Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Reels : रील्सचे व्ह्यूज आणि लाईक्स कसे वाढवायचे? जाणून घ्या

Reels

सोशल मीडियाच्या (Social Media) या काळात या माध्यमांचा वापर केवळ माहितीचे आदान-प्रदान करणे एवढाच राहिला नसून या माध्यमांद्वारे उत्पन्नाचे वेगवेगळे स्रोत सुद्धा निर्माण झाले आहेत. अनेक सोशल मीडिया प्रेमी रील्सद्वारे केवळ मनोरंजन करत नसून बक्कळ पैसे देखील कमवत आहे. पण त्यासाठी तेवढे लाईक्स आणि व्ह्यूज मिळवणे आवश्यक आहे. ते कसे मिळवायचे? ते आज आपण पाहणार आहोत.

एक काळ असा होता की यूट्यूब(YouTube) वर कमाई करता येत होती. पण आता काळ बदलत आहे, लोक यूट्यूब पेक्षा शॉर्ट व्हिडिओज (Short Videos) आणि रिल्स (Reels) जास्त पाहतात. त्यामुळे यूट्यूबवर व्ह्यूज आणि लाईक्समध्ये घट झाली आहे. रील्सवरील व्ह्यू आणि लाईक्स कसे वाढवायचे? ज्यामुळे तुमची चांगली कमाई होईल ते आज आपण पाहणार आहोत.

असे वाढवा रील्सवरील ट्रॅफिक

इन्स्टाग्राम आणि फेसबुक आणि व्हॉट्सअॅप हे तिन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मेटा कंपनीचे आहेत. अशा परिस्थितीत जर तुम्ही इन्स्टाग्रामवर रील तयार केली तर त्याचा फायदा म्हणजे फेसबुकवर आपोआप शेअर करण्याचा पर्याय दिला जातो. तसेच तुम्ही रील्स WhatsApp मेसेज आणि स्टेटस म्हणून शेअर करू शकता. अशा प्रकारे तुम्ही रील्सवर जास्तीत जास्त ट्रॅफिक मिळवू शकता.

रील्सला फेसबुकवर ऑटोमॅटिक शेअर करा

फेसबुकवर रील्स आपोआप शेअर करण्यासाठी इंस्टाग्राम सेटिंगमध्ये काही बदल करावे लागतील. 

  • स्टेप 1 - पहिल्यांदा इन्स्टाग्राम (Instagram) उघडा.
  • स्टेप 2 - यानंतर तुम्हाला प्रोफाइल ऑप्शनला भेट द्यावी लागेल.
  • स्टेप 3 - नंतर वरच्या उजव्या कोपऱ्यात तीन लाईन दिसतील, ज्यावर क्लिक करावे लागेल.
  • स्टेप 4 - यानंतर, तुम्हाला Setting पर्यायावर क्लिक करावे लागेल आणि नंतर Account पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • स्टेप 5 - नंतर Share to other Apps वर क्लिक करा.
  • स्टेप 6 - यामध्ये तुम्हाला Facebook, Twitter, WhatsApp या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • स्टेप 7 - त्यानंतर तुम्हाला ज्या प्लॅटफॉर्मवर रील शेअर करायची आहेत, त्यावर क्लिक करून परवानगी द्यावी लागेल.

आगामी काळात रील्सचे महत्व

जर तुमच्या रील्सला लाखो व्ह्यूज मिळाले तर तुम्ही तुमच्या रील्सचे प्रमोशन करून कमाई करू शकता. पेड कंन्टेंट प्रमोशनसाठी ब्रँडसोबत भागीदारी देखील करू शकता. याशिवाय, लवकरच यूट्यूब, मेटाद्वारे लहान व्हिडिओंचे मॉनिटाइज केले जाणार आहे, अशा परिस्थितीत आगामी काळात रील्स बनवून मोठी कमाई केली जाऊ शकते.