Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Financial literacy: नोकरीच्या सुरुवातीलाच रिटायरमेंट प्लॅनिंग करणे का असते गरजेचे?

Financial literacy

Financial literacy:रिटायरमेंट प्लॅनिंग ही निवृत्तीनंतर किवा निवृत्तीच्या अगोदर काही वर्षे करायची गोष्ट आहे, असे अनेक जण समजतात. यामुळे निवृत्तीचा काळ हा खूपच कठीण होऊन बसतो. यासाठी नोकरीला सुरुवात करतानाच याकडे गंभीर्याने पाहणे आवश्यक आहे.

नोकरीच्या सुरुवातीच्या टप्प्यात निवृत्तीचे नियोजन करणे ही कल्पनाच अनेकांना विचित्र वाटू शकते. जर नव्याने नोकरी करू लागलेल्या उमेदवाराला कुणी विचारले  की, रिटायरमेंटसाठी काय गुंतवणूक करतोस तर तो कदाचित असे म्हणेल की, ‘’थांबा थोड. आत्ताच तर नोकरीला लागलोय. अजून 30 ते 40 वर्ष आहेत निवृत्तीला.’’ 

पण हा विचार कदाचित भविष्यात फार त्रासदायक ठरू शकतो. वयाच्या साठीनंतर नोकरी किवा रोजगारासाठी काही काम करणे बऱ्याच जणांसाठी कठीण होऊन बसते. या वयात आरामाची  गरज देखील जास्त असते. उमेदीच्या काळाप्रमाणे आपण धावपळ या वयात करू शकत नाही. रिटायरमेंट प्लॅनिंग नोकरीला लागताच करण्याची आवश्यकता का आहे, ते स्पष्ट होण्यासाठी अशा काही मुद्यांचा विचार करूया. 

1) आत्मसन्मानाने जगता येते 

आत्मसन्माने जगता येणे याला आयुष्यात खूप महत्व आहे. तरुण वयात आपल्याला हा प्रश्न काही वेळा समोर येत नाही. नोकरी करत असल्याने पैसे येत असतात. यामुळे आपल्या आर्थिक गरजांसाठी परावलांबन नसते. मात्र निवृत्तीनंतर दरमहा निश्चित असे पैसे मिळायचे अचानक बंद होऊन जातात. यामुळे आर्थिक बाबतीत कुणावर तरी अवलंबून राहण्याची वेळ अनेकांवर येते. यातूनच आत्मसन्माने जगणे काही वेळा कठीण होऊन बसते. अशा प्रकारचे अनुभव ज्येष्ठाकडून  कधी ना कधी ऐकले असतीलच!

2) Financial freedom लवकर मिळू शकते

नोकरीला सुरुवात केल्यावर लगेच रिटायरमेंटचा प्लॅन केल्यास पैसे साठायला लवकर सुरुवात होते. साठलेल्या पैशावर चक्रवाढ पद्धतीने व्याज मिळू लागते. आणि यामुळे एक मोठी रक्कम तयार होत जाते. यातून निवृत होण्याचा निर्णय लवकर घ्यावासा वाटला तरी तो घेता येतो. समजा तुम्ही 30 वर्षाचे आहात आणि रिटायरमेंटसाठी दरमहा 5 हजार रुपये पब्लिक प्रॉव्हीडंटमध्ये गुंतवू लागलात तर साठाव्या वर्षी निवृत्त होताना 61 लाख 80 हजार 364 इतकी maturity रक्कम तयार होते. 

पण जर तुम्ही पाच ते दहा वर्ष अगोदर ही गुंतवणूक सुरू केलीत तर तेवढी रक्कम जमा व्हायला साठाव्या वर्षापर्यंत थांबायची गरज लागत नाही. त्या अगोदरच म्हणजे पन्नास-पंचावनव्या वर्षी वाटले की,  आपल्याकडे पुरेशी रक्कम जमा झालेली आहे. आता आपल्याला काम करण्याची गरज नाही. तर अशा स्थितीत नियोजन केलेले असल्याने निवृत्तीचा निर्णय लवकर घेता येतो. म्हणजेच Financial freedom लवकर मिळू शकते.

retirement-planning-necessary-1-1.jpg

3) Power of  compounding चा लाभ जास्त मिळतो  

Power of compounding हा शब्द बऱ्याच वेळा तुमच्या कानावरुन गेला असेल. हा लाभ जास्तीत जास्त तेव्हा मिळतो जेव्हा तुम्ही लवकरात लवकर गुंतवणूक सुरू करता. मगाचचे उदाहरण बघा. दरमहा तुम्ही PPF मध्ये 5 हजार रुपये गुंतवायला सुरुवात केलीत तर 20 वर्षानंतर जमा झालेली रक्कम असेल 12 लाख रुपये तर व्याजासह एकूण मिळणारी रक्कम असेल 26 लाख 63 हजार 315 रुपये. दरमहा एवढेच पैसे  आणखी 10 वर्षासाठी गुंतवले तर  तर किती मिळातील? या वेळी ही maturity रक्कम 61 लाख 80 हजार 364 रुपये इतकी असेल. रिटायरमेंट तरतुदीसाठी आणखी 10 वर्ष तुम्हाला मिळाली तर मिळणारी रक्कम असेल 1 कोटी 31 लाख 63 हजार 864 रुपये.  याचाच अर्थ हा की, तुम्ही जितक्या लवकर गुंतवणूक सुरू कराल तितका power of compounding चा तुम्हाला जास्त  लाभ मिळेल.

