Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Duplicate Pan Card : डुप्लिकेट पॅन कार्ड काढायचंय? जाणून घ्या कसा करावा ऑनलाइन अर्ज

Duplicate Pan Card : डुप्लिकेट पॅन कार्ड काढायचंय? जाणून घ्या कसा करावा ऑनलाइन अर्ज

Duplicate Pan Card : आर्थिक व्यवहारात उपयोगी असणारं पॅन कार्ड हरवलं तर अनेक कामं खोळंबतात. आता तर पॅन कार्ड सक्तीचं करण्यात आलंय. आधार-पॅन लिंक करणंही अत्यावश्यक आहे. अशात पॅन कार्ड सापडत नसेल तर मोठी अडचण होऊ शकते. अशावेळी मधला मार्ग आपल्याला माहीत असायला हवा. पॅन कार्ड हरवलं असेल तर अधिक काळजी करण्याची गरज नाही.

आपलं ओरिजीनल पॅन कार्ड (Original PAN card) हरवलं असेल तर आपण डुप्लिकेट पॅन कार्डही काढू शकतो. यासंबंधीची अर्जाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आपल्याला ते प्राप्त होऊ शकतं. सर्व प्रकारच्या आर्थिक व्यवहारात एक महत्त्वाचा दस्तावेज म्हणून पॅन कार्डकडे पाहिलं जातं. इतकंच नाही, तर इतर शासकीय कामांसाठीही आधार कार्डसह दुसरा महत्त्वाचा पुरावा लागतो तो पॅन कार्डचा. मात्र ते हरवलं तर आपले सर्व व्यवहार, कामं अडकू शकतात. अशावेळी पर्याय असतो, तो डुप्लिकेट पॅन कार्ड काढण्याचा. याविषयी अनेकांना माहिती नसते. मात्र ही प्रक्रिया सोपी असते. आयकर विभागाकडून (Income tax department) आपल्याला डुप्लिकेट पॅन कार्ड मिळवता येतं. या डुप्लिकेट पॅन कार्डसाठी आधी या विभागाकडे अर्ज (Application) करावा लागतो. त्याची नेमकी प्रक्रिया कशी असते, ते पाहुया...

ऑफलाइन प्रक्रिया

  1. आयकर विभागाच्या संकेतस्थळावर आधी तुम्हाला जावं लागेल. इन्कम टॅक्स पॅन सर्व्हिसेस युनिटची ही वेबसाइटवर असेल. याठिकाणी विविध पर्याय तुम्हाला दिसतील. यातला 'पॅन कार्ड रिप्रिंट' हा पर्याय निवडावा. ज्यांना आधीच कायम खाते क्रमांक म्हणजेच पॅन (PAN) वाटप केलं गेलं आहे, त्यांच्यासाठीच हा पर्याय असणार आहे. हा पर्याय निवडल्यानंतर अर्जदाराला नवं पॅन कार्ड दिलं जातं.
  2. रिप्रिंटच्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर एक फॉर्म तुम्हाला दिसेल. त्यातले सर्व रकाने (Column) भरावेत. डाव्या समासाच्या चौकटीत एकही खूण करण्याची आवश्यकता नाही. ही प्रक्रिया सशुल्क आहे. तुम्हाला 105 रुपये द्यावे लागणार आहेत. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, डिमांड ड्राफ्ट किंवा चेकद्वारे हे पेमेंट करता येवू शकेल. पेमेंटची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, फॉर्म सबमिट करावा. त्याची पोचपावती तुम्हाला मिळेल.
  3. या पावतीची प्रिंट आपल्याजवळ असायला हवी. त्यावर 2.5 सेमी x 3.5 सेमी आकारामधला रंगीत फोटो चिकटवा. तुम्हाला सही करावी लागेल. पैसे कसे भरले तेदेखील तुम्हाला याठिकाणी जोडावं लागणार आहे. त्यानंतर ओळखपत्र, पत्ता असलेले कागदपत्र आणि जन्मतारखेचा पुरावा यासह तुम्हाला हे एनएसडीएलच्या (National Securities Depository Limited) पुण्यातल्या कार्यालयात पाठवावा लागेल.
  4. पॅन कार्डसंदर्भात अर्ज केल्याची सर्व कागदपत्र ऑनलाइन अर्ज केल्याच्या 15 दिवसांच्या आत या कार्यालयात पोहोचायला हवीत. वेळेत प्रक्रिया पूर्ण झाली तर तुम्हाला तुमचं डुप्लिकेट पॅन कार्ड 15 दिवसांत मिळू शकतं. पॅम कार्ड अजाची स्थितीही (Tracking) तुम्ही जाणून घेऊ शकता. यासाठी NSDLPAN टाइप करावं, स्पेस देऊन पावती क्रमांक टाकावा आणि 57575 या क्रमांकावर पाठवावा.

