Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Flipkart वर रेल्वे तिकीटाच्या दरात मिळतेय विमानाचे तिकीट, जाणून घेण्यासाठी वाचत राहा

Cheapest Flight Booking

Cheapest Flight Booking: सणासुदीचा हंगाम लक्षात घेऊन Flipkart ने ग्राहकांसाठी विमान प्रवासावर एक विशेष सवलत दिली आहे ज्याचा फायदा ग्राहकांना घेता येत आहे.

Cheapest Flight Booking: नवीन वर्षासाठी तुम्ही बाहेर फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर Flipkart तुमच्यासाठी एक नवीन ऑफर(Offer) घेऊन येत आहे. तुम्ही जर कमी खर्चात विमानाने प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी चालून आली आहे. Flipkart मुळे तुम्हाला रेल्वेच्या (Railway) तिकिटाच्या किंमतीत विमानाने प्रवास(Flight Traveling) करता येणे शक्य होणार आहे. सणासुदीच्या काळात जेव्हा तुम्ही विमानाने प्रवास करता तेव्हा तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागतात, परंतु, जर तुम्ही या Flipkart वरून बुकिंग (Booking) केले तर तुम्हाला कमी दरात तिकीट मिळू शकते.चला तर याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

कुठे मिळेल ऑफर?

  • तुम्हाला माहित आहे का? ऑनलाईन शॉपिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या Flipkart वर लोक आता कपडे, स्मार्टफोन आणि उपकरणांच्या खरेदीसोबतच विमानाचे तिकीटही बुक करू शकतात
  • Flipkart वर विमान तिकीट बुक करण्याची सुविधा बऱ्याच काळापासून सुरू करण्यात आली आहे मात्र याबद्दल फार कमी लोकांना ठाऊक आहे 
  • सणासुदीचा हंगाम लक्षात घेऊन कंपनीने ग्राहकांसाठी विमान प्रवासावर एक विशेष सवलत दिली आहे ज्याचा फायदा ग्राहकांना घेता येईल
  • कमी दरात विमानाचे तिकीट बुक करण्याची सुविधा मिळत आहे

प्रवासाचे मार्ग आणि किती किंमत मोजावी लागेल?

  • चांगल्या क्लासच्या ट्रेनमधून तुम्ही तिकीट बुक केले तर तुम्हाला यासाठी 2,000 ते 3,000 रुपये मोजावे लागतात
  • ही किंमत ट्रेनवरही अवलंबून असते, बऱ्याच वेळा ट्रेननुसार ही किंमत वाढू देखील शकते. पण जर तुम्ही Flipkart वर विमानाचे तिकीट बुक केले तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते
  • Flipkart आपल्या ग्राहकांसाठी ही विशेष सुविधा देत आहे
  • ग्राहकांना निवडक मार्गांवर स्वस्त तिकिटे बुक करण्याची संधी मिळत आहे आणि आज आम्ही तुम्हाला त्या मार्गांबद्दल सांगणार आहोत
  • Flipkart वरून Air Asia ची दिल्ली ते लखनऊ फ्लाइट 25 डिसेंबरसाठी बुक केली तर तुम्हाला फक्त 3017 रुपये मोजावे लागणार आहेत 
  • त्याच दिवशी जर तुम्ही लखनऊ ते दिल्ली फ्लाइट बुक केली तर तुम्हाला फक्त 3400 रुपये मोजावे लागणार आहेत 
  • ही किंमत खूपच कमी आहे आणि ग्राहकांसाठी ती फायदेशीर ठरू शकते
  • याशिवाय अन्य मार्गांवरील विमान तिकीटे माफक दरात मिळत आहेत