Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Exxon Mobil Deal with India: भारतीय इंधन बाजारपेठेत Exxon Mobil गुंतवणुकीसाठी उत्सुक

crude oil

Image Source : www.federalheath.com

Exxon Mobil Deal with India: ऊर्जा व इंधनक्षेत्रातील दिग्गज कंपनी Exxon Mobil भारतीय अपस्ट्रीम उर्जा क्षेत्रात गुंतवणूक ( Exxon Mobil want's to deal with India) करण्यास उत्सुक आहे. मात्र या सरकारने जागतिक स्तरावर व्यवसायातील अडचणीत कराराच्या मुदतीपर्यंत संरक्षण दिले पाहिजे अशी या कंपनीची अट आहे.

ऊर्जा व  इंधनक्षेत्रातील दिग्गज कंपनी Exxon Mobil भारतीय अपस्ट्रीम उर्जा क्षेत्रात गुंतवणूक (Exxon Mobil want's to deal with India) करण्यास उत्सुक आहे. मात्र या सरकारने जागतिक स्तरावर व्यवसायातील अडचणीत कराराच्या मुदतीपर्यंत संरक्षण दिले पाहिजे अशी या कंपनीची अट आहे.

भारतातील अपस्ट्रीममध्ये गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक 

भारतातील ऊर्जा क्षेत्रात लक्षवेधी वाढ होत आहे. Exxon Mobilचे आशियातील कंट्री लीड मॅनेजर मॉन्टे डॉब्सन  (Exxon Mobil Country lead Manager)  म्हणाले की आमची भारतात गुंतवणूक करण्याची इच्छा आहे. यासाठी आम्ही  प्रयत्नशील आहोत 2023 हे वर्ष भारतातील ऊर्जा व्यापारक्षेत्रासाठी महत्वपूर्ण असणार आहे. एक्झोन (Exxon) सध्या भारतीय भौगोलिक स्थितीचा अभ्यास करत आहे. गेल्या काही वर्षांपासून भारत सरकारच्या संपर्कात देखील आहोत. तसेच ONGC (Oil and Natural Gas Corporation limited) सोबत आम्ही करार केला आहे. पुढे डॉब्सन म्हणाले "Exxon कंपनीकडे भारतासाठी आवश्यक असेलेले तंत्रज्ञान व अनुभव दोन्हीही आहे. आम्ही भारतातील  भुगर्भशास्त्र (Indian Geology) अभ्यासले आम्हाला सकारात्मक अहवाल  मिळाला आहे. "

भारत तिसरा मोठा क्रूड ऑइल खरेदीदार (India is the third Largest Buyer Of Crude Oil In the World)

भारत जगातील तिसरा मोठा ग्राहक आहे.1.4 अब्ज लोकसंख्येसह भारतात तेलाची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. काळानुसार या मागणीत वाढ होत आहे  भारत सरकारचे व्यापारी धोरण तेल निर्मिती करणाऱ्या देशांसाठी अनुकूल आहे.अनेक पाश्चात्य देशांनी रशियन ऊर्जा उत्पादनांना मंजूरी दिल्याने भारतात रशियन क्रूड ऑइल आयतीचा फायदा झाला आहे. रशिया  इतर देशांच्या तुलनेने क्रूड ऑईलची किंमत कमी आह. यामुळे बहुतेक देशांची ऑइल खरेदीसाठी रशियाला पसंती असते. यामुळे  भारतात देखील क्रूड ऑईलची खरेदी वाढली आहे. इंडस्ट्रीज  हे तेल खरेदी करून त्यावर प्रक्रिया करून इंधनाची व उपयुक्त तेलाची निर्मिती करत आहे. भारत हा जगातील तिसरा मोठा तेल आयायदार असल्यामुळे क्रूड ऑइल निर्मात्या कंपन्या भारतीय भाजरपेठेला धरून आपले धोरण जाहीर करतात. भारतात गरजेच्या एकूण 84% तेलाची आयात ही बाहेरील देशांतून होते.