हे सर्व रिटर्न मोजण्यासाठी  Groww च्या  calculator चा आधार घेतला  आहे.यात आणखी एक महत्वाचा मुद्दा असा की, हे परताव्याचे आकडे हे विषय नेमकेपणाने समजावा यासाठी आहे. PPF वर आणखी 30 वर्षानी किती परतावा मिळेल ते कुणीही आत्ताच  सांगू शकत नाही. कारण PPF वर किती व्याज मिळेल हे वेळोवेळी निश्चित होत असते. सध्या 7.1 टक्के इतका व्याजाचा दर आहे आणि पुढील परतावा मोजण्यासाठी त्याचाच आधार घेतला आहे. 

4)मेडिकल खर्चाची तरतुद, इन्शुरन्स 

रिटायरमेंटचे प्लॅनिंग लवकर सुरू करणे हे आणखी एका दृष्टीने महत्वाचे ठरते. उतारवयात आरोग्याचे प्रश्न जास्त तीव्रतेने भेडसावण्याची शक्यता असते. या कालावधीत एखादा आजार, दुखण यामुळे डॉक्टर, वेगवेगळ्या प्रकारच्या तपासण्या, औषधे यासाठी मोठा खर्च समोर येण्याची शक्यता असते. काही वेळा हा खर्च नियमितपणे करावा लागतो. मात्र नोकरीला लागल्यावर सुरुवातीच्या टप्प्यातच याचा विचार केल्यास निवृत्तीनंतर या प्रश्नाला सामोरे जाणे सोपे होते. अगोदरच योग्य ती विमा पॉलिसी घेऊन ठेवता येते.

रिटायरमेंटसाठी गुंतवणूकीचे विविध  पर्याय उपलब्ध 

या अशा बाबींचा विचार करता निवृत्तीनंतर दरमहा एक निश्चित रक्कम हातात येणे गरजेचे असते. यासाठी नोकरीला लागल्यावरच याचे नियोजन करावे लागते. यासाठी वेगवेगळे पेन्शन प्लॅन देखील उपलब्ध असतात. बऱ्याच ठिकाणी आपण जिथे नोकरीला असतो तिथे employment provident fund (EPF) ची तरतूद असते. नोकरीच्या ठिकाणी तो नसेल तर अन्य पर्यायांचा विचार करावा लागतो. यादृष्टीने त्यापेक्षा थोडस कमी व्याज असणारा PPF म्हणजेच पब्लिक प्रॉव्हीडंटचा पर्याय  सर्वांसाठी उपलब्ध असतो. सुरक्षित परतव्याच्या दृष्टीने हे दोन पर्याय आकर्षक ठरतात. यातला इपीएफचा पर्याय सगळ्यांना उपलब्ध होईल असे नाही पण पीपीएफचा पर्याय मात्र सगळ्यांसाठी उपलब्ध असतो. याचप्रमाणे रिटायरमेंटच्या अनुषंगाने म्युच्युअल फंड स्कीमचा देखील विचार केला जातो. एनपीएस म्हणजेच नॅशनल पेन्शन सिस्टिम हा देखील विविधता देणारा पर्याय आहे. यातून इक्विटीमध्ये देखील 75 टक्क्यापर्यंत गुंतवणूक करण्याची संधी मिळते. 60 वर्षांतर तुमच्या जमा झालेल्या रकमेचा एक मोठा भाग तुम्हाला मिळतो आणि एक भाग दरमहा पेन्शन रूपाने मिळत राहतो. अशा प्रकारे रिटायरमेंटसाठी  तयार झालेले विविध पर्याय आहेत. आपल्या गरजा ,जोखीम घेण्याची क्षमता याचा सारासार विचार करून योग्य तो निर्णय घेणे महत्वाचे ठरते.  

या  काही सर्वसामान्यपणे लोकप्रिय असलेल्या गुंतवणूक योजना आहेत. तुमच्या गरजेप्रमाणे , उद्दिष्टाप्रमाणे तुम्ही  कशात गुंतवणूक करायची ते ठरवणे योग्य ठरते. मात्र नोकरीला लागल्यावर शक्य तितक्या लवकर याची सुरुवात केल्यास वर उल्लेखिलेले फायदे तुम्हाला मिळू शकतात. या सगळ्याविषयी आवश्यक असणारी माहिती 'महामनी' ने मराठी भाषेत उपलब्ध करून दिल