ऑनलाइन प्रक्रिया

  1. https://www.tin-nsdl.com/ वेबसाइटवर जावं
  2. होम पेजच्या रिप्रिंट पर्यायावर क्लिक करावं.
  3. पेजच्या तळाशी 'पॅन कार्ड रिप्रींट' या पर्यायावर क्लिक करावं.
  4. एक नवं पान उघडेल. याठिकाणी तुम्हाला तुमचा पॅन क्रमांक, आधार क्रमांक तसंच जन्मतारीख भरावी लागेल. अचूक माहिती भरल्यानंतर चेक बॉक्सवर क्लिक करावं.
  5. यानंतर ओटीपी (OTP) प्रक्रिया असेल. ई-मेल आयडी आणि मोबाइलमधून कोणताही एक पर्याय निवडावा. ओटीपीच्या माध्यमातून अर्जाची पडताळणी होईल. मूळ पॅन
  6. क्रमांकासह मोबाइल क्रमांक किंवा ई-मेल आयडी नोंदणीकृतच असायला हवा.
  7. 'जनरेट ओटीपी' या पर्यायावर क्लिक केल्यानंतर ओटीपी प्राप्त होईल. तो सबमिट करावा. हा ओटीपी फक्त 10 मिनिटांसाठीच वैध असेल.
  8.  टीपी प्रक्रिया झाल्यानंतर शुल्क भरावं लागणार आहे. 50 रुपये नाममात्र शुल्क भरून प्रिंट करण्यासाठी क्लिक करावं.
  9. तुमच्या मोबाइल नंबरवर एक मेसेज तुम्हाला मिळेल. या मेसेजमध्ये एक लिंकही दिली जाईल. त्यावर क्लिक करून तुम्ही तुमचं ई-पॅन डाउनलोड करू शकता.

'असं' करा डाउनलोड

  1. सर्वात आधी www.onlineservices.nsdl.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.
  2. नाव, फोन नंबर आणि ई-मेलची माहिती भरावी.
  3. अर्ज सबमिट करावा.
  4. ई-पॅन कार्ड तुमच्या ई-मेलवर पीडीएफच्या (PDF) स्वरूपात पाठवलं जाईल. तिथून ते डाउनलोड करता येईल.

शुल्क किती?

नवीन किंवा डुप्लिकेट पॅन कार्ड काढावयाचं असल्यास तुम्हाला 18 टक्के जीएसटीनुसार 93 रुपये यासोबत 110 रुपये द्यावे लागतील. जर तुम्ही परदेशात असाल तर अशावेळी पॅन कार्ड मागवायचं असेल तर त्यासाठी 1011 रुपये द्यावे लागतील. यात जीएसटीसह डिस्पॅच चार्जेस आदींचा समावेश असेल.

माहिती नाही होणार अपडेट

पॅन कार्ड हरवलं असेल तर आपल्याकडे पुरावा असावा म्हणून डुप्लिकेट पॅन कार्डची ही प्रक्रिया आहे. त्यामुळे तुम्हाला केवळ पॅन कार्डच उपलब्ध होईल. यातला तपशील बदलला जाणार नाही. कोणतीही माहिती अपडेट होणार नाही. हे डुप्लिकेट पॅन कार्ड आयकर विभागाकडे जो नोंदणीकृत पत्ता असेल, त्यावर पाठवलं जाईल.