Twitter New Rules: इलॉन मस्कने (Elon Musk) जेव्हापासून ट्विटरचा ताबा घेतला आहे; तेव्हापासून ट्विटरमध्ये नवनवीन बदल होत आहेत. आता मस्कने ट्विटरवर नियमांचे वारंवार उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. ट्विटरने शनिवारी (दि.28 जानेवारी) नियम तोडणाऱ्या युझर्सबाबत पुढीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.
Table of contents [Show]
नियम न पाळणाऱ्यांवर होणार ही कारवाई
ट्विटरने शनिवारी जाहीर केले की, ट्विटरचे नियम तोडणाऱ्या युझर्सवर कडक कारवाई करणार नसल्याचे म्हटले आहे. जर कोणत्याही युझर्सने विविदित ट्विट केले असेल तर ते ट्विट त्या युझर्सला डिलिट करण्यास सांगितले जाईल. पण जे युझर्स सतत नियमांचा भंग करत असतील तर अशा युझर्सचे खाते रद्द केले जाईल, असेही ट्विटरने स्पष्ट केले.
या लोकांवर ठेवली जाणार नजर!
ट्विटरने आपल्या निवेदनात असेही म्हटले आहे की, एखाद्या युझर्सने विवाद निर्माण करणारे ट्विट केले असेल तर कंपनी त्याच्यावर लगेच टोकाची कारवाई करणार नाही. असे ट्विट इतरांपर्यंत पोहोचणार नाही, याची काळजी कंपनी घेईल. त्यानंतर कंपनी त्या युझर्सला संबंधित ट्विट डिलिट करण्यास सांगेल. पण जे युझर्स वारंवार चुकीचे ट्विट करत असतील आणि कंपनीचे नियम मोडत असतील, अशा युझर्सचे खाते डिलिट केले जाईल, असा इशारा कंपनीने दिला आहे.
कंपनी कोणत्या प्रकारचे ट्विट डिलिट करण्यास सांगणार?
ट्विटवर त्या त्या देशातील कायद्याचे उल्लंघन करणारे, लोकांमध्ये हिंसा पसरवणारे, एखाद्या प्रायव्हसीचे उल्लंघन करणाऱ्या ट्विटरवर कंपनीची 24 तास पाळत असणार आहे. अशा युझर्सना वेळोवेळी सूचित करून कंपनी त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेईल.
रद्द झालेले खाते पुन्हा सुरू करता येणार
ट्विटरने आपल्या निवेदनात असेही नमूद केले आहे की, जी खाती कंपनीने यापूर्वी निलंबित किंवा रद्द केली आहेत. ती पुन्हा सुरू करण्यासाठी युझर्स 1 फेब्रुवारीपासून अपील करू शकतात. कंपनी अशा खात्यांचे निरीक्षण आणि मूल्यमापन करून त्यांचे खाते पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेणार आहे.