कोणताही कर्मचारी मासिक आधारावर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) खात्यात पैसे गुंतवून आपले निवृत्तीनंतरचे आयुष्य आर्थिक दृष्ट्या अधिक सुखकर करू शकतो. नुकतेच कामगार मंत्रालयाने एप्रिल महिन्यातील पे-रोल डेटाबाबत माहिती जाहीर केली. एप्रिल 2023 मध्ये ईपीएफओमध्ये नवीन 17.20 लाख सदस्य जोडले गेले आहेत. ही संख्या मार्च महिन्याच्या तुलनेत सर्वात जास्त आहे. या नवीन सदस्यांपैकी 54.15 टक्के कर्मचारी हे 25 वर्षाहून कमी वयाचे आहेत. यावरून असे दिसून येते की, ईपीएफओमध्ये तरुण सदस्यांचा सहभाग वाढला आहे.
Table of contents [Show]
मार्चच्या तुलनेत एप्रिलमधील सदस्य संख्या जाणून घ्या
ईपीएफओ (EPFO) कडून जाहीर करण्यात आलेल्या अहवालात यावेळी मोठ्या प्रमाणावर बदल झालेले पाहायला मिळाले आहेत. यातील माहितीनुसार एप्रिल महिन्यात ईपीएफ खात्यात 17. 20 लाख नवीन सदस्य जोडले गेले आहेत. हे प्रमाण मार्च महिन्यात 13.40 लाख इतके होते. तर एप्रिल महिन्यात दुसऱ्यांच्या ईपीएफ खात्याचा भाग झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या 10.09 लाख इतकी आहे. मार्च महिन्यात हाच आकडा 12.50 लाख इतका होता.
नोकरी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत घट
एप्रिल महिन्यात नोकरी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत घट पाहायला मिळाली आहे. मार्च 2023 मध्ये ही घट 11.67 टक्के इतकी होती. एप्रिल महिन्यात हे प्रमाण 3.77 टक्क्यांवर पोहचले आहे.
महिलांचा सहभाग वाढला
विशेष म्हणजे एप्रिल महिन्यात ईपीएफओमध्ये जोडलेल्या नवीन सदस्यांमध्ये महिलांचा सहभाग वाढला आहे. उपलब्ध माहितीनुसार 3.48 लाख महिला एप्रिलमध्ये ईपीएफमध्ये सहभागी झाल्या आहेत. हीच संख्या मार्च महिन्यात 2.57 लाख इतकी होती. एप्रिल महिन्यात जवळपास 2.25 लाख महिला पहिल्यांदाच ईपीएफ खात्याशी जोडल्या गेल्या आहेत.
EPFO डेटामधून काय समजते?
कामगार मंत्रालयाकडून (Ministry of Labour) जाहीर करण्यात आलेल्या ईपीएफओ डेटामधून दोन गोष्टी समजून येतात. पहिली गोष्ट म्हणजे जो कर्मचारी ईपीएफओमध्ये सामील झाला आहे, तो एकतर आधीच नोकरीत होता मात्र त्याची कंपनी आत्ता ईपीएफओमध्ये सामील झाली आहे. याचा अर्थ असा की, कंपनीचे काम वाढले आहे. त्यामुळे कंपनीला कर्मचाऱ्यांची गरज आहे.
तर दुसऱ्या गोष्टीतून रोजगारा (Employment) संदर्भातील माहिती निदर्शनास येते. काही सदस्य पहिल्यांदाच नोकरीत सामील झाले आहेत. याचा अर्थ रोजगार भर्ती मोठ्या प्रमाणावर चालू आहे आणि यातून नवीन लोकांना संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
Source: hindi.news18.com