Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

World's Richest Person: 187 अब्ज डॉलर संपत्तीसह Elon Musk बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती!

Elon Musk

Image Source : www.standard.co.uk

ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार (Bloomberg Billionaires Index), मस्क यांच्या संपत्तीत गेल्या 24 तासांत 6.98 अब्ज डॉलरची वाढ झाली असून 2023 च्या सुरुवातीपासून त्यांची संपत्ती 50.10 अब्ज डॉलरने वाढली आहे. त्याच वेळी, अर्नॉल्ट यांच्या संपत्तीत गेल्या 24 तासांत 3.69 अब्ज डॉलर्स आणि 2023 च्या सुरुवातीपासून 23.30 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे.

टेस्ला (Tesla) आणि ट्विटरचे (Twitter)सीईओ एलोन मस्क (Elon Musk) पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. लक्झरी गुड्स कंपनी LMVH चे मालक बर्नार्ड अर्नॉल्ट यांना (Bernard Arnault) यांना मागे टाकत मस्क यांनी हे स्थान मिळवले आहे. सध्या मस्क यांची संपत्ती 187 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. अर्नॉल्ट आता 185 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर घसरले आहे.

ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार (Bloomberg Billionaires Index), मस्क यांच्या संपत्तीत गेल्या 24 तासांत 6.98 अब्ज डॉलरची वाढ झाली असून 2023 च्या सुरुवातीपासून त्यांची संपत्ती 50.10 अब्ज डॉलरने वाढली आहे. त्याच वेळी, अर्नॉल्ट यांच्या संपत्तीत गेल्या 24 तासांत 3.69 अब्ज डॉलर्स आणि 2023 च्या सुरुवातीपासून 23.30 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे.

डिसेंबरमध्ये संपत्तीत झाली होती घसरण!

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये, फ्रेंच अब्जाधीश अरनॉल्ट यांनी एलन मस्क यांना मागे टाकत जगातील पहिल्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले होते, जे गेल्या दोन महिन्यांपासून दुसऱ्या क्रमांकावर होते. आम्ही वाचकांना सांगू इच्छितो की, गेल्या वर्षी टेस्लाचा स्टॉक कमी झाल्यामुळे मस्क यांना $200 बिलियनचे नुकसान झाले होते. इतिहासातील कोणत्याही व्यावसायिकाच्या संपत्तीतील ही सर्वात मोठी घसरण मानली जात आहे.

टेस्लाच्या स्टॉकमधील रिकव्हरीमुळे संपत्ती वाढली

एलन मस्क यांची संपत्ती वाढण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याची इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाच्या स्टॉकमध्ये झालेली वाढ. टेस्लाचे शेअर्स गेल्या 24 तासांत 5.46 टक्के,आणि गेल्या एका महिन्यात 24.58 टक्के आणि 2023 च्या सुरुवातीपासून 92.07 टक्के वाढले आहेत.

मुकेश अंबानी टॉप 10 मध्ये
मार्केट कॅपनुसार देशातील सर्वात मोठ्या उद्योगाचे, रिलायन्स इंडस्ट्रीजचे (Reliance Industries) अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) जगातील श्रीमंतांच्या यादीत 10 व्या क्रमांकावर आहेत. त्यांच्याकडे $81.1 बिलियन इतकी संपत्ती आहे.

गौतम अदानी टॉप 30 मधून बाहेर
हिंडेनबर्ग वादानंतर (Hindenburg Report) अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या मालमत्तेत झपाट्याने घट होत असून ते श्रीमंतांच्या टॉप 30  यादीतूनही बाहेर पडले आहेत. गेल्या 24 तासांत त्याच्या संपत्तीत $2.18 अब्जची घट झाली आहे आणि $37.7 अब्ज संपत्तीसह, ते जगातील 32 व्या सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून कायम आहे.