निवृत्तीनंतर सुखाने जगता यावे यासाठी उमेदीच्या काळात पैशांची तरतूद करावी लागते. निवृत्तीनंतर नियमित दरमहा उत्पन्न सुरु होण्यासाठी मार्केटमध्ये अनेक गुंतवणूक योजना देखील आहेत. मात्र निवृत्तीनंतर भक्कम निधी मिळवायचा असेल तर तुम्हाला नॅशनल पेन्शन सिस्टम या योजनेचा पर्याय निवडावा लागेल. नॅशनल पेन्शन सिस्टममध्ये दररोज 442 रुपयांची गुंतवणूक केली तर वयाच्या 60 नंतर तुम्हाला 5 कोटी रुपये मिळू शकतात.
नॅशनल पेन्शन सिस्टममध्ये कमी वयात नियमित गुंतवणूक केली तर निवृत्तीवेळी यातून एक भक्कम रक्कम गुंतवणूकदाराला प्राप्त होतो. निवृत्तीवेळी 5 कोटी रुपये मिळवायचे असतील तर नॅशनल पेन्शन सिस्टमचा 442 चा फॉर्म्युला फायदेशीर ठरेल, असे जाणकारांचा दावा आहे.
रिटायरमेंटला 5 कोटी रुपये मिळवण्यासाठी वयाच्या 25 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी तुम्ही नोकरीत असणे आवश्यक आहे. किमान 25 व्या वर्षी देखील तुम्ही दररोज 442 रुपये नॅशनल पेन्शन सिस्टममध्ये गुंतवणूक सुरु करणे आवश्यक आहे.
नॅशनल पेन्शन सिस्टममध्ये दररोज 442 रुपयांची गुंतवणूक केली तर महिन्याकाठी या योजनेत 13260 रुपयांची रक्कम जमा होईल. रिटायरमेंटचे वय 60 असल्याने या योजनेत तुम्ही 35 वर्ष सलग गुंतवणूक कराल. नॅशनल पेन्शन सिस्टममध्ये दरवर्षी सरासरी 10% व्याज धरले तर वयाच्या 60 व्या वर्षी तुमच्या नॅशनल पेन्शन सिस्टम खात्यातील रक्कम 5 कोटी 12 लाख इतकी वाढेल.
दररोजची गुंतवणूक देणार 5 कोटींचा बंपर निधी
नॅशनल पेन्शन सिस्टममध्ये केलेल्या गुंतवणुकीवर चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळेल. या योजनेत दररोज 442 रुपयांची गुंतवणूक केली तर 35 वर्षात 5670200 रुपयांचा निधी जमा होईल. त्यावर चक्रवाढ व्याजाचा नियम लागूब केला तर 35 वर्षात जमा होणाऱ्या गुंतवणूक मूल्यावर 4 कोटी 55 लाखांचे व्याज मिळेल. एकूण रक्कम 5 कोटी 12 लाख इतकी असेल.
नॅशनल पेन्शन सिस्टम योजनेत वयाच्या 60 व्या वर्षी नोकरदाराला शिल्लक रकमेपैकी 60% रक्कम काढता येते. त्याशिवाय वैद्यकीय उपचार, घराची डागडुजी, नवीन घर खरेदी करणे, मुलांचे उच्च शिक्षण, लग्नकार्य यासाठी पेन्शन खात्यातून पैसे काढता येतात. निवृत्तीवेळी तुमच्या खात्यात 5 कोटी 12 लाखांचा निधी असेल. तर त्यातील तुम्ही 60% रक्कम अर्थात 3 कोटी रुपये काढू शकता. उर्वरित 2 कोटी रुपये अॅन्युटी प्लॅनमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला आयुष्यभर दरमहा पेन्शन मिळते.