Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Electronic Mart India IPO 437 टक्के सब्स्क्राईब, ग्रे मार्केटमध्ये शेअरचा भाव वाढला!

Electronics Mart India IPO

Electronic Mart GMP : ग्रे मार्केटमध्ये Electronic Mart IPO ची क्रेज वाढत हे. कंपनीचा शेअर ग्रे मार्केटमध्ये 60 टक्के प्रीमियमवर ट्रेण्ड करत आहे.

Electronic Mart India IPO : कन्झ्युमर ड्युरेबल रिटेल चेन इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडिया (Electronics Mart India IPO)च्या आयपीओला (Initial Public Offer-IPO) गुंतवणूकदारांकडून चांगला रिस्पॉन्स मिळत आहे. या आयपीओमध्ये आज (दि. 6 ऑक्टोबर) तिसऱ्या दिवशी 4.37 पटीने गुंतवणूक झाली. 7 ऑक्टोबरपर्यंत यामध्ये गुंतवणूक करता येणार आहे. Electronics Mart India च्या शेअर्सबाबतीत ग्रे मार्केटमध्ये बरीच क्रेझ आहे. या आयपीओचा साईज 500 कोटी रुपये असून याची प्रति शेअर प्राईस बॅण्ड 56-59 रुपये आहे.

आतापर्यंत 4.37 पटीने सब्स्क्राईब!

Electronics Mart India च्या आयपीओसाठी आतापर्यंत 437 टक्के बोली मिळाली आहे. म्हणजे हा आयपीओ 4.37 टक्के सब्स्क्राईब झाला आहे. हा आयपीओ 7 ऑक्टोबरपर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असणार आहे. आयपीओमधील 50 टक्के हिस्सा हा पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (Qualified Institutional Investor-QIB) राखीव आहे आणि यामध्ये आतापर्यंत 2.14 टक्के गुंतवणूक झाली आहे. 35 टक्के हिस्सा हा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव असून त्यात 5.37 टक्के गुंतवणूक झाली. 15 टक्के भाग बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव असून त्यात आतापर्यंत 5.02 टक्के गुंतवणूक झाली.

ग्रे मार्केटमध्ये 60 टक्क्यांवर प्रीमिअम

ग्रे मार्केटमध्ये Electronics Mart IPO ची क्रेझ वाढत आहे. या कंपनीचा शेअर ग्रे मार्केट (Grey Market)मध्ये 35 रुपयांवर ट्रेण्ड करत आहे. आयपीओची अप्पर प्राईस बॅण्ड 59 रुपये असून, तो सध्या 60 टक्के प्रीमिअमवर ट्रेण्ड करत आहे. ग्रे मार्केटमधून या शेअर्सच्या चांगल्या लिस्टिंगचे संकेत मिळत आहेत. ज्यांना या आयपीओचे इश्यू लागले आहेत. त्या गुंतवणूकदारांच्या डी-मॅट खात्यात हे शेअर्स 14 ऑक्टोबरपर्यंत जमा होतील. तर शेअर मार्केटमध्ये या कंपनीचे लिस्टिंग 17 ऑक्टोबरला होईल.

कंपनीच्या भविष्यातील योजना!

आयपीओच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक्स मार्ट कंपनी नव्याने 500 कोटी रुपयांचे शेअर्स जारी करणार आहे. यातून जमा होणाऱ्या निधीतून कंपनी 111.44 कोटी रुपये भांडवली खर्चासाठी, 220 कोटी रुपये खेळतं भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि 55 कोटी रुपये कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरणार आहे.

इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडिया कंपनीबाबत...

इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडिया कंपनीची सुरूवात पवन कुमार बजाज आणि करण बजाज यांनी केली होती. कंपनीचे 36 शहरांमध्ये एकूण 112 स्टोअर्स आहेत. बहुतांश स्टोअर्स हे आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि एनसीआरमध्ये आहेत. 2021-22 मध्ये कंपनीला 4349.32 कोटी रुपयांचा महसुल मिळाला होता. तर त्या अगोदरच्या वर्षी 3201.88 कोटी रुपयांचा फायदा झाला होता. जून 2022 पर्यंत कंपनीवर 446.54 कोटी रुपयांचे कर्ज होते.