Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Expensive Bollywood Weddings: जाणून घ्या, बॉलीवुड कलाकारांनी लग्नावर किती खर्च केले?

Expensive Bollywood Weddings

Expensive Bollywood Weddings: सध्या नवीन वर्षाच्या सुरूवातीला बॉलीवुडमधून बातमी आली आहे की, सिध्दार्थ मल्होत्रा व कियारा आडवानी, आथिया शेट्टी आणि के. एल. राहुल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. त्यामुळे साहजिकच, या लग्नांवर होणारा खर्चदेखील अफाट असणार आहे. यापूर्वीदेखील बॉलीवुडमध्ये अधिक खर्चिक लग्ने झाली आहेत, अशा काही बॉलीवुडच्या महागडया लग्नांबाबत जाणून घ्या.

Expensive Bollywood Weddings: बॉलीवुडमधील विवाह म्हणजे सर्वात आकर्षणाचा विषय असतो. हे लग्न कुठे होणार आहे या प्रश्नांपासून ते लग्नात खाण्यात काय-काय पदार्थ आहेत. या गोष्टींची भलतीच चर्चा रंगलेली असते. त्याचबरोबर कुठे, काय व किती खर्च झाला, या बारीक-सारीक गोष्टींदेखील वाचण्यास त्यांचे चाहते उत्सुक असतात. म्हणूनच या खास चाहत्यांसाठी घेऊन आलो आहोत, बॉलीवुडमधील कलाकारांनी त्यांच्या लग्नावर किती खर्च केले, याबाबत सविस्तरपणे माहिती.

दिपिका पदुकोन व रणवीर सिंग (Deepika Padukone & Ranveer Singh)

14 नोव्हेंबर 2018 रोजी दिपिका आणि रणवीरने इटली येथे अत्यंत शाही पद्धतीने लग्न केले. दिपिका पदुकोनच्या मंगळसूत्राची किंमतच 20 लाख रूपये होती. तसेच कपडयांवरदेखील दोघांनी करोडो रूपये खर्च केले होते. त्यांनी इटलीतील जे नामांकित रिसॉर्ट बुक केले होते, त्याचे एक आठवडयाचे भाडे लगबग 1 करोड 73 लाख रूपये होते. जवळजवळ या कलाकारांनी आपल्या लग्नावर 95 करोड रूपये खर्च केल्याचे सांगितले जात आहे.

Deepika & Ranveer
http://www.ndtv.com/

अनुष्का शर्मा व विराट कोहली (Anushka Sharma & Virat Kohli)

11 डिसेंबर 2017 रोजी अनुष्का शर्मा व विराट कोहली ही जोडीदेखील इटली येथे लग्नबंधनात अडकली गेली. या लग्नात प्रत्येक व्यक्तीवर 1 कोटी खर्च करण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे. या दोघांच्या लग्नात जवळजवळ 75 ते 100 करोड इतका खर्च झाला असल्याची माहिती मिळाली. फक्त पाहुण्यांवर या सेलिब्रिटींनी 50 करोड रूपये इतका खर्च केला होता. या कलाकारांनी लग्न एकदम रॉयल केले होते.

anushka virat
http://www.vogue.in/

कॅटरिना कैफ व विक्की कौशल (Katrina Kaif & Vicky Kaushal)

9 डिसेंबर 2021 रोजी राजस्थान येथील 700 जुना असलेल्या ऐतिहासिक सिक्स सेंस रिजॉर्टमध्ये त्यांनी लग्न केले. सांगितले जाते की, एका रात्रीसाठी या रिजॉर्टची किंमत साधारण 6.5 लाख रुपये इतकी होती. त्यांनी हे लग्न भारतात केले असल्याने, त्यांच्या लग्नावर तब्बल 4 करोड रूपये इतका खर्च झाला असल्याची माहिती मिळाली आहे. 

katrina vicky
http://www.ndtv.com/