• 31 Mar, 2023 08:45

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Job Opening: नोकरी शोधणाऱ्यांसाठी गुड न्यूज! 'या' पाच बड्या कंपन्यामध्ये मोठी नोकरभरती, अप्लाय करायला विसरु नका

Job Opening

नोकरी शोधणं सध्या थोडं कठीण झालं आहे. कारण, जिकडे पहावं तिकडं लेऑफच्या म्हणजेच कर्मचारी कपातीच्या बातम्या येत आहेत. ज्यांना नोकऱ्या आहेत त्यांना कामावरुन काढलं जात असताना नव्या नोकऱ्या तयार होण्याचा वेग मंदावला आहे. मात्र, सध्या पाच बड्या कॉर्पोरेट्स कंपन्यांमध्ये मास हायरिंग सुरू आहे. या कंपन्यांमध्ये अॅप्लाय करण्याची संधी फ्रेशर्स आणि अनुभवींना आहे.

Job openings In big Companies: नोकरी शोधणं सध्या थोडं कठीण झालं आहे. कारण, जिकडे पहावं तिकडून लेऑफच्या म्हणजेच कर्मचारी कपातीच्या बातम्या येत आहेत. ज्यांना नोकऱ्या आहेत त्यांनाच कामावरुन काढलं जात असताना नव्या नोकऱ्या तयार होण्याचा वेगळी मंदावला आहे. मात्र, सध्या पाच बड्या कॉर्पोरेट्स कंपन्यांमध्ये मास हायरिंग सुरू आहे. या कंपन्यांमध्ये अॅप्लाय करण्याची संधी फ्रेशर्स आणि अनुभवींना आहे.

फेसबुक, अॅमेझॉन, गुगल, मायक्रोसॉफ्टसह अनेक मोठ्या मल्टिनॅशनल कंपन्यांनी कर्मचारी कपात केली. त्यामुळे फ्रेशर्सला जॉब मिळणं आणखी कठीण होऊन बसलं आहे. मात्र, असे असतानाही काही कंपन्या नोकरभरती करत आहेत. पाहूया कोणत्या कंपन्यांमध्ये ओपनिंग आहे. 

नोकरी.कॉम या आघाडीच्या जॉब पोर्टलने नुकताच ‘जॉब स्पीक रिपोर्ट’ तयार केला आहे. यामध्ये असं म्हटलं आहे की, येत्या काही दिवसांत आयटी क्षेत्रात पुन्हा नोकरभरती सुरळीत होईल. त्याखालोखाल रिअल इस्टेट आणि सेवा क्षेत्रातही नव्या संधी निर्माण होतील, असे अहवालात म्हटले आहे.

मागील काही महिन्यांपासून नोकरकपात सुरू असतानाही अॅनॅलिटिक्स, क्लाऊड सिस्टिम, बिग डेटा इंजिनिअर, आग्युमेंटेड रिआलिटी QA टेस्टर आणि अॅडमिनिस्ट्रेटर नोकऱ्यांच्या संधीत वाढ झाली आहे. त्यातही अनुभवी कर्मचाऱ्यांना डिमांड असून फेशर्सची हायरिंग थंडावली आहे.

पीडब्लूसी (PWS Job openings)

PwC या कंपनीने भारतामध्ये 30 हजार नोकरभरती  (PwC hiring) करण्याची घोषणा केली आहे. पीडब्लूसी ही एक आघाडीची फायनान्शिअल सेवा पुरवणारी कंपनी आहे. जगभरामध्ये कंपनीची कार्यालये असून भारतामध्ये पुणे, बंगळुरू, चेन्नई आणि मुंबईसह इतरही मोठ्या शहरांत कार्यालये आहेत. पुढील पाच वर्षात कंपनीकडून 30 हजार नोकरभरती करण्यात येणार आहे. भारतामध्ये येत्या काळात आणखी व्यावसायवृद्धीचे नियोजन कंपनीकडून करण्यात आले आहे. 2028 पर्यंत PwC ची भारतातील कर्मचाऱ्यांची संख्या 80 हजारांपेक्षा होईल, असे कंपनीने म्हटले आहे.

इन्फोसिस (Infosys Job openings)

लिंक्डइनवरील माहितीनुसार इन्फोसिस कंपनीमध्ये 4,263 जागा भरण्यात येणार आहेत. सॉफ्टवेअर, QA, कंन्सल्टिंग, प्रोजेक्ट आणि प्रोग्राम मॅनेजमेंट, इंजिनिअरिंग, हार्डवेअर, नेटवर्क आणि इन्फॉरमेशन सिक्युरिटी क्षेत्रात या संधी उपलब्ध आहेत. इन्फोसिस ही भारतातील आघाडीची माहिती तंत्रज्ञान कंपनी असून कंपनीच्या अधिकृत साइटवर तुम्ही जॉबच्या संधी पाहू शकता.

एअर इंडिया नोकरी (Air India job openings)

एअर इंडिया आपल्या ताफ्यातील विमानांची संख्या 480 ने वाढवणार आहे. नुकतेच कंपनीने विमान खरेदीची मोठी डील केली. त्यानंतर मात्र, कंपनीला मनुष्यबळाची कमतरता भासणार असल्याचे दिसून येत आहे. कंपनीने पायलट आणि क्रू मेंबरसाठी 4 हजारांची नोकरभरती 2023 सालासाठी काढली आहे.

टीसीएस जॉब ओपनिंग (TCS job openings)

टीसीएस कंपनीकडूनही येत्या काळात नोकरभरती होणार आहे. कंपनीचे मुख्य ह्युमन रिसोर्स अधिकारी मिलिंद लक्कड यांनी नोकरभरती करणार असल्याचे सुतोवाच नुकतेच दिले आहेत. टीसीएस कंपनी पूर्णपणे नोकरभरती बंद करणार नसून येत्या काही दिवसांत हजारांमध्ये भरती निघेल, असे ते म्हणाले. नक्की किती जागा टीसीएसमध्ये भरण्यात येतील, याचा आकडा त्यांनी दिला नाही. टीसीएस भारतातील सर्वात मोठी आयटी कंपनी असल्याने काही हजारांमध्ये नक्कीच नोकरभरती होऊ शकते.

विप्रो (Job openings at Wipro)

विप्रो कंपनीमध्ये 3,292 नोकरीच्या संधी आहेत. कस्टमर सक्सेस, ऑपरेशन, इंजिनिअरिंग, कंटेट रिव्ह्यू, मार्केट लीड, फायनान्स, अकाउंट अशा विविध डिपार्टमेंट्समध्ये या जागा आहेत. या जॉबच्या संधी तुम्ही थेट कंपनीच्या संकेतस्थळावर पाहू शकता. किंवा लिंक्डइन, नोकरी.कॉम अशा साइट्सवर पाहू शकता.