फ्लिपकार्ट (Flipkart) आणखी एका सेलसह परत आले आहे, जो वर्षातील शेवटचा सेल असू शकतो. बिग सेव्हिंग डेजचा ( Flipkart Big saving days) हा सेल 16 डिसेंबर ते 21 डिसेंबर दरम्यान होईल. या कालावधीत, युजर्स स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, गृहोपयोगी उपकरणे, फॅशन उत्पादने आणि बऱ्याच गोष्टींवर सवलत मिळवू शकतात. Flipkart बिग सेव्हिंग डेज 2022 (Flipkart big saving days 2022) दरम्यान, वापरकर्ते Flipkart Axis Bank क्रेडिट कार्ड वापरून 5 टक्के कॅशबॅक मिळवू शकतात. त्याचप्रमाणे Flipkart Pay Later युजर्स निवडक खरेदीवर त्वरित Rs 250 चे गिफ्ट कार्ड देखील मिळवू शकतात. जरी फ्लिपकार्टने ट्रेंडिंग स्मार्टफोन्सवर फायनल डिस्काऊंट जाहीर केले नसले तरी, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मने सेल दरम्यान ऑफर आणि सूट मिळतील अशा डिव्हाइसेसचा खुलासा केला आहे. फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज 2022 मध्ये विचारात घेण्यासाठी काही स्मार्टफोन डील पाहूया.
iPhone 14 वर ऑफर
Flipkart Big Saving Days 2022 बॅनरनुसार, Walmart-मालकीचे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म नवीनतम Apple iPhone 14 वर सवलत देऊ शकते. त्याचप्रमाणे जुन्या Apple iPhones वर देखील या सेलदरम्यान काही सूट मिळण्याची अपेक्षा आहे.
Poco M3 आणि Realme C20
जर तुम्ही नवीन बजेट स्मार्टफोन शोधत असाल, तर Poco M3 आणि Realme C20 हे देशातील सर्वोत्तम परवडणारे 4G स्मार्टफोन आहेत. फ्लिपकार्ट या डिव्हाइसेसच्या किंमती आणखी कमी करेल ज्यामुळे ते आणखी स्वस्त होतील. Poco M3 ची सध्या Flipkart वर किंमत 10,999 रुपये आहे आणि सेल दरम्यान हे डिव्हाइस 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध केले जाण्याची शक्यता आहे. Realme C20, जे आधीच 7,499 रुपयांना लिस्टेड आहे, ते फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज 2022 दरम्यान खूपच स्वस्त किंमतीत उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.
Vivo T1 5G
Vivo T1 5G हा कंपनीच्या बजेट 5G सक्षम स्मार्टफोनपैकी एक आहे, जो फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज 2022 दरम्यान सवलतीत उपलब्ध असेल. स्मार्टफोन सध्या 15,990 रुपयां मध्ये उपलब्ध आहे आणि सेल दरम्यान, हा डिव्हाइस 15,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध असेल अशी अपेक्षा आहे.