apple iPhone 13 फक्त 25,900 रुपयांमध्ये खरेदी करू शकतात.

Apple iPhone 13 फीचर्स 

Apple iPhone 13 मध्ये 6.1-इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे आणि स्ट्रॉंग A15 बायोनिक चिपसेट आहे. स्मार्टफोनमध्ये 12MP लेन्ससह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे जो 4K डॉल्बी व्हिजन HDR व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो. याशिवाय सेल्फीसाठी नाईट मोडसह 12MP डेप्थ फ्रंट कॅमेरा अ‍ॅड करण्यात आला आहे. Appleच्या मते, डिव्हाइस 17 तासांपर्यंत व्हिडिओ प्लेबॅक देते. 2021मध्ये iPhone 13 Pro आणि Mini सह फोन 13 लाँच करण्यात आला, सुरुवातीची किंमत 79,900 रुपये होती.

iPhone 12 वर देखील डिस्काऊंट उपलब्ध आहे

iPhone 13 सोबत iPhone 12 देखील Flipkart वर कमी किंमतीत उपलब्ध आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट स्मार्टफोनचे 64GB स्टोरेज मॉडेल 53,999 रुपयांच्या सवलतीच्या दरात देत आहे. त्याची मूळ किंमत 59,900 रुपये आहे. खरेदीदार iPhone 12च्या रेड व्हाइट अँड ब्लॅक कलरमधून निवड करू शकतात. 

source : www.moneycontrol.com