Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Milk Powder Rate High: 'या' कारणामुळे दूध पावडर 100 रुपयांनी महागली? जाणून घेण्यासाठी वाचा

Milk Powder Rate High

Milk Powder Rate High: सध्या गाईच्या दुधाच्या पावडरीचा दर 1 किलोमागे 320 रुपये, तर म्हशीच्या दुधाच्या 1 किलो पावडरीसाठी 345 रुपये आकारले जात आहे. 2021-22 मध्ये याच कालावधीत दूध पावडरीचा दर 250 रुपयांच्या आसपास होता.

Milk Powder Rate High: महाराष्ट्रात लम्पी(Lumpy skin disease) हा आजार आला आणि अनेक जनावरांचे स्वास्थ्य खालावले. बऱ्याच गुरांचे जीव देखील या गंभीर आजारात गेले.  या  आजरामुळे यंदा दूध संकलनात(Milk Collection) अपेक्षित वाढ झाली नाही. जितके दूध संकलित झाले, तितक्याच दुधाची विक्री सध्या सुरू आहे. दूध पावडरीचे उत्पादन(Milk Powder Production) करण्यासाठी दुधाची उपलब्धता नसल्याने सध्या दूध पावडर उत्पादन कमी प्रमाणात केले जात आहे. यामुळे दूध पावडरचे दर(Milk Powder Rate) वाढल्याचे पाहायला मिळत आहेत.

मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी चक्क 100 रुपयांची किलोपाठी वाढ

मागील दोन महिन्यांपासून दूध पावडरीचा दर सातत्याने 300 रुपयांच्या वर पाहायला मिळत आहे. सध्या गाईच्या दुधाच्या पावडरीचा दर 1 किलोमागे 320 रुपये, तर म्हशीच्या दुधाच्या पावडरीस 1 किलोस 345 रुपये आकारले जात आहे. 2021-22 मध्ये  याच कालावधीत दूध पावडरीचा दर 250 रुपयांच्या आसपास होता. मात्र यंदा यामध्ये 100 रुपयांनी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. आता उन्हाळा(Summer Season) येत असल्याने या काळातील दुधाचे संकलन घटणार असल्याने दूध पावडरीचे दर वाढल्याचे पाहायला मिळेल, असा अंदाज दुग्ध व्यवसायातील व्यापाऱ्यांनी वर्तवला आहे.

दूध संकलन केंद्र त्रस्त

लम्पी स्कीन आजाराच्या(Lumpy skin disease) प्रादुर्भावामुळे अनेक ठिकाणी गुरांच्या आरोग्याची हानी झाल्याचे पाहायला मिळाले आहे. यामुळे देशभरात दुधाच्या संकलनात मोठी घट झाली आहे. याचा मोठा फटका राज्यातील दुग्ध उद्योगालाही बसला असून गेल्या सहा महिन्यांपासून अनेक मातब्बर दूध संघ त्रस्त आहेत. संकलित झालेले बहुतांशी दूध विक्री होत असल्याने दूध पावडरीसाठी फारसे दूध शिल्लक राहत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
दूध पावडरचा वापर प्रामुख्याने आईस्क्रीम व दही बनवताना मोठ्या प्रमाणात केला जातो. आता उन्हाळ्या येत असल्याने त्या पार्श्‍वभूमीवर या दोन्ही घटकांसाठी दूध पावडरीची मागणी वाढण्याचे पाहायला मिळत आहे.