Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Earning money : मनोरंजनासोबत कमाईही! काय आहे इन्स्टाग्रामवर रील्स बनवून पैसा कमवण्याचा फंडा?

Earning money : मनोरंजनासोबत कमाईही! काय आहे इन्स्टाग्रामवर रील्स बनवून पैसा कमवण्याचा फंडा?

Earning money : सोशल मीडिया हे केवळ मनोरंजनाचं साधन राहिलेलं नसून यातून लाखोंची कमाई होत आहे. अनेकजण रील्स बनवून यातून पैसे कमावत आहेत. इन्स्टावरच्या रील्स पाहणं सर्वांनाच आवडतं. यातून मनोरंजन होतं, माहिती मिळते. अनेकजण गुंतवणुकीचे सल्ले देणाऱ्या रील्स बनवल्या जात असून यातून मोठी कमाईही केली जात आहे.

सोशल मीडियाच्या (Social media) माध्यमातून रील्स बनवून फायनान्स इन्फ्लूएन्सर्स किंवा फिन्फ्लुएन्सर्स प्रचंड पैसा कमावत आहेत. आर्थिक बाबी, गुंतवणूक अशा विविध बाबींशी संबंधित या रील्स (Reels) आहेत. सर्वसामान्यांचा उद्देश खरं तर मनोरंजन असतो. मात्र या रील्स मनोरंजनासह वित्तविषयक सल्लाही (Financial advice) देत आहेत. त्यामुळे अशा रील्सना प्रतिसादही चांगला मिळतोय. मिंटनं याचा आढावा घेतलाय. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कोणत्याही विषयाशी संबंधित रील्स बनवणाऱ्याला इन्फ्लूएन्सर म्हटलं जात. काही रील्स आर्थिक बाबींशीही निगडित असतात. त्या फिन्फ्लुएन्सर्सकडून तयार केल्या जातात. काही सेकंदांचा किंवा मिनिटांचा हा एक छोटा व्हिडिओ (Video) असतो. अत्यंत कमी वेळात अधिक माहिती किंवा मनोरंजन हा रील्सचा उद्देश असतो. मात्र या छोट्या व्हिडिओतूनही मोठी कमाई (Earning) शक्य आहे.

पर्याय कोणते?

रील्समधून पैसा कमवण्याचा सर्वात वापरला जाणारा मार्ग म्हणजे पेड पार्टनरशीप. जेव्हा फिनटेक कंपन्यांना लोकांचं लक्ष वेधून घ्यायचं असतं त्यावेळी ते फिन्फ्लुएन्सर्स त्यातही अधिक लोकप्रिय फिन्फ्लुएन्सर्सना संपर्क साधत असतात. हे फायनान्सर आपल्या कंपन्यांच्या उत्पादनांशी तसंच जाहिरातींशी संबंधित व्हिडिओ बनवतात. त्या बदल्यात त्यांना त्यांच्या फॉलोअर्स आणि सबस्क्रायबर्सच्या आधारावर पैसे दिले जातात. दुसरीकडे फिन्फ्लुएन्सर्स आपल्या फॉलोअर्स आणि सबस्क्रायबर्सना कंपनीशी संबंधित लिंक शेअर करतात. त्यावर क्लिक केल्यानंतर इन्फ्लूएन्सर्सना कंपनीकडून पैसे दिले जातात.

कंपन्यांना फायदा

फिन्फ्लुएन्सर्ससोबत काम केल्याचा कंपन्यांनाही फायदा होतो. कंपन्यांना त्यांचे फॉलोअर्स तसंच सबस्क्रायबर्सचा सपोर्ट मिळतो. त्यांची विश्वासार्हता तसंच व्हिडिओंमुळे आपलं प्रॉडक्ट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत मिळते. 30 सेकंदाच्या टीव्ही जाहिरातीत त्यांना हे सर्व करणं शक्य नसतं. याशिवाय हे फायनान्स फिन्फ्लुएन्सर्स त्यांच्या संबंधित फॉलोअर्स तसंच सबस्क्रायबर्ससाठी अनेक वित्त सल्ला अभ्यासक्रमदेखील (Cource) देतात. यासाठी जर त्यांनी ठराविक शुल्क आकारलं तर त्यांची कमाई अधिकची होते.

प्रभावी फिन्फ्लुएन्सर्स

इन्स्टाग्रामवर काही प्रसिद्ध फिन्फ्लुएन्सर्स आहेत. त्यांच्या फॉलोअर्सची संख्या लाखोंच्या घरात आहे. काही उदाहरणं पाहता येतील. अक्षत श्रीवास्तवचे 1.43 लाख फॉलोअर्स आहेत. अंकुर वारीको यांचे 22 लाख, बूमिंग बुल्सचे 2.72 लाख, फिनोव्हेशन झेडचे 1.68 लाख, कामगार कायदा सल्लागाराचे 5.12 लाख, प्रांजल कामरा यांचे 7.71 लाख, रचना रानडे यांचे 9.37 लाख आणि शरण हेगडे यांचे 22 लाख फॉलोअर्स आहेत.

विविध कंपन्यांचा पेड कंटेंट

इन्स्टाग्रामशिवाय त्यांचे यूट्यूब, लिंक्डइन, फेसबुक तसंच ट्विटरवर लाखो फॉलोअर्स आणि सबस्क्रायबर्स आहेत. हे सर्वच जण विविध प्लॅटफॉर्मवरून आपली कमाई करतात. गुगल अ‍ॅड्स तसंच फेसबुक अ‍ॅड्समधून मिळणारं उत्पन्न हा यातला सर्वात महत्त्वाचा घटक ठरतो. झिरोधा (Zerodha), फिनशॉट (Finshot), स्मॉलकेस (Smallcase), क्रेड (Cred), मोबिक्विक (Mobikwik), अपस्टॉक्स (Upstox), वझीर एक्स (Wazir X), कोटक लाइफ इन्शूरन्स (Kotak Life Insurance), आयएनडी मनी (IND Money) आणि डिट्टो (Ditto) अशा काही कंपन्या पेड कंटेंटसाठी या सर्वांना पैसे देत असतात.

सेबी तयार करणार नियमावली

फिनटेक स्टार्टअप कंपनीच्या एका कर्मचाऱ्यानं ज्याचा फिन्फ्लुएन्सरशी मार्केटिंग करार आहे, त्यानं मिंटला दिलेल्या माहितीनुसार, कंपन्यांना त्यांच्या अ‍ॅक्टिव्ह यूझर्सपैकी 50 टक्के यूझर्स या फिन्फ्लुएन्सर्सकडून मिळत आहेत. त्यामुळे त्यांना चांगले पैसेही दिले जात ​​आहेत. झिरोधाच्या मते, फिनइन्फ्लुएन्सर्सद्वारे ते येणाऱ्या महसुलावर सरासरी 10 टक्क्यांपर्यंत कमिशन देतात. बाजार नियामक सेबीनं अलीकडेच या फिन्फ्लुएन्सर्सबाबत नियामक प्रणाली तयार करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. जे लोक शेअर मार्केटसारख्या जोखीम असलेल्या पर्यायामध्ये गुंतवणूक करतात, त्यांना फिन्फ्लुएन्सर्सच्या सल्ल्यानं नुकसान होणार नाही, यासाठी अशाप्रकारची नियमावली तयार केली जाण्याची शक्यता आहे.