• 24 Sep, 2023 02:34

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

‘Lightyear 0’ जगातील पहिली सोलर कार; बिना चार्जिंग महिनाभर प्रवास शक्य!

lightyear 0 car

लाइटइयर झिरो (Lightyear 0) ही जगातील पहिली सौरऊर्जेवर चालणारी कार (First Solar Car) म्हणून उदयास आली आहे. बॅटरीसोबत ही कार सोलरनेही चार्ज करता येते.

जगभरात इंधनाचे भाव दिवसेंदिवस वाढत असताना आगामी काळात इलेक्ट्रिक वाहनांची (Electric Vehicle) मागणी मोठ्या प्रमाणात वाढेल, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. इलेक्ट्रिक वाहनांमुळे फक्त इंधनाचा खर्च वाचत नाहीत तर त्याने पर्यावरणाचे रक्षण ही होते. इलेक्ट्रिक वाहनांबरोबरच आज आपण आणखी एका नैसर्गिक ऊर्जेवर चालणाऱया कारबद्दल जाणून घेणार आहोत. नेदरलॅण्डमधील लाइयइयर या स्टार्टअप कंपनीने अशी कार बनवली आहे; जी वीज आणि सौरऊर्जेचा वापर करून चार्ज करता येते.

नेदरलॅण्डमधील लाइटइयर (Lightyear) या हाय-टेक स्टार्टअप कंपनीने जगातील पहिली सोलर कार (World’s first Solar Car) तयार केली आहे. लाइटइयर कंपनीने आपल्या पहिल्या लाइटइयर झिरो (Lightyear 0) सोलर कारचे नुकतेच लॉण्चिंग केले. कंपनीच्या सहा वर्षांच्या अथक मेहनतीनंतर या सोलर कारचे उत्पादन या वर्षात सुरू होणार आहे. ही कार भारतात येण्याची शक्यता फारच कमी आहे. सध्या ‘लाइटइयर झिरो’चे टेस्टिंग ड्राईव्ह सुरू असून सलग 7 महिन्यांपासून या कारच्या ड्रायव्हिंग टेस्टने लोकांमध्ये उत्साह निर्माण केला आहे. या टेस्ट ड्राईव्हमधील प्रवासात कोणताही इंधन खर्च झालेला नाही.

lightyear 0 car

आयंडहोव्हन स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीच्या (Eindhoven School of Technology) पाच विद्यार्थ्यांनी ही भन्नाट कार तयार केली आहे. या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत चार वेळा वर्ल्ड सोलर चॅलेंज (World Solar Challenge) जिंकले आहे आणि त्याचाच पुढचा टप्पा म्हणजे त्यांनी सौरऊर्जेवर चालणारी कार ‘लाइटइयर 0’ तयार केली. लाइटइयर (Lightyear) कंपनीची स्थापना 2016 मध्ये फक्त पाच कर्मचार्‍यांसह करण्यात आली होती. प्रदूषण विरहित स्वच्छ वाहतूक सेवा उपलब्ध करून देणं, या उद्देशाने लाइटइयर (Lightyear) ची स्थापना करण्यात आली होती.

लाइटइयर कारमधील ऊर्जेची बचत करण्याच्या डिझाईनमुळे आणि समायोजित सोलर सिस्टिममुळे इलेक्ट्रिक कारमधील (Electric Vehicle) दोन बेसिक अडचणी दूर होण्यास मदत झाली आहे; त्या म्हणजे चार्जिंग आणि रेंज (Charging & Range). वेगाने वाढणाऱ्या या कंपनीचा विस्तार होत असून सध्या कंपनी 500 लोकांना रोजगार देत आहे. लाइटइयरने त्यांचा पहिला ड्रायव्हिंग प्रोटोटाइप 2019 मध्ये केला होता. त्यानंतर जून 2022 मध्ये लाइटइयरने त्यांची बहुचर्चित सोलर कार ‘लाइटइयर 0’ (Lightyear 0)ची घोषणा केली.

Lightyear 0 Solar Car

लाइटइयर 0 (Lightyear 0) मध्ये पाच स्क्वेअर मीटरचे डबल कर्व सौर पॅनेल (double-curved solar panels) बसवले आहे. त्यामुळे कार चालवतानाही आणि कार मोकळ्या जागेत पार्क केली असेल तरी चार्ज होऊ होते. यामुळे Lightyear 0 ही तिच्या वर्ल्डवाईड हार्मोनाइज्ड लाईट व्हेईकल टेस्ट प्रोसिजरमध्ये (Worldwide Harmonised Light Vehicle Test Procedure - WLTP) अंदाजित असलेल्या 625 किलोमीटरच्या रेंजमध्ये दररोज 70 किलोमीटर अधिक जोडली जाते.

बिनाचार्जिंग महिनाभर प्रवास शक्य

साधारणपणे ‘लाइटइयर 0’ कारचा वापर दररोजच्या 35 किलोमीटर प्रवासासाठी केला जाऊ शकतो. तसेच उन्हाळ्यामध्ये कार चार्ज न करता किमान महिनाभर वापरू शकतो. नेदरलॅण्ड सारख्या ठिकाणी अशी कार 2 महिने तर स्पेन किंवा पोर्तुगालसारख्या देशामध्ये विनाचार्जिंगची ही कार 7 महिन्यांपर्यंत वापरू शकतो.

10 सेकंदात 100 किलोमीटर प्रति वेग!

लाइटइयर 0 मध्ये 60 kWh बॅटरी पॅक आहे. हिची पॉवर चार इलेक्ट्रिक मोटर्सइतकी आहे. जी 174 अश्वशक्ती आणि 1,269 (पाऊंड फूट टॉर्क) lb-ft torque तयार करते. तसेच लाइटइयरच्या मते, ही कार 10 सेकंदात 0 ते 100 किलोमीटर प्रति वेगाने (kmph) धावेल आणि तिचा सर्वोच्च वेग 160 किलोमीटर प्रति वेग (kmph) असेल, असा कंपनीचा दावा आहे.

'लाइटइयरची झिरो'ची वैशिष्ट्ये आणि किंमत!

lightyear solar car

लाइटइयरची निर्मिती करताना कंपनीने टिकाऊपणा हा सर्व घटकांच्या मुळाशी जोडलेला आहे. कारमधील आतील भागात व सीट कव्हरसाठी वापरण्यात आलेले लेदर आणि फॅब्रिक्स हे वनस्पतीनिर्मित आणि पीईटी बाटल्यांचा पुनर्वापर करून तयार करण्यात आलेलं आहे. कारची बाहेरील बॉडीसुद्धा वाया जाणाऱ्या कार्बन फायबर घटकांमधून पुनर्निर्माण केलेल्या कार्बनपासून बनविलेली आहे. या श्रेणीतील पहिली कार वर्षाच्या शेवटी वर्ल्ड मार्केटमध्ये आणली जाणार आहे. या सोलर कारची लॉण्चिंग किंमत (solar car price) 1.65 कोटी रूपये असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, लाइटइयरने ही कार भारतात लॉण्च करण्याबद्दल अजून काहीच सूतोवाच दिलेले नाहीत.

source:https://tinyurl.com/2w4f9ac2