Financial Resolutions: नवीन वर्षासाठी आपण लोकांचे अनेक संकल्प ऐकले पण आर्थिक संकल्प कोणी केले असल्याचे साधारण कानावर पडत नाही. आपल्या भविष्यासाठी आर्थिक संकल्प ही सर्वात महत्वपूर्ण बाब आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. जेणेकरून येत्या वर्षभरात पैशाचे व्यवस्थापन मजबूत राहील आणि आवानात्मक परिस्थितीत आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही. हे लक्षात घेऊन, 2023 साठी म्युच्युअल फंड हाऊस एचडीएफसी म्युच्युअल फंडाने, गुंतवणूकदारांना 5 आर्थिक संकल्प करण्याचा सल्ला दिला आहे.
Table of contents [Show]
गुंतवणूक करण्याची सवय लावा (Investment Habit)
2023 मध्ये गुंतवणूक (Investment) करण्याचा संकल्प करा. हा संकल्प भविष्यात आर्थिकसंबंधी गोष्टींची चणचण भासू देणार नाही. यासाठी म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याचे नियोजन करा. तुमच्या बजेट व गरजांनुसार फंडची निवड करा. कोणत्याही फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्यासंबंधी संपूर्ण माहिती जाणून घेणे आवश्यक आहे.
गुंतवणुकीची रक्कम वाढवा (Increase Investment Amount)
नवीन वर्षात सर्वात महत्वाचे म्हणजे तुमच्या गुंतवणुकीची रक्कम वाढविण्याचा संकल्प करा. यासाठी तुम्ही एसआयपीव्दारे गुंतणवूकीची रक्कम वाढवू शकता. एसआयपी हा कमी तोट्यात गुंतवणूक करण्याचा एक सोपा मार्ग आहे. ज्यामध्ये तुम्ही दर महिन्याला किंवा मध्यांतराने निश्चित रक्कम गुंतवून एक मोठी बचत करू शकता.
ऑटो डेबिट (Auto Debit)
सोशल मिडीयाच्या दुनियेत आता गुंतवणूक करणेही सोपे झाले आहे. आजच्या काळात ऑटो डेबिट करणे अवघड नाही. युटिलिटी बिले, क्रेडिट कार्ड बिले यांसारखी पेमेंट ऑटो डेबिट करणे हा एक चांगला आर्थिक निर्णय आहे. कारण आपण पेमेंट करणे विसरल्यास उशीरा पेमेंट किंवा शुल्क भरण्याचा त्रास वाचू शकतो.
पोर्टफोलिओचा आढावा घ्या (Financial Portfolio)
2023 मध्ये तुमच्या आर्थिक पोर्टफोलिओ म्हणजेच तुमच्या आर्थिक बाबींचा आढावा घ्या. तुम्ही कुठे व किती गुंतवणूक केली याचा विचार करा. यात काही बदल करता येईल का याचा विचार करा. त्यानुसार आणखी कोणत्या मार्गाने गुंतवणूक करता येईल का हा संकल्प आवश्य करा. जेणेकरून तुमची बचत करण्याची रक्कम वाढवू शकेल.
आपत्कालीन निधीचे करा नियोजन (Emergency Fund)
नवीन वर्षातील सर्वात महत्वाचा संकल्प म्हणजे आपत्कालीन फंडचे नियोजन करणे. जो आजारपण, नोकरी गमावणे यासारख्या अचानक येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी प्रभावी ठरतो. कारण आयुष्यात कधीही अनपेक्षित काहीही घडू शकते. यासाठी तुम्ही तयार असावे. म्हणूनच आपत्कालीन निधी नेहमी वेगळा ठेवा. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, आपत्कालीन निधीमध्ये तुमच्या 3-6 महिन्यांच्या मासिक खर्चाएवढी रक्कम असावी. उदा, इमर्जन्सी फंड फ्लेक्सी एफडी, ओव्हरनाइट म्युच्युअल फंड, सेव्हिंग अकाऊंट यांसारख्या स्वरूपात असावे, जो निधी तुम्ही गरजेनुसार लगेच काढू शकता.