आयकर कायद्याच्या कलम 194-IA अंतर्गत, मालमत्तेचे मूल्य 50 लाखांपेक्षा जास्त असल्यास खरेदीदाराला मालमत्तेच्या व्यवहार खर्चाच्या 1% रक्कम टीडीएस म्हणून भरावी लागते.
मुद्रांक शुल्क मूल्य (Stamp Duty Value) आणि मालमत्तेच्या वास्तविक विक्री मूल्यामध्ये तफावत असल्यास मालमत्ता विक्रीवरील TDS मोजण्यासाठी कोणत्या रकमेचा विचार केला जावा हे याआधी कायद्यात निर्दिष्ट केले गेले नव्हते. यंदाच्या अर्थसंकल्पात मात्र याबद्दल सरकारने स्पष्टीकरण दिले आहे. याब्दाल सविस्तर माहिती या लेखात आपण जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
50 लाखांपेक्षा कमी किमतीचा व्यवहार असेल तर?
टीडीएस वाचविण्यासाठी काही लोक 50 लाखांपेक्षा किमतीचा व्यवहार करतात. म्हणजे पूर्ण 50 लाखांचा व्यवहार न करता 49 लाख किंवा 49.50 लाख रुपयांचा व्यवहार करतात. परंतु सदर प्रॉपर्टी सर्कल रेटनुसार 50 लाखांहून अधिक असेल तरीही तुम्हांला 1% रक्कम टीडीएस म्हणून भरावीच लागेल हे लक्षात असू द्या.
व्यवहार 50 लाखांपेक्षा कमी किमतीत केला म्हणजे तुम्ही कर भरणे टाळले असे होत नाही. वेळेत कर न भरल्यास तुमच्यावर कायदेशीर कारवाई देखील केली जाऊ शकते हे लक्षात घ्या.
त्यामुळे कुठल्याही प्रॉपर्टीचा व्यवहार करताना प्रॉपर्टीचे सर्कल रेट देखील जाणून घ्या आणि सरकारी नियमानुसार देयक असलेले कर भरा.
नियम काय सांगतो?
मागील आर्थिक वर्षात फक्त 50 लाख रुपयांच्या वरच्या व्यवहारांवर टीडीएस कापला जात होता. परंतु यंदाच्याअर्थसंकल्पापासून हे नियम बदलले आहेत. आता मालमत्ता खरेदी करणाऱ्या व्यक्तीला विक्रेत्याला पेमेंट करताना 1% TDS भरावा लागतो.
विक्रेत्याकडे पॅन कार्ड नसेल तर 20 टक्के दराने TDS लागू होईल असे कायद्यात म्हटले आहे. स्थावर मालमत्तेची खरेदी-विक्री सध्याच्या काळात मोठ्या प्रमाणात होते आहे. दिवसेंदिवस यांतील उलाढाल देखील वाढते आहे. नव्या नियमानुसार खरेई-विक्रीदारांना करचोरी करता येणार नाही, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
प्रॉपर्टी मार्केटमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी हा नियम महत्वाचा ठरणार आहे.
अनिवासी भारतीयांसाठी याबाबत वेगळे नियम आहेत. प्रॉपर्टी विक्रेता जर अनिवासी भारतीय असेल तर त्यांच्यासाठी टीडीएस दर वेगळा आहे. मालमत्ता खरेदी केल्यानंतर जर आणि 2 वर्षांनी अनिवासी भारतीय व्यक्ती मालमत्ता विकत असेल तर दीर्घकालीन भांडवली नफा श्रेणीनुसार 20 टक्के टीडीएस आकारला जाईल असे नियम सांगतो. तर 2 वर्षांच्या आत मालमत्तेची विक्री केल्यास अल्पकालीन भांडवली नफा श्रेणीअंतर्गत NRI च्या टॅक्स स्लॅबनुसार कर कापला जाईला अशी कायद्यात तरतूद आहे.
TDS कसा जमा करायचा?
मालमत्ता खरेदी करणाऱ्याला एकूण किमतीच्या 1% रक्कम आयकर विभागात जमा करावी लागतो. यासाठी फॉर्म-26QB भरावा लागतो. TDS ची रक्कम https://onlineservices.tin. किंवा nsdl.com/etaxnew या वेबसाइटद्वारे ऑनलाईन देखील भरली जाऊ शकते. फॉर्म-26QB द्वारे TDS बँकेत जमा केले जाऊ शकतात.
दंडाचे प्रावधान काय?
प्रॉपर्टीची डील झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत TDS ची रक्कम भरणे आवश्यक आहे. व्यवहार करताना खरेदीदाराने TDS कापला नसल्यास, दरमहा 1% दराने दंड आकारला जाईल. जर TDS कापला असेल परंतु जमा केला नसेल तर 1.5% दंड लागू होईल. यामध्ये आयकर विभाग एक लाख रुपयांचा दंडही ठोठावू शकतो. TDS जमा करण्यासाठी फॉर्म 26QB भरला नाही, तर दररोज 200 रुपये दंड भरावा लागेल, असे कायद्यात प्रावधान आहे.
मालमत्तेचे पैसे भरल्यानंतर महिना संपल्यानंतर 30 दिवसांच्या आत टीडीएसची रक्कम जमा करावी लागेल. उदाहरणार्थ, जर 10 मे रोजी पेमेंट केले असेल तर ही रक्कम 30 जूनपर्यंत जमा करावी लागेल. अशा परिस्थितीत, सर्व प्रकारच्या त्रासांपासून दूर राहण्यासाठी, मालमत्ता खरेदीच्या व्यवहारात अमितसारखी चूक करू नका. करार करताना, TDS जमा करण्याबाबत विक्रेत्याशी स्पष्टपणे बोला. हे काम वेळेत पूर्ण करा. जर तुम्ही एनआरआयकडून मालमत्ता खरेदी केली असेल तर अधिक सावध रहा.