Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

EPF Passbook Download: प्रक्रिया, जाणून घ्या

EPF Passbook Download

EPF Passbook Download: नोकरदार व्यक्तींच्या पगारातील काही भाग कापून पीएफ खात्यात (PF Account)जमा केला जातो. पीएफ खात्यात जमा केलेले पैसे कर्मचाऱ्यांचे भविष्य सुरक्षित करतात. आजच्या डिजिटलायझेशनच्या (Digitalization) काळात, तुम्ही घरबसल्या सहजपणे पीएफची रक्कम सहजपणे चेक करू शकता.

EPF Passbook Download: नोकरदार व्यक्तींच्या पगारातील काही भाग कापून पीएफ खात्यात (PF Account) जमा केला जातो. पीएफ खात्यात जमा केलेले पैसे कर्मचाऱ्यांचे भविष्य सुरक्षित करतात. आजच्या डिजिटलायझेशनच्या (Digitalization) काळात, तुम्ही घरबसल्या सहजपणे पीएफची रक्कम सहजपणे चेक करू शकता. तुम्ही तुमच्या पीएफ खात्याचे पासबुक घरी बसून सहजपणे तुमच्या पीएफ खात्याचे पासबुक ऑनलाइन डाउनलोड (EPF Passbook Download) करू शकता. पीएफ खाते पासबुक डाउनलोड करून तुम्ही तुमच्या खात्याची संपूर्ण माहिती पाहू शकता.

नोंदणीकृत सदस्यांनाच पासबुक….. (Registered Members Passbook…..)

EPF पासबुक (EPFO e-Statement) कंपनीने केलेल्या योगदानासह खात्यात जमा केलेली एकूण रक्कम दाखवते. हे ईपीएफ खाते मागील संस्थेकडून नवीन संस्थेकडे ट्रान्सफर करण्यास मदत करते. EPF खाते क्रमांक, पेन्शन योजना डिटेल्स, संस्थेचे नाव आणि ID, EPFO ​​कार्यालयाचे डिटेल्स  EPF पासबुकमध्ये दिलेले आहेत. ईपीएफ पासबुक मिळविण्यासाठी, ईपीएफओच्या वेबसाइटवर नोंदणी करणे आवश्यक आहे.

EPF पासबुक डाऊनलोड करण्याची प्रक्रिया (Procedure to Download EPF Passbook)

  • पीएफ पासबुक डाउनलोड करण्यासाठी, प्रथम तुम्हाला EPFO ​​पोर्टलच्या अधिकृत वेबसाइटला  भेट द्यावी लागेल.
  • येथे तुम्हाला लॉग इन करण्यासाठी बॉक्समध्ये तुमचा UAN नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकावा लागेल.
  • लॉगिन केल्यानंतर, स्क्रीनवर एक नवीन पेज ओपन होईल.  येथे तुम्हाला सदस्य आयडीचे ऑप्शन निवडावे लागेल. 
  • सदस्य आयडीचे ऑप्शन निवडून तुम्ही तुमचे पीएफ पासबुक सहज पाहू शकता.
  • तुमचे EPF पासबुक पीडीएफ फॉरमॅटमध्ये असेल आणि तुम्ही ते तुमच्या मोबाईल फोन किंवा कॉम्प्युटरवर सहजपणे डाउनलोड करून सेव्ह करू शकता.

नोंदणी कशी करावी? (How to register?)

  • EPF इंडियाच्या वेबसाइटवर जा 
  •  Active  UAN (युनिव्हर्सल अकाउंट नंबर) वर क्लिक करा.
  •  तुमच्या स्क्रीनवर एक नवीन पेज दिसेल. UAN, आधार, पॅन (Aadhaar, pan) आणि इतर डिटेल्स त्यात समाविष्ट करा. 
  •  'गेट ऑथोरायझेशन पिन' वर क्लिक करा. तुमच्या स्क्रीनवर एक नवीन पेज दिसेल. 
  • यामध्ये तुम्ही दिलेल्या डिटेल्स बरोबर आहे की नाही ते चेक करायला सांगितले जाईल. 
  •  तुमच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे ओटीपी पाठवला जाईल.
  •  OTP एंटर करा आणि 'Validate OTP & Activate UAN' वर क्लिक करा. 
  • UAN सक्रिय केल्यावर, तुम्हाला पासवर्डसह एसएमएस मिळेल. 
  • तुमच्या खात्यात लॉग इन करण्यासाठी हा पासवर्ड वापरा. 
  • लॉग इन केल्यानंतर तुम्ही तुमचा पासवर्ड बदलू शकता.
  • तुम्ही नोंदणीच्या 6 तासांनंतरच तुमचे पासबुक पाहू शकाल.