बऱ्याच कालावधीपासून जगातील सर्वात श्रीमंत म्हणून इलॉन मस्क ओळखला जात आहे. मात्र Elon Musk चे हे स्थान आता धोक्यात आले आहे. टेस्लाच्या शेअर्सचे भाव पडल्याने इलॉन मस्क आता सर्वात श्रीमंत राहिलेले नाहीत. ते आता दुसऱ्या नंबरवर गेले आहेत.
Elon Musk यांच्या संपत्तीत झाली इतकी घट
ब्लूमबर्ग बिलियनेयर इंडेक्सनुसार यावर्षी जानेवारीपासून इलॉन मस्क यांच्या संपत्तीत 100 अब्ज डॉलर इतकी घट झाली आहे. यामुळे आता त्यांची संपत्ति 168.5 अब्ज डॉलर इतकी राहिली आहे.
सुमारे वर्षभरापूर्वी 340 अब्ज डॉलर इतकी संपत्ती त्यांच्याकडे होती. यामुळे ते सर्वात श्रीमंत व्यक्ति बनले होते. आता बर्नार्ड अरनॉल्ट यांनी एलन बॉस Elon Musk यांना मागे टाकले आहे. यामुळे आता ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ति बनले आहेत.
बर्नार्ड अरनॉल्ट यांची संपत्ती 173 अब्ज डॉलर च्या आसपास आहे. Louis Vuitton या फॅशन क्षेत्रातील मोठ्या कंपनीचे 48 टक्के शेअर्स बर्नार्ड अरनॉल्ट यांच्याकडे आहेत. सप्टेंबर 2021 पर्यंत इलॉन मस्क जगातील श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या नंबरवर होते. त्यानंतरचा कालावधीत ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ति ठरले होते.
धक्कातंत्र कार्यपद्धतीमुळे Elon Musk कायम चर्चेत
Elon Musk हे त्यांच्या धक्कातंत्र कार्यपद्धतीमुळे कायम चर्चेत असतात. गेल्या वर्षभरात त्यांनी काही चकित करणारे निर्णय घेतले आहेत. यावर्षी एप्रिल महिन्यात त्यांनी 44 अब्ज डॉलर्सला ट्विटर खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांचा हा निर्णय चकित करणारा ठरला होता. यानंतर ट्विटरची सूत्रे हाती घातल्यावर त्यांनी घेतलेला कर्मचारी कपातीचा निर्णयही बराच कालावधीपर्यंत चर्चेत राहिला होता.
टेस्ला ही अमेरिकेतील सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार कंपनी आहे. या कंपनीच्या शेअर्सच्या भावात अलीकडे मोठी घसरण झाली आहे. गेल्याच आठवड्यात शांघाय फॅक्टरीमधील प्रॉडक्शन कमी करण्याचा विचार करत असल्याचे टेस्लाकडून स्पष्ट करण्यात आले होते. याचा कंपनीच्या शेअर्सवर परिणाम झाला होता. शेअर्सचे भाव कमी झाला होता. सप्टेंबर अखेरपर्यंत 40 टक्के दर घसरले होते. याच कालावधीत स्टँडर्ड अँड पुअर 500 इंडेक्समध्ये 12 टक्क्याने किमती घसरल्या आहेत.
Elon Musk च्या जागी बर्नार्ड अरनॉल्ट आता सर्वात श्रीमंत व्यक्ति ठरले आहेत. जे Louis Vuitton या फॅशन जगतातील मोठ्या कंपनीचे मालक आहेत. ते यापूर्वी बराच कालावधीपर्यंत 2 नंबरवरचे आपले स्थान टिकवून होते.