• 05 Feb, 2023 13:49

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Flight Ticket Offer: रेल्वेपेक्षा कमी किंमतीत विमान प्रवास! स्पाईसजेट आणि एअर इंडियाची ऑफर!

Flight Ticket Offer by spice jet & Air India

Image Source : www.googole.com

Flight Ticket Offer: करोना काळात विमान प्रवासाला ब्रेक लागला होता. मात्र, त्यानंतर विमान प्रवासात विक्रमी वाढ झाली आहे. सध्या प्रजासत्ताक दिनाचेनिमित्त साधून स्पाईस जेट आणि एअर इंडियाने प्रवाशांना विमान प्रवासाच्या तिकिटावर मोठ सूट दिली आहे, ज्यामुळे प्रवास अगदी रेल्वेच्या दरात करता येणार आहे. तर नेमकी किती सवलत दिली आहे हे जाणून घेण्यासाठी पुढे वाचा. Flight Ticket Offer: करोना काळात विमान प्रवास

Flight Ticket Offer: ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध कंपन्या विविध ऑफर्स, सवलतींचा पाऊस पाडत असतात. त्यात आता देशातील दोन प्रमुख एअरलाइन्सने फ्लाइट तिकिटांवर प्रवाशांना ऑफर दिल्या आहेत. स्पाईसजेट आणि एअर इंडिया देशांतर्गत उड्डाणांवर भरघोस सूट देत आहेत. टाटा समूहाच्या एअरलाइन्स एअर इंडियाने या वर्षातील सर्वात स्वस्त तिकीट दर सादर केले असून इकॉनॉमी क्लासच्या तिकिटांवर ही सवलत देत आहेत.

एअर इंडियाच्या तिकीटाची किंमत केवळ 1 हजार 705 पासून सुरू होत आहे. तिकीट सवलतीच्या यादीत 49 हून अधिक शहरांचा समावेश करण्यात आला आहे दुसरीकडे, स्पाइसजेटने प्रजासत्ताक दिनाच्या तिकीट विक्रीवर ऑफरची घोषणा केली आहे. एअरलाइन्स देशांतर्गत उड्डाणांवर 26 टक्के सूट देत आहेत. या सवलतीसह 1 हजार 126 पासून फ्लाइट तिकीट बुक करू शकता. हे विमान तिकीट काही ट्रेनच्या प्रथम आणि द्वितीय श्रेणीच्या तिकिटांपेक्षा कमी आहे. फ्लाइट तिकिटांवर ही ऑफर 24 जानेवारी 2023 ते 30 सप्टेंबर 2023 पर्यंत आहे. या ऑफर्समुळे विमान प्रवास रेल्वेपेक्षाही स्वस्त झाला असल्याचे स्पाईसजेटने म्हटले आहे.

बुकिंग कधीपर्यंत करता येईल (Until when bookings can be made)

एअर इंडियाने देऊ केलेल्या 49 अधिक गंतव्यस्थानांसाठी तिकीट सूट अंतर्गत, प्रवासी 30 सप्टेंबरपर्यंत प्रवास करू शकतात. दुसरीकडे, स्पाइसजेटबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्ही 24 ते 29 जानेवारी 2023 पर्यंत तिकीट बुक करून 30 सप्टेंबरपर्यंत प्रवास करू शकता. जर तुम्ही या दोन विमान कंपन्यांच्या मदतीने देशांतर्गत उड्डाणांसाठी तिकीट बुक केले तर तुम्ही एअर इंडियाच्या  airindia.in या वेबसाइटवर जाऊन बुकिंग करू शकता. त्याच वेळी, स्पाइसजेटच्या spicejet.com  वेबसाइटवर जाऊन बुकिंग करता येईल. स्पाईसजेटने सांगितले आहे की, ही ऑफर अधिकृत वेबसाइटवरूनच दिली जात आहे.

नव्या वर्षाच्या सुरुवातील प्रवास करणाऱ्यांना, फिरायला जाणाऱ्यांना या सवलतीचा लाभ घेता येणार आहे. तसेच सध्या 26 जानेवारीला लागून येणाऱ्या विकेंडला आऊटींगसाठी अनेकजण बाहेर पडण्याची शक्यता आहे.