पैसे कमवणं हे खूप अवघड काम आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. अनेक लोक आयुष्यभर पैसा कमावतात, पण शेवटी त्यांच्या हातात फारच कमी किंवा तुटपुंजा पैसा उरतो. जर तुम्हालाही असंच काहीसं वाटत असेल आणि त्यात जाऊ इच्छित नसाल तर पैसे कमवण्याचं गणित नक्कीच समजून घ्या. आजच्या गुंतवणूक टिप्स (Investment tips) तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहेत. या अंतर्गत जर तुम्ही रोज सकाळ संध्याकाळ घेत असलेली कॉफी (Coffee) बंद केली अन् तो पैसे गुंतवणूक करण्याच्या कामी वापरला तर तुम्ही करोडपती होऊ शकता. हे अशक्य वाटेल, मात्र पॉवर ऑफ कंपाउंडिंगच्या मदतीनं ते शक्य आहे. रोज फक्त 100 रुपये वाचवून श्रीमंत कसं व्हायचं ते जाणून घेऊया...
Table of contents [Show]
रोजचे फक्त 100 रुपये
तुम्ही रोज 2-3 वेळा कॉफी पित असाल तर हे गणित पाहा. 30-50 रुपये प्रति कप दरानं चांगली कॉफी मिळते. ज्यांना कॉफी प्यायला आवडतं, ते दिवसातून 2-3वेळा कॉफी पितात. म्हणजेच, सरासरी 100 रुपयांच्या आसपास फक्त कॉफीवर खर्च होतात. याउलट समजा तुम्ही कॉफी पिण्याऐवजी हे पैसे गुंतवायला सुरुवात केली तर तुम्ही दीर्घ कालावधीत 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा करू शकता.
2-3 कप कॉफीपासून 1 कोटी?
दररोज आपण 100 रुपये वाचवता, असं गृहीत धरू. या हिशोबाने एका महिन्यात तुम्ही सुमारे 3000 रुपये वाचवाल. तुम्ही हे पैसे दर महिन्याला एनपीएस आणि म्युच्युअल फंड यासारख्या योजनांमध्ये गुंतवा. असं केल्यास एक दिवस तुमच्याजवळ 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा होऊ शकणार आहे. तुमचं वय आणि गुंतवणुकीचा कालावधी हा यात महत्त्वाचा आहे. समजा, तुम्हाला वयाच्या 25व्या वर्षी तुम्हाला नोकरी मिळाली आणि तुम्ही ही गुंतवणूक सुरू केली, असं आपण गृहीत धरू. अशाप्रकारे तुम्ही निवृत्त होईपर्यंत म्हणजेच वयाच्या 60 वर्ष वयापर्यंत गुंतवणूक करणार आहात.
एकूण 35 वर्षात कोटीची रक्कम
या एकूण 35 वर्षांच्या गुंतवणुकीच्या कालावधीत हळूहळू तुमचे रोजचे 100 रुपये तब्बल 1.15 कोटी रुपये होतील. दर महिन्याला 3000 रुपये गुंतवले म्हणजे 35 वर्षात तुमचे जवळपास 12.60 लाख रुपये जमा होतील. या कालावधीत तुम्हाला फक्त 1.02 कोटी रुपये व्याज मिळेल. 35 वर्षांनंतर तुमची एकूण रक्कम सुमारे 1.15 कोटी रुपये होणार आहे.
चक्रवाढीचा फायदा
चक्रवाढ व्याजाच्या अंतर्गत, व्याजावरही तुम्हाला व्याज मिळतं. समजा तुम्हाला पहिल्या महिन्यात 3000 वर 10 टक्के व्याज म्हणजेच 300 मिळाले. याच हिशोबानं पुढच्या महिन्यात तुम्हाला 3000+3000+300 म्हणजेच एकूण 6300 रुपये व्याज मिळणार आहे. अशाप्रकारे, व्याजावर व्याज मिळाल्यामुळे, तुम्हाला केवळ व्याजातून 35 वर्षांत 1 कोटी रुपयांहून अधिकची कमाई होणार आहे.