डिसेंबर महिन्यात देशांतर्गत विमान प्रवासात २०२१ सालातील डिसेंबर महिन्याच्या तुलनेत 15 टक्कांनी वाढला आहे. डिसेंबर महिन्यात देशात 1 कोटी 29 लाख नागरिकांनी प्रवास केला. मात्र, कोरोनापूर्वी 2019 च्या आकडेवारीपेक्षा 1 टक्क्यांनी हे प्रमाण कमी आहे. रेटिंग एजन्सी Icra ने याबाबतचा रिपोर्ट सादर केला आहे. भारतीय प्रवासी वाहतूक क्षेत्रासाठी ही 'निगेटिव्ह' बाब असल्याचे अहवालात म्हटले आहे.
चालू आर्थिक वर्षातील एप्रिल-डिसेंबर दरम्यान देशांतर्गत प्रवास 9 कोटी 86 लाख प्रवासी करतील, असा अंदाज बांधण्यात आला होता. मागील वर्षाच्या तुलनेत यात 63 टक्के वाढ होईल, अशी अपेक्षा होती. कोरोनाचा प्रसार होण्यापूर्वीच्या म्हणजे २०१९ च्या आकडेवारीपेक्षा हा अंदाज ९ टक्क्यांनी कमी होता.
एकूण प्रवासी क्षमतेच्या 91 टक्के नागरिकांनी 2022 मध्ये प्रवास केला. तर डिसेंबर 2021 मध्ये एकूण क्षमतेच्या 80 टक्केच प्रवाशांची विमानातून प्रवास केला. त्याआधी 2019 मध्ये 88 टक्के क्षमतेने प्रवास झाला होता. 2023 सालात नागरी वाहतूक क्षेत्र चांगली प्रगती करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
भारतामध्ये कोरोना प्रसारादरम्यान सेवा क्षेत्राचे मोठे नुकसान झाले होते. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासावर निर्बंध असल्याने विमान कंपन्या तोट्यात होत्या. अनेक विमान कंपन्यांनी कर्मचारी कपात केली होती. मात्र, कोरोनाचा प्रसार कमी झाल्याने देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूक सुरळीत झाली. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटन बंद असल्यामुळे एकूणच सेवा क्षेत्राला मोठा तोटा झाला होता.