Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Milk Price Increased: दूध महागले! वर्षभरात दुसऱ्यांदा अमूल, मदर डेअरीने केली दूध दरवाढ

Milk Price Increased

दूध खरेदीदरात झालेली वाढ आणि वाहतूक खर्च यामुळे कंपन्यांनी पॅकिंग दूधाच्या किंंमतीत वाढ केली. अमूल आणि मदर डेअरी या कंपन्यांनी वर्ष 2022 मध्ये दुसऱ्यांदा दरवाढ केली. (Milk Price Hike by Amul And Mother Dairy)

महागाईने होरपळणाऱ्या सामान्यांना दूध उत्पादक कंपन्यांनी आज झटका दिला. अमूल आणि मदर डेअरी या दोन कंपन्यांनी आज दूधाच्या किंमतीत प्रती लीटर 2 रुपयांची वाढ केली. (Amul and Mother Dairy Increased Milk Price Today) 2022 या वर्षात दूध दरात दुसऱ्यांदा वाढ झाली आहे.17 ऑगस्ट 2022 ग्राहकांना या दोन्ही ब्रॅंडच्या दूधासाठी जादा पैसे मोजावे लागतील.

दि गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन (GCMMF) जारी केलेल्या निवेदनानुसार अमूल दुधाच्या किंमतीत 2 रुपयांची वाढ केली आहे. GCMMF अमूल ब्रॅंड अंतर्गत दूध उत्पादन आणि विक्री करतो. अर्धा लिटर अमूल गोल्डचा भाव 31 रुपये (Amul Milk New Rate) झाला आहे. अर्धा लिटर अमूल ताजाचा दर आता 25 रुपये झाला आहे. अमूल शक्ती अर्धा लिटरचा भाव 28 रुपये  (Milk Price Hike) झाला आहे. यातून सरासरी 4% दरवाढ झाल्याचे कंपनीनं म्हटलं आहे. ही दरवाढ अहमदाबाद, सौराष्ट्र, दिल्ली-एनसीआर, पश्चिम बंगाल, मुंबई या बाजारात लागू होणार आहे.

India@75 : 75th Independence- अर्थ 75 वर्षांचा; बलशाली भारताचा!

अमूल कंपनीने फेब्रुवारी महिन्यात ही दूध दरात वाढ केली होती. त्यावेळी अर्धा लिटरच्या दूध पिशवीचा भाव 1 रुपयांनी वाढला होता.एक लिटर दूध 2 रुपयांनी महागले होते. उत्तर भारतातील आघाडीची दूध उत्पादक आणि वितरक कंपनी मदर डेअरीने देखील दूध दरात 2 रुपयांची वाढ (Mother Diary Milk Price Hike) केली आहे.बुधवार 17 ऑगस्ट 2022 पासून ही दरवाढ लागू होणार आहे.मदर डेअरी फूल मिल्क क्रिमचा भाव आता 61 रुपये प्रती लिटर इतका वाढला आहे.याआधी तो 59 रुपये होता. टोन्ड दुधाचा एक लिटरचा भाव 51 रुपये इतका झाला असून डबल टोन्ड दूधाचा भाव 45 रुपये झाला आहे. मदर डेअरी गायीचे दूध एक लिटरचा भाव 53 रुपये झाला आहे.1 मार्च 2022 रोजी मदर डेअरीने दूध दरात 2 रुपयांची वाढ (Mother Diary Milk New Rate) केली होती.

कटिंग चहा महागणार? 

दूध कंपन्यांनी चार महिन्यांत दुसऱ्यांदा दूधाच्या किंमतीत वाढ केल्याने हॉटेल्स आणि चहा विक्रेत्यांची आर्थिक बिघडण्याची शक्यता आहे. याआधीच व्यावसायिक वापराराचा 19 किलोचा गॅस सिलिंडर प्रचंड महागला आहे. त्यात दूध महागल्याने छोट्या चहा विक्रेत्यांच्या उत्पादन खर्चात वाढ होईल. हा वाढीव खर्च भरुन काढण्यासाठी या व्यावसायिकांकडून कटिंगचा भाव वाढवण्याची शक्यता आहे. केवळ टपरीवरचा कटिंग नाही तर मोठ्या हॉटेलातील चहासाठी ग्राहकांना जादा पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे.  

दूध कंपन्यांची भाववाढ कशामुळे?

  • वर्ष 2022 मध्ये दूध कंपन्यांनी दुसऱ्यांदा दूध दरवाढ केली. यापूर्वी 1 मार्च 2022 रोजी दूध महागले होते.  
  • दोन वेळा दरवाढ झाल्याने अमूल आणि मदर डेअरी दूधाचा भाव 4 रुपयांनी वाढला आहे.
  • गेल्या काही महिन्यांत पशूखाद्य आणि चाऱ्याच्या किंमतीत 20% वाढ झाली.
  • शेतकऱ्यांच्या खर्चात देखील वाढ झाली. ज्यामुळे कंपन्यांनी दूधाचा किमान दर वाढवला.
  • गुरांची देखभाल आणि त्यांच्या चाऱ्याचा खर्च वाढल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
  • साध्या दूधाचा दर 10 ते 11% वाढल्याचे दिसून आले.
  • कंपन्यांनी दूध खरेदीचा हमीभाव 8% ते 9% वाढवला, ज्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.
  • दूध पॅकिंग आणि वाहतूक खर्च वाढल्याने कंपन्यांनी दरवाढीचा बोजा ग्राहकांवर टाकला.