Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Fantasy Sports Investment: ऑनलाइन गेमिंग कंपन्यांमधील गुंतवणूक वाढली; छोट्या शहरांतून फॅन्टसी स्पोर्ट्सला मोठा प्रतिसाद

Fantasy

Image Source : www.news.mit.edu

फॅन्टसी गेम खेळणाऱ्यांचे प्रमाण भारतामध्ये वाढत चालले आहे. सध्या आयपीएलचा मौसम सुरू असल्याने फॅन्टसी स्पोर्ट्स ची चलती तुम्ही पाहत असालच. गल्लीबोळात आणि चौकांमध्ये बसून तरुणांपासून वयोवृद्ध टीम तयार करण्यात व्यस्त आहे. आश्चर्याची बाब म्हणजे मेट्रो आणि बड्या शहरांपेक्षा लहान शहरे, ग्रामीण भागातून फॅन्टसी स्पोर्ट्सला जास्त प्रतिसाद मिळत आहे.

Fantasy Sports Investment: फॅन्टसी गेम खेळणाऱ्यांचे प्रमाण भारतामध्ये प्रत्येक वर्षी वाढत चालले आहे. सध्या आयपीएलचा मौसम सुरू असल्याने फॅन्टसी स्पोर्ट्स ची चलती तुम्ही पाहत असालच. गल्लीबोळात बसून तरुणांपासून वयोवृद्ध आपली टीम तयार करण्यात व्यस्त आहे. आश्चर्याची बाब म्हणजे मेट्रो आणि बड्या शहरांपेक्षा लहान शहरे, ग्रामीण भागातून फॅन्टसी स्पोर्ट्सला जास्त प्रतिसाद मिळत आहे.

फॅन्टसी स्पोर्ट्स कंपन्यांमधील परदेशी गुंतवणूक सर्वाधिक

फॅन्टसी स्पोर्ट्स हे ऑनलाइन गेमिंग अंतर्गत मोडते. मागील काही वर्षात अनेक नव्या कंपन्या या क्षेत्रात उतरल्या आहेत. ऑनलाइन गेमिंगमधील संधी पाहता या कंपन्यांना भांडवलाचीही गरज पडू लागली. 2022-23 आर्थिक वर्षात फॅन्टसी स्पोर्ट्स् मधील कंपन्यांनी 15 हजार कोटींची गुंतवणूक मिळवली. यापैकी 66% म्हणजेच सुमारे 10 हजार कोटींची गुंतवणूक परदेशातून (FDI in online gaming) आली. उर्वरित गुंतवणूक देशांतर्गत कंपन्यांनी केली आहे.

300 फॅन्टसी स्पोर्ट्स प्लॅटफॉर्म्स

भारतात सुमारे 300 पेक्षा जास्त फॅन्टसी स्पोर्ट्स प्लॅटफॉर्म्स असून 18 कोटींपेक्षा जास्त युझर्स आहेत. आर्थिक वर्ष 2022 मध्ये फॅन्टसी स्पोर्ट्स क्षेत्राची वाढ 31% झाली. यामुळे महसूल 6800 कोटींनी वाढला. 2027 पर्यंत या क्षेत्राचा महसूल 25,240 कोटींपर्यंत पोहचले अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

एकूण युझर्सपैकी 60 टक्के  युझर्स हे टायर 2 आणि टायर 3 शहरांतील आहेत. FY22 मध्ये फॅन्टसी गेम्समुळे सुमारे 13 हजार कौशल्याधारित प्रत्यक्ष रोजगार निर्मिती झाली. तर अप्रत्यक्षपणे 7,500 लोकांच्या हाताला काम मिळाले. येत्या काळात आणखी दहा हजार अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल अशी शक्यता आहे.

माहिती तंत्रज्ञान विभागाची नियमावली 

दरम्यान, ऑनलाइन गेमिंग क्षेत्र झपाट्याने वाढत असल्याने फसवणूक, अनियमितता देखील फोफावली आहे. त्यामुळे माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने बेटिंग वर बंदी आणली आहे. तसेच लहान मुलांना गेम्सचे व्यसन लागू नये यासाठी उपाययोजना करण्यासंबंधित नियम जारी केले आहेत. ऑनलाइन गेमिंग इंटरमिडिएटरी (OGI) ला गेमिंग प्लॅटफॉर्मवर नियमबाह्य पद्धतीने कोणतीही गेम चालवता येणार नाही, असे म्हटले आहे.

2023 च्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने क्रीडा क्षेत्रावरील बजेटमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे नवीन गेम्समधील इनोव्हेशन, गुंतवणूकदारांचा विश्वास आणि ग्राहकांची मागणी वाढत असल्याचे दिसून येत आहे. फॅन्टसी स्पोर्ट्समुळे डिजिटल इकॉनॉमीमध्ये वाढ होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.