महादेव ऑनलाईन गेमिंग ॲपच्या संस्थापकांवर इडीने कारवाईला सुरुवात केली आहे. या कारवाईत कंपनीचे 417 कोटी रुपये गोठवल्याची बातमी समोर येत आहे. मुंबई, नागपूर, छत्तीसगडसाह 39 जागेवर इडीने छापेमारी केली आहे.
दुबईमध्ये वास्तव्यास असलेल्या सौरभ चंद्राकर (वय 28) आणि रवी उप्पल (वय 40) यांनी भागीदारीत ऑनलाईन गेमिंग व्यवसायाला सुरुवात केली होती. काही दिवसांपूर्वी सौरभ चंद्राकर यांच्या शाही लग्नाचा व्हिडियो समाजमाध्यमांमध्ये चांगलाच व्हायरल झाला होता.
या लग्नाला मोठमोठ्या बॉलीवूड सेलिब्रेटीजने हजेरी लावली होती. या लग्नात सनी लिओनी, जॉकी श्रॉफ, नेहा कक्कर देखील सामील झाले होते. सहभागी कलाकारांन किती मानधन देण्यात आले होते याची माहिती घेतली जात आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये हे लग्न पार पडले होते.
लग्नाला जाण्यासाठी पाहुण्यांना आणि सेलिब्रेटीजला नागपूर ते दुबई प्रवासासाठी खास खासगी जेट बुक केल्याची माहिती इडीच्या हाती लागली होती. या शाही लग्नासाठी थोडे थोडके नाही तर तब्बल 200 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचा अंदाज आहे. इतके पैसे या नवीन उद्योजकांकडे आले कुठून आणि त्याचा हिशीब त्यांनी ठेवला आहे किंवा नाही याचा तपास आता इडीचे अधिकारी करत आहेत.
ED frozen Rs 417 crore in Mahadev Book app, online gaming-betting app, money laundering case after conducting searches in Mumbai, Kolkata, Bhopal & other places. The app promoter Sourabh Chandrakar spend Rs 200 crore in his marriage arrangement in February that took place abroad
— Vijay V Singh (@vijayVsinghTOI) September 15, 2023
कर चोरी आणि मनी लाँड्रिंग
सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांनी Mahadev book app नावाने ऑनलाईन बेटिंग ॲप सुरु केले होते. तीन पत्ती, पोकर, क्रिकेट, टेबल टेनिसअशा गेम्सवर हे दोघे 80% प्रॉफीट कमवत होते. तसेच देशातील विविध भागांमध्ये होणाऱ्या निवडणुकीवर देखील बेटिंग केली जात होती. भारतात यावर बंदी असतानाही महादेव ऑनलाईन गेमिंग ॲपच्या माध्यमातून हा खेळ सुरु ठेवला होता.
या दोघांनी जवळपास 540 कोटींची कमाई केल्याचा इडीला संशय आहे. तसेच करचोरी आणि मनी लाँड्रिंग करून यांनी उत्पन्नाची माहिती लपवल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
बेनामी बँक खात्यातून होत होते व्यवहार
बेटिंगमध्ये सामील झालेली मंडळी त्यांचा नंबर महादेव ऑनलाईन गेमिंग ॲपवर देतात. कंपनीकडून युजर्सशी WhatsApp वर संपर्क साधला जात होता. बेटिंगची रक्कम युजर्सला बेनामी खात्यावरून पाठवली जात होती. यात काही युजर्सची फसवणूक झाल्याची प्रकरणे देखील समोर आली होती. पोलीस तक्रार झाल्यानंतर छत्तीसगड पोलिसांना याची माहिती संबंधित विभागाला कळवली होती. आता या प्रकारणार थेट इडीच कारवाई करत आहे.