कोविडचा प्रकार, ओमिक्रॉनच्या नवीन उप-प्रकार BF.7 च्या वाढत्या प्रकरणांनी, पुन्हा एकदा जगासाठी धोक्याची घंटा वाजवली आहे. नवीन ओमिक्रॉनच्या (Omicron) च्या नवीन सब-व्हेरियंटची प्रकरणे भारतात समोर आली आहेत. सरकारच्या वतीने देशवासीयांना सतर्क करत, कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला. यापूर्वी, कोविड महामारीच्या मागील लाटांमध्ये लोकांना आरोग्याशी संबंधित समस्यांसह अचानक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे आपण पाहिले आहे. म्हणूनच आपण आपली तयारी अशा प्रकारे ठेवली पाहिजे की अचानक आलेल्या आर्थिक समस्यांनाही सामोरे जावे लागेल. प्रत्येक काम करणाऱ्या व्यावसायिकाकडे एमर्जन्सी फंड (Emergency Fund) असणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हा फंड आपत्कालीन परिस्थितीत खूप मदत करतो. आता महत्त्वाचा प्रश्न हा आहे की एमर्जन्सी फंड म्हणजे काय? तो किती आणि कोणत्या स्वरूपात असावा या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे तज्ज्ञांकडून समजून घेवूया.
एमर्जन्सी फंड म्हणजे काय?
अमित कुमार निगम, बीपीएन फिनकॅपचे संचालक, म्हणतात की एमर्जन्सी फंड हा एक असा स्रोत आहे जो आर्थिक उद्दिष्टासाठी दीर्घकालीन बचतीला त्रास न देता अचानक गरजेसाठी किंवा आणीबाणीसाठी बाजूला ठेवला जातो. म्हणजेच हा असा फंड आहे, जो अचानक गरजेच्या वेळी कामी येतो. ते म्हणतात, जर तुम्ही एमर्जन्सी फंडची तरतूद केली तर ते तुम्हाला तणावमुक्त जीवन जगण्यास मदत करते. यासोबतच तुमची दीर्घकालीन गुंतवणूकही अबाधित राहते.
एमर्जन्सी फंड किती असावा?
मनीफ्रंटचे सह-संस्थापक आणि सीईओ मोहित गांग म्हणतात, ही मनी मॅनेजमेंटची सर्वोत्तम पद्धत आहे की तुम्ही एमर्जन्सी फंड ठेवावा. साधारणपणे, तुमचे मासिक उत्पन्न जेवढे आहे, तेवढी कमीत कमी 6 महिन्यांची रक्कम एमर्जन्सी फंड म्हणून तुमच्याजवळ असावी. अमित निगम म्हणतात, एमर्जन्सी फंड किती असावा? हे तुमच्या खर्चावर अवलंबून आहे. साधारणपणे, तुमच्या 3-6 महिन्यांच्या नियमित खर्चाएवढी रक्कम तुमच्या आपत्कालीन निधीमध्ये असावी.
आपत्कालीन निधी कोणत्या स्वरूपात असावा?
अमित निगम म्हणतात की आपत्कालीन निधी नेहमी लिक्वीड फॉर्म मध्ये असावा. ते लिक्विड म्युच्युअल फंड किंवा बचत बँक खात्यात असू शकते. जेणेकरून गरजेच्या वेळी पैसे सहज वापरता येतील. जेव्हा तुम्ही एमर्जन्सी फंड प्रोव्हिजनिंग करता तेव्हा नेहमी लक्षात ठेवा की त्या ठेवी किंवा गुंतवणुकीवर तुम्हाला किती परतावा मिळतो आहे किंवा मिळेल हे तुमचे प्राधान्य असता कामा नये. मोहित गांगचे म्हणणे आहे की, एमर्जन्सी फंड नेहमी स्विच करण्यायोग्य बँक मुदत ठेवींमध्ये किंवा लिक्विड स्वरूपात किंवा मनी मार्केट म्युच्युअल फंडांमध्ये ठेवावा, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत तुम्ही त्यांचा त्वरित वापर करू शकता.