Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Financial Mistakes : वर्ष 2023 मध्ये ‘या’ 5 आर्थिक चुका करू नका

Financial Mistakes

2023 वर्ष सुरू होणार आहे. म्हणूनच हे महत्वाचे आहे की आपण काही आर्थिक संकल्प करणे आवश्यक आहे. नवीन वर्षात नवीन गुंतवणूक (Investment) करण्यापूर्वी कोणत्या गोष्टी करु नयेत ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

हे नवीन वर्ष आहे, नवीन संधी आहे, नवीन उद्दिष्टे देखील तयार केली पाहिजेत. पण, या सगळ्यात काय काळजी घ्यावी लागते ती म्हणजे आर्थिक चुका (Financial Mistakes). म्हणजे त्या चुका ज्या आपण गुंतवणूक करताना अनेकदा करतो. 2023 वर्ष सुरू होणार आहे. म्हणूनच हे महत्वाचे आहे की आपण काही आर्थिक संकल्प करणे आवश्यक आहे. नवीन वर्षात नवीन गुंतवणूक (Investment) करण्यापूर्वी कोणत्या गोष्टी करु नयेत ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

हेतूशिवाय गुंतवणूक

बरेचदा असे दिसून येते की बहुतेक लोक फक्त कर वाचवायचे आहेत किंवा जास्त परतावा मिळवायचा आहे म्हणून गुंतवणूक करतात. पण, ही चूक करू नका. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही गुंतवणूक का करत आहात? हे जाणून घेतले पाहिजे. त्यामुळे तुमची गुंतवणूक सुरू करण्यापूर्वी तुमचे ध्येय ठरवा.

बराच काळ क्रेडिट रिपोर्ट न पाहणे

बहुतेक लोक ही चूक करतात की ते त्यांचा क्रेडिट स्कोर बराच काळ तपासत नाहीत. यात ते लोक सुद्धा समाविष्ट आहेत, ज्यांना त्याची माहिती तर आहे, परंतु ते देखील ते फक्त कर्ज किंवा क्रेडिट कार्ड घेताना पाहतात. नवीन वर्षात ही सवय बदला. तुम्ही तुमचा क्रेडिट रिपोर्ट नेहमी तपासावा. यावरून तुमचा क्रेडिट स्कोअर किती सुधारला आहे किंवा तो कमी का आहे? हे दिसून येते.

क्रेडिट कार्ड आणि ईएमआय पेमेंट डीफॉल्ट

जर तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्ड किंवा कर्जाचा ईएमआय चुकवला तर त्याचा क्रेडिट स्कोअरवर परिणाम होतो. यामुळे तुमची क्रेडिट हिस्ट्री खराब होते. भविष्यात तुम्हाला कर्ज घ्यायचे असेल किंवा क्रेडिट कार्डसाठी अर्ज करायचा असेल तर त्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे नवीन वर्षात स्वत:ला वचन द्या की तुम्ही तुमचे पेमेंट वेळेवर कराल.

अधिक क्रेडिट कार्ड असणे

गरजेपेक्षा जास्त कर्ज घेणे जड जाऊ शकते. पण, लोक एकापेक्षा अधिक क्रेडिट कार्डे बाळगण्याची चूक करतात. म्हणूनच नवीन वर्षात तुम्ही ही चूक सुधारायला हवी. आपल्याला आवश्यक तेवढे क्रेडिट कार्ड ठेवा. कारण यामुळे परतफेडीसाठी तुमच्यावर दबाव येणार नाही. एकापेक्षा अधिक क्रेडिट कार्ड असणे व्यवस्थापित करणे कठीण होऊ शकते. याचा तुमच्या क्रेडिट स्कोअरवरही नकारात्मक परिणाम होतो. तसेच थोड्या अंतराने क्रेडिट कार्डसाठी अर्ज करणे तुम्ही टाळा.

कर्ज, बचत आणि गुंतवणूक यांच्यातील ताळमेळ

आपली देय रक्कम प्राधान्य क्रमाने फेडणे शहाणपणाचे आहे. म्हणजे, सर्वप्रथम, तुमच्या पगारातून कर्जाची परतफेड करण्यासोबत बचतीसाठी काही भाग ठेवा. जर तुमच्याकडे गुंतवणुकीसाठी पुरेसा निधी असेल तर ते नक्कीच करा. मुख्य गोष्ट अशी आहे की तुमच्या कर्जाची वेळेवर परतफेड करणे तुमच्या भविष्यासाठी बचत आणि गुंतवणूक करण्याइतकेच महत्त्वाचे आहे.