Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Recession in Europe: युरोपातील आणखी एक देश सापडला मंदीत! महागाईने अर्थव्यवस्था डबघाईला

Recession in netherland

Image Source : www.pngall.com

युरोपीयन युनियनमधील देशांना "युरोझोन कंट्रिज" असेही म्हटले जाते. 2023 वर्ष सुरू झाल्यापासून युरोपीयन युनियनमधील बहुतांश देश आर्थिक अडचणीत सापडले आहेत. जून महिन्यात जर्मनीमध्ये मंदी आल्यानंतर आता आणखी एक देश मंदीच्या गर्तेत सापडला आहे.

Recession in Europe: जून महिन्यात जर्मनी आर्थिक मंदीत सापडल्याच्या बातम्या आल्यानंतर आता युरोपातील आणखी एक देश मंदीत सापडला आहे. नेदरलँड युरोपातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था आहे. मात्र, महागाई, व्यापारातील घट, अन्नधान्य आणि इंधनाच्या वाढत्या किंमतीमुळे आर्थिक अडचणीत आला आहे. मागील दोन तिमाहीपासून विकासदर घटत आहे.

कोरोनानंतर युरोपातील अनेक अर्थव्यवस्थांची वाढ खुंटली होती. (Recession in Netherland) त्यानंतर रशिया-युक्रेन युद्ध, अमेरिकेतील बँकिंग संकट, जगभरातील अन्नधान्य आणि इंधन दरवाढीमुळे हे संकट आणखी गहिरे झाले. जून 2023 मध्ये जर्मनी मंदीत सापडला. त्याप्रमाणे आता नेदरलँडही मंदीत सापडला आहे.

ग्राहकांची खरेदीक्षमता रोडावली

नेदरलँडमधील नागरिकांची खरेदी क्षमता रोडावली आहे. अन्नधान्याच्या किंमती, इंधनाचे दर वाढत असताना निर्यात मात्र कमी झाली आहे. नागरिकांची खरेदी क्षमता 1.6 टक्क्यांनी कमी झाली. तर चालू वर्षी जानेवारी-मार्च तिमाहीच्या तुलनेत एप्रिल-मे मध्ये व्यापार 0.7 टक्क्यांनी खाली आला. 

सलग दोन तिमाहीत विकासदर घटला 

मागील वर्षी (2022) सप्टेंबर महिन्यात नेदरलँडमधील महागाईचा दर 14.5% इतका वाढला होता. हा दर खाली आला असला तरी अद्यापही 6 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. जानेवारी-मार्च 2023 मध्ये विकासदर 0.4% टक्क्यांनी घटला. तर दुसऱ्या तिमाहीत 0.3% टक्क्यांनी घटला. सलग दोन तिमाहीत विकास दर घटल्याने अर्थव्यवस्थेसाठी ही धोक्याची घंटा समजली जात आहे.

कोरोना संकटातून बाहेर आल्यानंतर 2021 मध्ये नेदरलँडचा विकासदर 5% झाला होता. मात्र, त्यानंतर पुन्हा अर्थव्यवस्था खाली आली. नेदरलँडच्या सांख्यिकी विभागाने महागाईची ताजी आकडेवारी जाहीर केली असून देश मंदीत सापडल्याचे स्पष्ट झाले.