Tomato Puree Demand: पावसामुळे उत्पादन आणि पुरवठा साखळी प्रभावित होत असल्याने टोमॅटोच्या वाढत्या किमतीचा परिणाम त्यापासून तयार होणाऱ्या उत्पादनांवरही झाला आहे. टोमॅटो प्युरीबद्दलच सांगायचे झाले तर, बिग बास्केट, स्विगी इंस्टामार्ट, ब्लिंकिट, रिलायन्स मार्ट सारख्या ऑनलाइन किराणा प्लॅटफॉर्मवर तिची मागणी अनेक पटींनी वाढली आहे.
प्युरीचे दर वाढण्याची शक्यता
ऑफलाइन दुकाने आणि किरकोळ विक्रेत्यांमध्येही टोमॅटो प्युरीची मागणी वाढली असून अनेक ठिकाणी साठाही संपत आहे. दुसरीकडे, उत्पादक कंपन्याही त्याचे उत्पादन वाढवत आहेत. मात्र, टोमॅटोच्या वाढत्या किमतीचा परिणाम टोमॅटो पासून निर्मित इतर उत्पादनांच्या किमतीवरही होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
टोमॅटो प्युरीची 300% ने मागणी वाढली
प्युरी आणि फ्रोझन भाज्या क्षेत्रातील आघाडीची कंपनी मदर डेअरीने गेल्या दोन आठवड्यांत तिच्या उत्पादनांच्या मागणीत लक्षणीय वाढ केली आहे. त्याचबरोबर फ्रोझन भाज्यांची मागणी 50 टक्क्यांनी वाढली आहे.
गेल्या १५ दिवसांत टोमॅटो प्युरीच्या मागणीत ३००% वाढ झाली आहे. मागणीतील वाढ लक्षात घेऊन टोमॅटो प्युरीचे उत्पादन वाढविण्यात आले आहे, अशी माहिती मदर डेअरीच्या प्रवकत्याने दिली.
सरकारचा तात्पुरता दिलासा
दिल्ली-एनसीआरच्या किरकोळ बाजारात, ताज्या टोमॅटोच्या किमतीत प्रचंड वाढ दिसून येत आहे. 28-30 रुपये किलोने विकल्या जाणाऱ्या टोमॅटोने महिनाभरात 200 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.
त्यामुळे, अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत 'ग्राहक व्यवहार विभागा'च्या सूचनेनुसार, शुक्रवारपासून दिल्ली-एनसीआरमध्ये टोमॅटो स्वस्त दरात उपलब्ध करून दिले जात आहेत. सध्या ९० रुपये किलो दराने टोमॅटो लोकांना उपलब्ध करून दिला जात आहे. ही प्रणाली इतर शहरांमध्येही आठवड्याच्या शेवटी सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात केंद्र सरकार तर्फे सांगण्यात आले आहे.