आर्थिक पाहणी अहवाल 2023: जागतिक स्तरावर वस्तूंच्या किंमती वाढत चालल्यामुळे भारतातील चालू खात्यातील तूट (Current Account Deficit) वाढत आहे. यामुळे निर्यात कमी होऊ शकते असा अंदाज वर्तवला जात आहे. सरकारचा वार्षिक आर्थिक पाहणी अहवाल (Economic Survey 2023) सादर झाला आहे.यांत भारताची चालू खात्यातील तूट (CAD) वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली गेली आहे. जागतिक स्तरावर वस्तूंच्या किमती वाढल्याने हे घडले आहे. तथापि, देशाची अर्थव्यवस्था मजबूत आहे. चालू सर्वेक्षणानुसार, आर्थिक वर्ष 2024 मध्ये भारताचा विकास दर 6.4 टक्के असेल.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या आकडेवारीनुसार, देशाचा जीडीपी (GDP) एप्रिल-जून या कालावधीतील 2.2 टक्क्यांवरून सप्टेंबर तिमाहीत वाढून 4.4 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्याच वेळी, आतापर्यंत 2022-23 मध्ये, आयात दर निर्यातीच्या तुलनेत अधिक वेगवान आहे, ज्यामुळे व्यापार तूट वाढत आहे. चालू खात्यातील तूट कमी होण्यामागे अनेक कारणे आहेत. देशांतर्गत व्यापार आणि निर्यातीतील घट ही प्रमुख कारणे यामागे आहेत असे सर्वेक्षणात म्हटले आहे. म्हणून, CAD वर बारीक लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे आर्थिक सर्वेक्षण 2022-23 मध्ये नमूद केले आहे.
Indian economy expected to grow at 6.5% in 2023-24, the range is 6.0% - 6.8%: Chief Economic Advisor Dr V Anantha Nageswaran on #EconomicSurvey pic.twitter.com/rS9Iswdp1j
— ANI (@ANI) January 31, 2023
CAD मध्ये वाढ सुरूच राहू शकते!
जागतिक वस्तूंच्या किमती उंचावल्या असून भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग मजबूत असल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे. यामुळे CAD वाढू शकते असे म्हटले गेले आहे. शिवाय, निर्यातीतील कमतरता पुढील काही काळ कायम राहू शकते आणि यामुळे जागतिक बाजारपेठेतील भारतीय वस्तूंच्या मागणीत घट होऊ शकते.
जर एखाद्या देशाच्या चालू खात्यात तूट असेल (CAD), तर ती उत्पादन प्रक्रियेवर जास्त खर्च करत आहे असा त्याचा अर्थ होतो.
चालू खात्यातील तूट = देशांतर्गत वापरावरील खर्च + गुंतवणूक + सरकारी खर्च
रुपयाची चांगली कामगिरी
गेले काही दिवस रुपयाचे अवमूल्यन सुरूच आहे, परंतु इतर चलनांपेक्षा भारतीय चलन चांगली कामगिरी करत आहे. तसेच यूएस फेडरल रिझर्व्हकडून (US Federal Reserve) धोरणात्मक दरांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता कायम आहे. शिवाय, कच्च्या तेलाच्या किमती खाली येण्याची अपेक्षा आहे आणि भारताचा CAD सध्याच्या तुलनेत चांगल्या स्थितीत राहण्याची देखील अपेक्षा आहे. घसरणाऱ्या रुपयाचे आव्हान अर्थव्यवस्थेसमोर असले तरी रुपया इतर चलनांपेक्षा चांगली कामगिरी करत आहे. येणाऱ्या काळात रुपयाची पत वाढणार आहे. FY24 मध्ये महागाई कमी होणार आहे .FY23 मध्ये चलनवाढीचा दर 6.8 टक्क्यांवर येण्याचा अंदाज आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये वित्तीय तुटीच्या अंदाजपत्रकापर्यंत पोहोचणे केंद्र सरकारसाठी फार अवघड असणार नाहीये असे अहवालात म्हटले आहे. केंद्र सरकार मध्यम-मुदतीच्या वित्तीय धोरणावर येत्या काळात काम करेल, असेही म्हटले आहे.
जागतिक कमोडिटीच्या किमती महाग होत असल्याने आणि भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग मजबूत राहिल्याने CAD चे विस्तारीकरण देखील चालू राहू शकते. चालू वर्षाच्या दुस-या सहामाहीत जागतिक बाजारपेठेचा आकार आणि व्यापार मंदावल्याने निर्यात दरात घट होण्याची शक्यता आहे.