Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Republic Day Parade Tickets Prices: तुम्हाला प्रजासत्ताक दिनी राजपथावरील परेड पाहण्यासाठी तिकीट दर माहिती का?

Republic Day Parade Tickets Prices & Booking

Image Source : http://www.thequint.com/

Republic Day Parade Tickets Booking: तुम्हाला माहिती का, प्रजासत्ताक दिन दिवशी राजपथावरील परेड पाहण्यासाठी तिकिटीचे दर किती असतात व ते तिकिट ऑनलाईन कसे बुक करायचे. यासाठी खालील टीप्स करा मग फॉलो

How to Get Tickets For Republic Day Parade 2023: प्रजासत्ताक दिवशी (Republic Day) म्हणजे दर वर्षी 26 जानेवारीला दिल्ली येथे राजपथावर (Rajpath) परेडचे आयोजन केले जाते. ही परेड पाहण्याचे स्वप्न प्रत्येक भारतीय नागरिकाचे असते. जसे की, आयुष्यात एकदा तर राजपथवरील परेड (Rajpath Parade) पाहण्याची संधी मिळावी. पण ही संधी कशी मिळवायची, ही परेड प्रत्यक्षात सर्व सामान्य नागरिक पाहू शकतात का? असे अनेक प्रश्न तुमच्या मनात असतात. एवढेच नाही तर हे परेड पाहण्यासाठी तिकिट पण असते, हा प्रश्नदेखील डोक्यात आला असेल, हे नक्की. म्हणूनच खास तुमच्यासाठी प्रजासत्ताक दिवशी राजपथावरील परेड पाहण्यासाठी ऑनलाईन तिकिट (Online Tickets) कसे बुक करायचे व तिकिटाची किंमत काय आहे, या सर्व गोष्टी घेऊन आलो आहोत. 

परेड पाहण्यासाठी तिकिटाचे दर (Ticket Prices to watch the Parade)

प्रजासत्ताक दिवशी परेड पाहण्यासाठी राजपथावर जगाच्या कोपऱ्यातून लाखो लोक येत असतात. या दिवशी भारतीय विविधतेचे दर्शन विविध माध्यमातून पाहायला मिळते. प्रत्येक राज्य आपआपली संस्कृती सुंदर व आकर्षकरीत्या सादर करते. विशेष म्हणजे यातूनदेखील राज्याचे सर्वोत्तम दर्शन घडविणाऱ्या राज्यास बक्षिसदेखील दिले जाते. महाराष्ट्रानेदेखील या स्पर्धेत बाजी मारली आहे. अशी भारतीय विविधतेने नटलेली ही परेड पाहण्यासाठी ऑनलाईन तिकिट खरेदी करू शकता. ते ही घरबसल्या, तुम्हाला कुठे ही जाण्याची गरज नाही. पोर्टलवर या तिकिटांची विक्री सकाळी 9 वाजल्यापासून सुरू होते. या तिकिटांची किंमत साधारण 20 रूपयांपासून ते 500 रूपयांपर्यंत असते. 

ऑनलाइन तिकीट करा बुक (Online Ticket Booking)

सर्वप्रथम www.aaamantran.mod.gov.in या वेबसाइटला भेट देवून लॉगिन करा. यानंतर मोबाईल नंबर टाइप केल्यानंतर कॅप्चा टाकल्यास Send OTP वर क्लिक करा. मिळालेला OTP टाकल्यानंतर तुमचे लॉगिन यशस्वी होईल. जर तुम्ही अगोदर रजिस्टर केले नसेल, तर तुम्हाला साइन अप करावे लागणार. यासाठी तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती अपडेट करावी लागेल. यानंतर  OTP आला की, तो अपडेट करा आणि आपल्याल्या जो कार्यक्रम पाहायचा आहे, त्याची निवड करा.यामध्ये तुम्हाला रिपब्लिक डे परेड, रिपब्लिक डे परेड, रिहर्सल - बीटिंग द रिट्रीट, बीटिंग द रिट्रीट - एफडीआर आणि बीटिंग द रिट्रीट सेरेमनी या कार्यक्रमांचे पर्याय दिसतील. रजिस्टर यशस्वी झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा लॉगिन करावे लागणार आहे. यानंतर तुम्हाला तुमच्यासोबत परेड पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तींची वैयक्तीक माहिती अपडेटसोबतच ओळखपत्रदेखील अपलोड करावे लागेल. तसेच काही माहितीदेखील भरावी लागेल. यानंतर पेमेंट प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.  सर्वात शेवटी म्हणजे सर्व तिकिटांवर एक युनिक QR कोड दिला आहे, जो परेडच्या ठिकाणी स्कॅन केला जाणार आहे.

ऑफलाइन तिकीट कुठे उपलब्ध (Where to Find Offline Tickets)

तुम्ही ऑनलाइन तिकीट बुक व्यतिरिक्त ऑफलाइन तिकिटेदेखील खरेदी करू शकता. ही तिकिटे तुम्हाला प्रगती मैदान, सेना भवन, जंतरमंतर, शास्त्री भवन आणि संसद भवन या ठिकाणावरून खरेदी करता येणार आहेत.