ED attach INX Media Property : आयएनएक्स मीडिया प्रकरणातील गैरव्यवहार प्रकरणी ईडीने पुन्हा एकदा कार्ती चिदंबरम यांची 11 कोटीची संपत्ती जप्त केली आहे. यासंदर्भात ईडीने प्रिव्हेशन ऑफ मनी लॉडरिंग अॅक्ट अंतर्गत मालमत्ता जप्ती विषयी आदेश दिले आहेत. या संपत्तीमध्ये कर्नाटकातील कुर्ग येथे असलेल्या चिदंबरम यांच्या एका स्थावर मालमत्तेचाही समावेश आहे.
काय आहे प्रकरण
कार्ती चिदंबरम हे काँग्रेसचे माजी केंद्रीय अर्थमंत्री पी.चिदंबरम यांचा मुलगा असून सध्या ते तामिळनाडूतील शिवगंगा मतदारसंघांचे खासदार आहेत. 2007 साली कार्ती चिदंबरम यांच्या नावे असलेल्या आयएनएक्स मीडिया कंपनीला विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन बोर्डाकडून 4.62 कोटीची परदेशी गुंतवणूक मिळविण्याची परवानगी दिली होती. मात्र, या कंपनीने तब्बल 305.36 कोटीची परदेशी गुंतवणूक घेतली. त्यापैकी 26 टक्के गुंतवणूक ही त्यांनी विदेशी गुंतवणूक बोर्डाची परवानगी न घेताच आयएनएक्स न्यूज चॅनलमध्ये गुंतवली. या गुंतवणूकीनंतरही आयएनएक्स मीडिया कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणावर मलेशियामधल्या एका कंपनीकडून गुंतवणूक होत असल्याचे आढळून आहे.
ED attaches 4 properties (three movable and one immovable property) worth Rs 11.04 Crore in Coorg District, Karnataka, belonging to Karti P Chidambaram and others in the case of INX Media Pvt Ltd and others, under PMLA: ED
— ANI (@ANI) April 18, 2023
(File Pic) pic.twitter.com/3UNKO8BJ7W
यापूर्वी केलेली कारवाई
आयएनएक्स मीडिया कंपनीमध्ये गैर पद्धतीने केलेल्या विदेशी गुंतवणूकी विरोधात 2017 साली ईडी ने तपास सुरू करून आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप दाखल केला. त्यानंतर ऑगस्ट 2019 मध्ये कार्ती चिदंबरम यांना सीबीआय कडून ही अटक करण्यात आली होती. दरम्यान, 2017 पर्यंत ईडीने या गैरव्यवहार प्रकरणी कार्ती चिदंबरम यांची 1.16 कोटी रूपयाची चल संपत्ती सुद्धा जप्त केली आहे. यामध्ये अॅडव्हानटेज स्ट्रॅटेजिक कंपनीच्या 26 रूपये बँक ठेवीचा सुद्धा समावेश आहे.