Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Deepika Padukone Birthday Special: दिपिका पदुकोन आहे, अभिनेत्रीसोबतच यशस्वी बिझनेस वुमन!

Deepika Padukone Birthday

Image Source : http://www.youtube.com/

Deepika Padukone Property: बॉलिवुडची सुपरहीट अभिनेत्री दिपिका पदुकोण हिचा आज वाढदिवस. तिचा 'पठाण' हा चित्रपट या महिन्यात प्रदर्शित होणार आहे. सध्या या चित्रपटातील तिचे 'बेशरम रंग' हे गाणे सोशलमिडीयावर धुमाकूळ घालत आहे. पण तुम्हाला माहिती का, ती अभिनेत्रीसोबतच एक यशस्वी 'बिझनेस वुमन'देखील आहे. तिच्या विविध बिझनेसबाबत जाणून घेऊयात.

 Deepika Padukone:  बॉलिवुडची दिग्गज अभिनेत्री दिपिका पदुकोन (Deepika Padukone) नुकतीच फिफा वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यातदेखील ट्रॉफीसोबत झळकली होती. यामागीलदेखील प्रमुख कारण होते, तिचे बिझनेससंबंधी असलेले रिलेशन. ती ‘व्हिट्रॉन’ या आंतरराष्ट्रीय ब्रॅंडची अँबेसेडर आहे. या ब्रॅंडनेच फिफा वर्ल्डकपचे डिझाइन केले होते. अशा या अभिनेत्रीच्या वैभवशाली बिझनेसबाबत जाणून घेऊयात.  

स्वत:चे प्रोडक्शन हाऊस (Own Production House)

दिपिका पदुकोनचे आपले स्वत:चे असे प्रोडक्शन हाऊस आहे. तिच्या या प्रोडक्शन हाऊसचे नाव ‘का प्रोडक्शन’ (Ka Production) असे आहे. 2018 साली या प्रोडक्शन हाऊसची निर्मिती झाली. या प्रॉडक्शन हाऊस अंतर्गत तिने '83' आणि 'छपाक' चित्रपटाची निर्मिती केली आहेत. आता दीपिका तिच्या नवीन चित्रपट 'द इंटर्न' (The intern) ची ही निर्मिती करत आहे.

स्किन केअर प्रोडक्टची मालकीण (Owner of Skin Care Products)

अलीकडेच दीपिका पदुकोणने ‘82°E’ नावाचे स्किन केअर प्रोडक्ट लाँच केले आहे. या उत्पादनांची ती जोरदार जाहिरात करताना दिसते. तिने स्वतःची एक फेस क्रीम लाँचदेखील केली आहे.

मानसिक आरोग्यासंबंधी फाउंडेशन उभारले (Established a Mental Health Foundation)

2015 मध्ये, दीपिका पदुकोणने पहिल्यांदा तिच्या मानसिक आरोग्याविषयी चर्चा केली. ती मानसिक तणावात होती, असल्याचे तिने त्यावेळी सांगितले. त्यामुळेच अशा आजारांना दूर करण्यासाठी तिने 'द लिव्ह लव्ह लाफ' (The Live Love Laugh Foundation) या फाउंडेशनची निर्मिती केली. यानंतर त्यांनी 'मोअर दॅन जस्ट सॅड' नावाची मोहीमदेखील सुरू केली होती, ज्या अंतर्गत नैराश्य आणि चिंताग्रस्त लोकांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर उपलब्ध करून देण्यात आले होते.

कपड्यांचा ब्रँड 'ऑल अबाऊट यू' (Clothing Brand 'All About You')

बॉलिवुडच्या या मस्तानीने 2013 मध्ये स्किनकेअर प्रोडक्टपूर्वी तिचा कपड्यांचा ब्रँड सुरू केला होता, ज्याचे नाव 'ऑल अबाउट यू' असे आहे.

दिपिका पदुकोनची एकूण संपत्ती (Deepika Padukone Net Worth)

 आज परिस्थितीत दिपिका पदुकोणचे नाव एका टॉप अभिनेत्रीमध्ये घेतले जाते. या प्रसिध्द अभिनेत्रीकडे अफाट संपत्ती आहे. दीपिका पदुकोणच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले, तर ती आज 314 कोटी संपत्तीची मालकीण आहे. आज बॉलिवुडमध्ये सर्वाधिक मानधन घेणारी ती अभिनेत्री असल्याचे सांगितले जात आहे.