• 28 Nov, 2022 17:12

Children's Day 2022 : या 5 ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे मुलांना द्या गुंतवणुकीचे प्राथमिक धडे

Children's Day 2022, Investment Tools for Kid's, Online Investment Platform

Children's Day 2022 : मुलांचे भविष्य सुरक्षित राहण्यासाठी तुम्ही त्यांना लहान वयातच आर्थिक शिस्त लावणे आवश्यक आहे. ही आर्थिक शिस्त लावण्यात काही वेबसाईट्स आणि ऍपची मदत घेता येईल.

लवकरात लवकर किंवा कमी वयात गुंतवणूक करणे आणि बचत करण्याची जाणीव होणे हे  आयुष्यातील आर्थिक व्यवस्थापनासाठी गरजेचे आहेत. तज्ज्ञांच्या मते, चांगले जीवन जगण्यासाठी आर्थिक स्वातंत्र्य आणि आर्थिक नियोजन हे दोन स्तंभ महत्त्वाचे आहेत. मुलांना लहान वयातच आर्थिक परिस्थितीचे ज्ञान देणे हे नंतरच्या आयुष्यात योग्य आर्थिक व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक आहे. प्रत्येक तरुणासाठी गुंतवणूक कशी करावी, हे शिकणे हे महत्त्वपूर्ण जीवन कौशल्य आहे. दुर्दैवाने, आर्थिक व्यवस्थापन कसे करावे हे पूर्णपणे समजून न घेतल्याने तरुणांना भविष्यात आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो.

मुलांना द्या आर्थिक गुंतवणूकीचे शिक्षण (Educate children on Financial Investments)

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, चाचणी आणि त्रुटीतून धडे घ्यायचे असले तरी वित्तीय साक्षरता ही निरंतर वित्तीय व्यवस्थापनाची गरज आहे. दुर्दैवाने, मुले आणि तरुण विद्यार्थ्यांच्या बाबतीत आर्थिक साक्षरता सहसा शिक्षण प्रणालीच्या अभ्यासक्रमातून वगळली जाते. जेव्हा मुलांना आर्थिक व्यवस्थापन कौशल्ये शिकवण्याची वेळ येते, तेव्हा असे काही डिजिटल प्लॅटफॉर्म आहेत जे मुलांना त्यांचे गुंतवणूकीचे शिक्षण सुरू करण्यास मदत करतात.

ट्रेडस्मार्ट (Trade Smart) 

तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करणारी डिस्क्वाउंट ऑनलाइन ब्रोकिंग फर्म आहे. जी तरूण आणि टेक सॅव्ही भारतीयांना गुंतवणूकीचे सुलभ मार्गदर्शन करते. ट्रेडस्मार्ट, गुंतवणूकदार आणि ऑनलाईन ट्रेडर्सना कॅश, फ्युचर्स आणि ऑप्शन्स, करन्सी डेरिव्हेटिव्हज, कमोडिटी, म्युच्युअल फंड आणि इटीएफ साठी ऑनलाईन ट्रेडिंग देऊ करतो. ट्रेडस्मार्ट ब्लॉगच्या माध्यमातून त्यांच्या वापरकर्त्यांसाठी आयपीओ, ट्रेडिंग, स्टॉक्स, इन्व्हेस्टमेंट, शेअर मार्केट आदींबाबत माहिती देतो.

ज्युनिओ (Junio) 

लहान मुलांना आर्थिक शिस्त लावणाचे काम ज्युनिओ करतो. हे लहानमुलांसाठी स्मार्ट कार्ड उपलब्ध करून देतो. ज्यामुळे मुलांना प्रत्यक्षात किंवा डिजीटली खरेदी करण्याची सवय लागते.

झिरोधा (Zerodha) 

ट्रेडिंगसाठी हा पॉकेट फ्रेंडली पर्याय आहे. झिरोधा फ्री आणि ओपन स्टॉक मार्केट आणि फायनान्शिअल चालवतो. शेअरमार्केटचे ज्ञान मिळवू इच्छित प्रत्येकासाठी झिरोधा योग्य पर्याय आहे. झिरोधा आपल्या वेबवर आर्थिक शिक्षण संसाधने ऑफर करते.

फॅमपे (FamPay)

किशोरवयीन मुले आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी हे पेमेंट अॅप आहे. फॅमपेमुळे अल्पवयीन मुले बँक खाते सुरू न करता यूपीआय, पीटूपी आणि कार्ड पेमेंट करू शकतात. हे व्यासपीठ पालक आणि मुलं दोघांसाठी योग्य आहे. येथे पालक आपल्या 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना पैसे पाठवू शकतात, जे मुले कोणत्याही वेळी, कोठेही, पालकांच्या देखरेखीखाली सुरक्षितपणे खर्च करु शकतात. वेबसाइटवर ब्लॉग सुरू करून आणि वापरकर्त्यांकडून वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देत कंपनी आर्थिक साक्षरतेस मदत करते.

अपस्टॉक्स (Upstox)

हे व्यासपीठ व्यापाराच्या संधी उपलब्ध करून देणारी भारतातील एक टेक-फर्स्ट लो-कॉस्ट ब्रोकिंग फर्म आहे. कंपनी आपल्या अपस्टॉक्स प्रो वेब आणि अपस्टॉक्स प्रो मोबाइल ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या इक्विटीज, कमॉडिटीज, करन्सी, फ्युचर्स, ऑप्शन्स अशा विविध सेगमेंटवर ट्रेडिंग प्रदान करते. यामध्ये एक ऑनलाइन शिक्षण केंद्र देखील आहे जेथे एखादी व्यक्ती फ्युचर्स ट्रेडिंग आणि ऑप्शन स्ट्रॅटजिस, म्युच्युअल फंड (Mutual Fund), शेअर मार्केट (Share Market) आणि संपत्ती निर्माण करण्याबद्दल शिकू शकते.