Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Katraj Milk: दुग्ध व्यवसायकांसाठी आनंदाची बातमी, जाणून घ्या कात्रज दुधाच्या दरात किती रूपयांची दरवाढ झाली?

Price of Katraj Milk has Increased

Image Source : http://www.katrajdairy.com/

Price of Katraj Milk has Increased: शेतकरी व दुग्ध व्यवसाय करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गाईच्या दुधात 2 रूपयांची वाढ करण्यात आली आहे. हा दुध वाढीचा निर्णय पुणे जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघाच्या संचालक मंडळाच्या (कात्रज डेअरी) सभेमध्ये घेण्यात आला आहे.

Katraj Milk Price Hike: गाईच्या दुधाच्या किंमतीत वाढ झाल्याने दुग्ध व्यवसायिक व शेतकरी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अर्थसंकल्प जाहीर होण्यापूर्वीच हा आनंद मिळाल्याने शेतकरी व दुग्धव्यवसायिक आनंदी झाला आहे. पण हा दूध वाढीचा निर्णय का घेण्यात आला याविषयी थोडक्यात जाणून घेवुयात.

दुध वाढीचा निर्णय का? (Why the Decision to Increase the Milk Rate)

कात्रज डेअरीच्या अध्यक्षा केशरताई म्हणाल्या की, जनावरांमधील लम्पी आजार, पशुखादयांचे वाढते दर व पेट्रोल व डिझेलच्या दरात झालेल्या वाढीमुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकरी व दुग्ध उत्पादक यांना मदत करण्याच्या हेतूने हा दुध दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. 

कधीपासून होणार दरवाढ? (From when will the Price Increase)

कात्रज दूधाच्या किंमतीत 1 फ्रेबुवारीपासून दोन रूपायांची दरवाढ होणार आहे. या दुधाच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय पुणे जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. आता या दुधाची किंमत प्रतिलिटर 37 रूपये 50 पैसे होणार आहे. यामध्ये गाईच्या दुधाचा 3.5 फॅट व 8.5 एसएनएफसाठी खरेदी दर संस्थेचा वरकड खर्च सर्व धरून ही दुधाची किंमत ठरविण्यात आली आहे. म्हशीच्या दुध खरेदीमध्ये कोणतीही वाढ करण्यात आली नाही. फक्त विक्रीदरात दोन रूपयांनी वाढ करण्यात आली. त्यामुळे आता कात्रज डेअरीच्या दुधाचे दर हे टोण्ड, डबल टोण्ड, प्रमाणित व मलई दुधाच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांची दरवाढ करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे. कात्रज दुधचे संकलन पंधरा दिवसांपूर्वी साधारण 2 लाख 15 हजार लिटर इतके होते, या आकडयात घट होऊन आता 1 लाख 92 हजार लिटरपर्यंत खाली आले असल्याचे सांगितले जात आहे.