ट्विटरचे नवीन आणि वादग्रस्त मालक इलॉन मस्क (Elon Musk) यांनी दिवसांपूर्वी घेतलेल्या पोलमध्ये 57 टक्के लोकांनी मस्क यांना सीईओ पद सोडण्याचा सल्ला दिल्यानंतर त्याला ट्विटरवर नवीन सीईओ पदासाठी अनेकांकडून गंमतीशीर सूचना येत आहेत. इलॉन मस्कच्या त्या ट्विटनंतर ग्रॅमी अवॉर्ड विजेता निर्माता डी जे स्विव्हवेलने ट्विट करून म्हटले होते की, “मला वाटते बीटीएस हे एकत्रितरीत्या ट्विटरचे सीईओ बनू शकतील.” यावर मस्कने “Great Idea!” असे उत्तर दिले.
तर मिस्टर बीस्ट यांनी मस्कला थेट विचारले होते की, मी ट्विटरचा नवीन सीईओ होऊ शकतो का? या ट्विटला रिप्लाय देताना मस्क याने It’s not out of the Question असे म्हटले होते. पण त्यानंतर मिस्टर बीस्ट यांनी नवीन ट्विट केले आहे. त्यात त्याने ‘फर्स्ट ऑर्डर ऑफ बिझनेस’ असे ट्विट केले. याबरोबरच बीस्टन म्हटले आहे की, ज्यांना ट्विटरवर व्हिडिओ पोस्ट करायचे आहेत; फक्त इतर प्लॅटफॉर्मची लिंक शेअर करायची नाही. या ट्विटला सुमारे 33 मिलिअनवेळा पाहिले गेले. तसेच त्यावर अनेक जणांनी लाईक्स सुद्धा दिले आहेत. या ट्विटवर अनेकांनी गंमतीशीर प्रश्नही विचारले आहेत.
ट्विटरचे नवीन मालक इलॉन मस्क (Elon Musk) यांच्या ट्विटर पोलनंतर 57 टक्के लोकांनी मस्क यांना सीईओ पद सोडण्याचा सल्ला दिला होता. या सल्ल्यानंतर मस्कला खूप सारे पर्याय ट्विटर पाठवले जात आहेत. गंमत म्हणजे काही पर्यायांवर मस्क दिलखुलासपणे रिप्लायही देत आहे. कोणती गंमतीने विचार आहे. तर कोणी खिल्ली उडवत आहे.
भारतीय-अमेरिकन व्हि ए शिवा अय्यादुराई ज्यांनी अवघ्या 14 वर्षांचे असताना ‘ईमेल’ या सुविधेचा शोध लावला. त्यांनी ट्विटरच्या सीईओ पदासाठी इच्छा व्यक्त केली आहे. अय्यादुराई यांचा जन्म मुंबईत झाला असून ते 59 वर्षांचे आहेत. मॅंचेस्टर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT)मधून त्यांनी 4 डिग्री मिळवल्या आहेत. अय्यादुराई यांनी 1978 मध्ये एक कॉम्प्युटर प्रोगॅम तयार केला होता. त्या ईमेल असे नाव देण्यात आले होते.