Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Electronics Mart IPO : दक्षिण भारतातील सर्वांत मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचा आयपीओ उद्यापासून ओपन!

Electronics Mart IPO

Electronics Mart IPO : दक्षिण भारतातील सर्वांत मोठी इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचा आयपीओ उद्या ओपन होणारElectronics Mart IPO : इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंची विक्री करणाऱ्या दक्षिण भारतातील सर्वांत मोठी रिटेल चेन इलेक्ट्रॉनिक्स मार्टचा आयपीओ मंगळवारी (दि. 4 ऑक्टोबर) ओपन होणार.

Electronics Mart IPO : इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंची विक्री करणाऱ्या दक्षिण भारतातील सर्वांत मोठ्या रिटेल चेन इलेक्ट्रॉनिक्स मार्ट कंपनीचा आयपीओ (Initial Public Offer-IPO) 4 ऑक्टोबरला ओपन होणार असून तो 7 ऑक्टोबरपर्यंत खुला असणार आहे. आयपीओच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक्स मार्ट कंपनी 500 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी करणार आहे. शेअर्सची अलॉटमेंट 12 ऑक्टोबरला होणार असून, शेअर लिस्टिंग 17 ऑक्टोबरला होणार आहे.

ग्रे मार्केटचा विचार केला तर या कंपनीचा शेअर 30 रुपये प्रीमिअमवर (GMP) आहे. पण तरीही शेअर मार्केटमधील तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार फक्त ग्रे मार्केटमधील किमतीच्या आधारे यामध्ये गुंतवणूक करणं योग्य ठरू शकत नाही. या ऐवजी कंपनीचा आर्थिक ताळेबंद आणि मागील काही वर्षातील कंपनीची आर्थिक प्रगती पाहायला हवी. कंपनीने मागील वर्षी सप्टेंबर, 2021 मध्ये सेबीकडे (SEBI) आयपीओसाठी पेपर सबमिट केले होते.


254 शेअर्सची लॉट साईज आणि प्राईस बॅण्ड 56-59 रुपये

इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडियाच्या आयपीओमध्ये 254 शेअर्सचा लॉट असणार आहे. यासाठी कंपनीने 56-59 रुपये प्राईस बॅण्ड निश्चित केली. म्हणजे किरकोळ गुंतवणूकदारांना यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी किमान 14,986 रुपये टाकावे लागतील. याच्या प्रत्येक शेअर्सचं प्राथमिक मूल्य 10 रुपये आहे.

किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 35 टक्के आरक्षण

इलेक्ट्रॉनिक्स मार्ट कंपनीने पात्र संस्थात्मक खरेदीरांसाठी (-QIB) 50 टक्के, बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (Non-Institutional Investor) 15 टक्के आणि 35 टक्के शेअर्स किरकोळ ग्राहकांसाठी आरक्षित ठेवले आहेत. यासाठी कंपनीने लीड मॅनेजर म्हणून आनंद राठी अडव्हायजर्स, आयआयएफएल सिक्युरिटीज आणि जेएम फायनान्शिअल यांची निवड केली.

कंपनीचे भविष्यातील योजना!

आयपीओच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक्स मार्ट कंपनी नव्याने 500 कोटी रुपयांचे शेअर्स जारी करणार आहे. यातून जमा होणाऱ्या निधीतून कंपनी 111.44 कोटी रुपये भांडवली खर्चासाठी, 220 कोटी रुपये खेळतं भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि 55 कोटी रुपये कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरणार आहे.

इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडिया कंपनीबाबत...

इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडिया कंपनीची सुरूवात पवन कुमार बजाज आणि करण बजाज यांनी केली होती. कंपनीचे 36 शहरांमध्ये एकूण 112 स्टोअर्स आहेत. बहुतांश स्टोअर्स हे आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि एनसीआरमध्ये आहेत. 2021-22 मध्ये कंपनीला 4349.32 कोटी रुपयांचा महसुल मिळाला होता. तर त्या अगोदरच्या वर्षी 3201.88 कोटी रुपयांचा फायदा झाला होता. जून 2022 पर्यंत कंपनीवर 446.54 कोटी रुपयांचे कर्ज होते.